5 टन ते 50 टन पर्यंत Kandahal Anudan Yojana सुरु. घरबसल्या ऑनलाईन फॉर्म भरा.

On: September 6, 2025 12:56 PM
Follow Us:
Kandahal Anudan Yojana started from 5 tons to 50 tons : 5 टन ते 50 टन पर्यंत कांदाचाळ अनुदान योजना सुरु. घरबसल्या ऑनलाईन फॉर्म भरा.

Kandahal Anudan Yojana : नमस्कार वाचक आणि शेतकरी बांधवांनो आज मी 5 टन ते 50 टन पर्यंत कांदाचाळ अनुदान योजना बद्दल माहिती घेऊन आलो आहे. कांदाचाळ अनुदान योजना सुरु झालेली आहे. कांदाचाळ अनुदान योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास प्रथम आता, ७/१२ धारक शेतकरी बांधव यांना agristack Farmer Id असायला हवी तेव्हाच आता. कांदा चाळ अनुदान योजना लाभ घेता येईल.

Kandahal Anudan Yojana 2025महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शेतकरी हा सर्वसाधारणपणे  कांदा जमिनीवर पसरून किंवा स्थानिक रीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदा पिकाची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा मोठ्या प्रमाणावर साठवणूक न करता आणि त्याचे नुकसान जास्त होण्याची शक्यता राहते. तसेच कांदा हा टिकाऊपणा असून योग्य वेळी यावर उपाय योजना न केल्यास विपरीत परिणाम होतांना दिसतो.

What Is Kandahal Anudan Yojana

कांदाचाळीच्या उभारणीमुळे सद्या शेतकरी कांदा उत्पादकं काढत आहे. कांदा चाळी मुळे कांद्याची प्रत चांगली राखली जाते आणि तो कांदा जास्त दीर्घकाळ टिकवला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला कांदा चाळी मुळे त्याचा अधिक नफा मिळू शकतो. त्यामुळेच कांदाचाळ उभारणी कडे शेतकऱ्याचा कल हा 2025 मध्ये वाढत झालेला दिसून येतो.

कांदा चाळ अनुदान किती?

मेट्रिक टन नुसार तुम्हाला कांदाचाळीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य म्हणून ५ मेट्रिक टन, १० मेट्रिक टन, १५ मेट्रिक टन, २० मेट्रिक टन व २५ मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५०% व कमाल ३,५००/- रुपये प्रति ५ ते २५ मेट्रिक टन या क्षमतेनुसार 100% अर्थसहाय्य दिले जाते.

कांदाचाळ अनुदानाचे उद्दिष्ट काय? Kandahal Anudan Yojana

कांदाचाळ तुम्ही जेव्हा उभारल्याने शेतकर्‍याला कांद्याच्या साठवणुकीत नुकसान कमी होईल आणि अधिक नफा मिळवता येईल तेव्हा. हंगामानुसार कांद्याची आवक जास्त वाढून कांद्याचे भाव जेव्हा कमी होऊन कोसळतात तसेच इतर हंगामा व्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा पडून जेव्हा कांद्याचे भाव अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढतात. अशा समस्येवर अंशतः नियंत्रण मिळवणे. कांद्याची साठवणूक करून अधिक नफा मिळवणे.

कांदाचाळ अनुदान पात्रता.

Kandahal Anudan Yojana अंतर्गत अर्ज करताना. ७/१२ धारक, मालकी किंवा सामयिक शेतकरी बांधव यांना agristack Farmer Id असणे बंधनकारक आहे.

  • सहकारी पणन संघ
  • ७/१२ उतारा वर नोंद असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे गरजेचे आहे.
  • कांदा चाळ अनुदान लाभ कोण घेऊ शकतो?
  • वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी
  • शेतकऱ्यांचा गट स्वयंसहाय्यता गट
  • शेतकरी महिला गट
  • शेतकऱ्यांची उत्पादक संघ
  • नोंदणीकृत शेती संबंधित संस्था
  • शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था

आवश्यक कागदपत्रे –

  • सातबारा उतारा.
  • Farmer Id
  • आधार कार्डची छायांकित प्रत
  • आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकाच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
  • जातीचा दाखला, प्रमाणपत्र (अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी)
  • विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र २) PDF 
kandahal anudan yojana started from 5 tons to 50 tons fill the online form from home
kandahal anudan yojana started from 5 tons to 50 tons fill the online form from home

5/25 टन कांदाचाळ साठी अर्ज कुठे करायचा.

5/25 टन Kandahal Anudan Yojana अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या आणि पात्र अर्जदारांनी या योजनेसाठी AgriLogin – Maha DBT – Maharashtra लिंक या ऑनलाइन संकेतस्थळावर प्रथम Farmer ID ने लॉग in करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर प्रथम शेतकऱ्याची प्रोफाईल पूर्ण करावी लागेल.

  • जसे जातीचा दाखला उपलोड करावे लागेल, नंतर आपण अपंग असेल तर त्याचे दाखला अपलोड करावे लागेल.
  • नंतर पुढे घटकासाठी अर्ज करा. यानावावर क्लिक करा.
  • फलोत्पादन च्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान बाबी निवडा नावावर क्लिक करावे लागेल.
  • घटक प्रकार, म्हणून इतर घटक ची निवड करावी.
  • बाब निवड करा. कांदाचाळ,पॅक हाऊस, इत्यादी (काढणीपश्चात एकात्मिक व्यवस्थापन) निवड करावी.
  • उपघटक निवड करावी, आणि त्यात कांदाचाळ 5/25 टन निवड करावी.
  • कांदाचाळची क्षमता (MT) म्हणून 25 निवड करावी.
  • शेवती जतन करा. नावावर क्लिक करा. तुमचे अर्ज भरले जाईल.
  • नंतर रुपये भरल्यानंतर कांदाचाळ अनुदान साठी अर्ज सबमिट होईल.

25/50 टन कांदाचाळ साठी अर्ज कुठे करायचा.

Kandahal Anudan Yojana अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या आणि पात्र अर्जदारांनी या योजनेसाठी AgriLogin – Maha DBT – Maharashtra लिंक या ऑनलाइन संकेतस्थळावर प्रथम Farmer ID ने लॉग in करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर प्रथम शेतकऱ्याची प्रोफाईल पूर्ण करावी लागेल.

  • जसे जातीचा दाखला उपलोड करावे लागेल, नंतर आपण अपंग असेल तर त्याचे दाखला अपलोड करावे लागेल.
  • नंतर पुढे घटकासाठी अर्ज करा. यानावावर क्लिक करा.
  • फलोत्पादन च्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान बाबी निवडा नावावर क्लिक करावे लागेल.
  • घटक प्रकार, म्हणून इतर घटक ची निवड करावी.
  • बाब निवड करा. कांदाचाळ,पॅक हाऊस, इत्यादी (काढणीपश्चात एकात्मिक व्यवस्थापन) निवड करावी.
  • उपघटक निवड करावी, आणि त्यात कांदाचाळ 25 टन ते 50 टन निवड करावी.
  • कांदाचाळची क्षमता (MT) म्हणून 50 MT निवड करावी.
  • शेवती जतन करा. नावावर क्लिक करा. तुमचे अर्ज भरले जाईल.
  • नंतर रुपये भरल्यानंतर कांदाचाळ अनुदान साठी अर्ज सबमिट होईल.
  • कृषी विभाग मध्ये जाऊन आवश्यक ती सर्व कागदपत्रे अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावीत.
  • कांदाचाळ अनुदान योजनेसाठी पूर्व संमती पत्र.

Kandahal Anudan Yojana आवश्यक माहिती

5 टन ते 25 टन किंवा 25/50 टन पर्यंत कांदाचाळ अनुदान योजनेसाठी पूर्व संमती पत्र सोबत, विहित नमुन्यात प्रपत्र ४ बंध-पत्र जोडणे आवश्यक आहे. हे कागदपत्रे AgriLogin – Maha DBT – Maharashtra या वेबसाईट वर अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच कांदाचाळ आराखड्यात पूर्वसंमती पत्रासोबत दिलेल्या तांत्रिक निकषानुसार कांदा चाळीची उभारणी करणे बंधनकारक असणार आहे.

5 टन ते 25 टन किंवा 25/50 टन पर्यंत कांदाचाळ या योजनेसाठी तुम्हाला AgriLogin – Maha DBT – Maharashtra या वेबसाईट वर कांदाचाळ अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला सविस्तर प्रस्ताव हाणून ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. कांदाचाळ उभारणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी GST बिल कोटेशन ऑनलाईन सादर करावा. आणि लगेच ऑनलाईन डेस्क ला दिसेल. (Kandahal Anudan Yojana)

Related Download हमीपत्र PDFLink
official websiteLink
Related Download प्रपत्र ४ बंध-पत्र PDFLink

Conclusion :  

आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला (Kandahal Anudan Yojana) 5 टन ते 25 टन किंवा 25/50 टन पर्यंत कांदाचाळ अनुदान योजने विषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अद्याप तुम्हाला काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक कार्यालय यांच्याशी संपर्क करावा आणि तुमच्या शंकांचे पूर्ण निरसन करावे.

You Tube Kandahal Anudan Yojana

2 thoughts on “5 टन ते 50 टन पर्यंत Kandahal Anudan Yojana सुरु. घरबसल्या ऑनलाईन फॉर्म भरा.”

Leave a Comment