15 वा वित्त आयोगातून घ्याव्याच्या कामाची यादी : List of work to be taken up by the 15th Finance Commission

On: December 1, 2025 7:19 AM
Follow Us:
List of work to be taken up by the 15th Finance Commission

नमस्कार वाचक मित्रांनो आज मी तुम्हाला List of work to be taken up by the 15th Finance Commission याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Table of Contents

 15 वा वित्त आयोगातून घ्याव्याच्या कामाची यादी ( List of work to be taken up by the 15th Finance Commission )

1 50% बंदीस्त निधी मधून घ्यावयाची कामे

अ ) स्वच्छता व हागंदारी मुक्त गावाचा दर्जा राखविणेसाठी घ्यावयाचे उपकृम

  • 1 सार्वजनीक / समुदाय स्तरावर मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प
  • 2 मोठ्या ग्रामपंचायत करिता सेप्टीक टाकीतील गाळ उपसण्याकरिता संक्शन मशीन घेणे
  • 3 प्राथमीक शाळा / अंगणवाडी मधील विद्यार्थी पटसंख्येनुसार मुतारी व शौचालय घेणे
  • 4 प्राथमीक शाळा / अंगणवाडी येथे Hand Wash station घेणे.
  • 5 ग्रामपंचायत, मंदीर व इतर धार्मीक स्थळ, बाजार ठिकाणी, एस.टी. स्टॅण्ड येथे सार्वजनीक शौचालय व मुतारी व Hand Wash Station घेणे.
  • 6 घन कचरा व्यवस्थापन करीता समुदाय स्तरावरती उपाय योजना घेणे (ओला कचरा पासून खत निर्मिती, प्लॉस्टीक वस्तूवर प्रक्रीया करणे ई.)
  • 7 कचरा संकलन करिता वाहतूक सुविधा घेणे.
  • 8 सार्वजनीक सांडपाणी व्यवस्थापन करिता उपाय योजना करणे (शोष खड्डे, स्थिरीकरण तळी, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत सांडपाणी प्रक्रीया)
  • 9 सार्वजनीक ठिकाणी /शौचालय ई. निर्जंतूकीकरणासाठी आवश्यक साधन सामुग्री घेणे,
  • 10 भुमीगत व बंदिस्त गटारे बांधकाम करणे

ब : पिण्याचे पाणी पुरवठा, पावसाचे पाणी संकलन आणि पाण्याचा पुर्नवापर

  • 1 गावातील सर्व शासकीय इमारतीमध्ये पाऊस पाणी संकलन करुन भूजल पुर्नभरण करणे
  • 2 नळपाणी पुरवठा योजनेसाठी स्वंयचलीत क्लोरीन डोसर बसविणे
  • 3 गावातील नळ धारकाना जलमापक यंत्र (Water meter) बसविणे
  • 4 मोबाईल अॅपद्वारे मासीक जलमापक यंत्र Water meter ची पाणी पट्टी बिल देणे
  • 5 पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत, विहीर, आड किंवा बोअरवेल असल्यास त्याचे पुर्नभरण करणे
  • 6 मोबाईल द्वारे नळ पाणी पुरवठा योजना सुरु व बंद करणे
  • 7 R.O. मशीन बसविणे व ATM द्वारे पाणी पुरवठा करणे.
  • 8 हातपंप, विजपंप व पाणी पुरवठा योजना दुरस्ती करणे.

2 ) 50% इतर निधीमधून घ्यावयाची कामे

अ 25% शिक्षण आरोग्य उपजिविका

  • 1 शाळा ई-लर्निंग करणे, शाळेला शैक्षणीक साहित्य पुरवठा करणे.
  • 2 प्राथमीक शाळा विदयार्थीना छोटे वाचनालय करणे
  • 3 शाळा खोली दुरुस्ती करणे, शाळेचा प्रांगणात पेव्हर ब्लॉक बसविणे.
  • 4 शाळेसाठी खेलची मैदाने तयार करणे.
  • 5 प्राथमीक आरोग्य केंद्र / उपकेंद्र यांना वैदयकिय साहित्य पुरविणे
  • 6 गावातील नागरीक, विदयार्थी, यांचे करीता आरोग्य शिबीर घेणे.
  • 7 प्राथमीक आरोग्य केंद्र / उपकेंद्र दुरुस्ती करणे, आवश्यकतेनुसार शौचालय बांधकाम करणे
  • 8 प्राथमीक आरोग्य केंद्र / उपकेंद्र यांना बेड व फर्निचर साहित्य पुरवठा करणे
  • 9 बाजार गाळे बांधकाम करुन बचत गटाना दुकाने उपलब्ध करुन देणे
  • 10 बाजारामध्ये आरोग्य विषयक सुविधा पुरविणे, सार्वजनीक शौचालय व मुतारी बांधकाम करणे व बाजार ओटे दुरुस्ती करणे.
  • 11 कौशल्य वृध्दी करिता सुशिक्षीत बेरोजगाराना प्रशिक्षणाचे आयोजन करणे
  • 12 शाळेस आवश्यकतेनुसार खेलाचे साहित्य पुरवठा करणे
  • 13 पशुवैदयकिय दवाखाना दुरुस्ती करणे.
  • List of work to be taken up by the 15th Finance Commission Pdf

ब 10% महिला व बाल कल्याण

  • 1 शाळा व अंगणवाडीस गैस पुरवठा करणे
  • 2 अंगणवाडी दुरुस्ती करणे, आवश्यकतेनुसार अंगणवाडी शौचालय दुरुस्त करणे
  • 3 अंगणवाडी करिता साहित्य खरेदी करणे.
  • 4 अंगणवाडीस संरक्षण भिंत बांधणे.
  • 5 अंगणवाडी मध्ये किचन गार्ड तयार करणे

क मागासवर्गीय समाज लोकसंख्येनुसार घ्यावयाची कामे

  • 1 मागासवर्गीय वस्ती मधील समाज मंदिर बांधकाम / दुरुस्ती
  • 2 मागासवर्गीय वस्ती मधील समाज मंदिर सुशोभीकरण करणे 
  • 3 मागासवर्गीय वस्तीत पाणी पुरवठयाची व्यवस्था करणे
  • 4 मागासवर्गीय वस्तीत सि.सि. रस्ता व भुमीगत नाली बांधकाम करणे
  • 5 सार्वजनीक वाचनालय करणे

3 इतर कामे

  • 1 ग्रामपंचायत भवन बांधकाम / दुरुस्ती करणे
  • 2 ग्रामपंचायत कार्यालयास शौचालय / मुतारी बांधकाम करणे
  • 3 गावात घन वृक्षलागवड व संवर्धन करणे
  • 4 गावात सि.सि. रस्ता व भुमीगत नाली बांधकाम करणे
  • 5 गावात पेव्हर ब्लॉक बसविणे
  • 6 घनकचरा व्यवस्थापन करणे
  • 7 गावात सि.सि.टी. कॅमरे बसविणे
  • 8 ग्रामपंचायत भवन करीता सोलार सिस्टीम बसविणे
  • 9 घंटा गाडी कचरा गोळा करणे करीता खरेदी करणे
  • 10 ग्रामसभेने गावाच्या निकडीनुसार ग्रामसभेत मंजुर केलेली इतर कामे

5 प्रशासकीय खर्च : List of work to be taken up by the 15th Finance Commission

1 आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्रचालकाचे मानधन अदा करणे.

List of work to be taken up by the 15th Finance Commission Pdf

ग्रामपंचायत विकासकामाची तपासणी करण्यासाठी अर्जाचा नमूना माहितीचा अधिकार कायदा २००५-कलम ३ अन्वये अर्ज List of work to be taken up by the 15th Finance Commission (जोडपत्र ” अ “नियम ३ नुसार)

प्रति

जनमाहिती आधिकारी द्वारा ग्रामसेवक – ग्रामपंचायत कार्यालय

ता.– जि- (List of work to be taken up by the 15th Finance Commission)

१) अर्जदाराचे नांव –

२) अर्जदाराचा पूर्ण पत्ता:–

३) माहितीचा विषय -या ग्रामपंचायती संदर्भातील माहिती मिळणेबाबत

  • अ) ग्रामपंचायतीने सन २००९ ते २०११ दरम्यान कोणकोणती विकास कामे केली ? विकास कामाची यादी द्यावी. या विकास कामासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारच्या कोणत्या योजनेतून किती निधी मिळाला. सदर निधी कधी व कसा खर्च करण्यात आला.
  • ब) आपल्या ग्रामपंचायतीच्या मागील तीन वर्षाच्या ऑडिट रिपोर्टची छांयाकित प्रत द्यावी.
  • क) ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती कर्मचारी आहेत. त्यांना किती रूपये मासिक वेतन दिले जाते याचा तपशील द्यावा.
  • ड) ग्रामपंचायतीला २००९ ते २०११ या तीन वर्षात प्रतिवर्षी कोणकोणत्या उद्देशासाठी शासनाकडून किती रूपये थेट अनुदान किंवा मदत रक्कम मिळाली? या रक्कमेचा विनीयोग कोठे केव्हा व कसा झाला. इ) २००९ पासून २०११ आज तारखेपर्यंत ग्रामपंचायतीच्या एकूण किती ग्रामसभा भरवल्या गेल्या. प्रत्येक ग्रामसभेला उपस्थित पुरूष व महिला सदस्यांची नावे व पत्ते मिळावेत. ग्रामसभेत मंजूर झालेल्या सर्व ठरावांची छायांकित प्रती मिळाव्यात.

५) माहिती टपालाने हवी की व्यक्तिश: माहिती स्पीड पोस्टाने पाठवावी / व्यक्तीश:

६) अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे / नाही (नसल्यास १० रूपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडला आहे)

अर्जदाराची सही

List of work to be taken up by the 15th Finance Commission Photo

List of work to be taken up by the 15th Finance Commission Photo

List of work to be taken up by the 15th Finance Commission You Tube

Leave a Comment