आयटीआयमध्ये आता नवीन ट्रेड शिकता येणार एआय, ड्रोन, सोलारसह १३ न्यू एज ट्रेडसचा समावेश

By Shailesh Pawara

Published On:

Date:

New trades can now be learned in ITIs, including 13 new age trades including AI, drones, solar,

शिरपूर : जिल्ह्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये यंदा मोठा बदल करण्यात आला आहे. (New trades can now be learned in ITIs) पारंपरिक कौशल्य प्रशिक्षणासोबत आता तंत्रज्ञानाधारित अत्याधुनिक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजांनुसार प्रशिक्षण मिळणार आहे. २१ मेपासून जिल्ह्यातील आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबवली जात आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संचालनालयाकडून ही प्रवेश प्रक्रिया नियंत्रित केली जात आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर या प्रक्रियेत भर देण्यात आला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. शासकीय व खासगी आयटीआयमध्ये प्रवेशासाठी २१ मेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागणार आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांना नवीन रोजगाराभिमुख शिक्षण मिळणार असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

२१ मे पासून प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात .

एआय, सोलार, ड्रोन, इव्हीमध्ये करिअरच्या संधी, New trades can now be learned in ITIs

नवीन तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. एआय क्षेत्रात ऑटोमेशन, मशीन लर्निंग आणि डेटा विश्लेषण यामध्ये कामाच्या संधी उपलब्ध आहेत. सोलार ऊर्जा क्षेत्रात देखभाल, उत्पादन आणि इन्स्टॉलेशनमध्ये रोजगार मिळू शकतो. ड्रोन तंत्रज्ञान शेती, सर्वेक्षण, नकाशे तयार करणे आणि सुरक्षा क्षेत्रात वापरले जात आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात बॅटरी तंत्रज्ञान, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्समध्ये मोठी मागणी आहे. अॅप डेव्हलपमेंट आणि टेस्टिंगमध्येही रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. १३ नवीन न्यू एज ट्रेडस समाविष्ट यंदा आयटीआय अभ्यासक्रमांमध्ये करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम आधुनिक उद्योग क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन तयार करण्यात आले

पात्रता, अर्ज कुठे करायचा?

आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची किमान शैक्षणिक पात्रता ट्रेडनुसार ८ वी किंवा १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही विशेष ट्रेडसाठी अतिरिक्त शैक्षणिक अटी लागू असू शकतात. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. विद्यार्थ्यांनी राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे. निवड प्रक्रिया गुणवत्ता यादी आणि समुपदेशनाच्या आधारे केली जाणार आहे.

थेट कंपनीत जाऊन ‘प्रॅक्टिकल’ प्रशिक्षण

नवीन अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षणावर अवलंबून ठेवले जाणार नाही. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. कंपन्यांमध्ये जाऊन काम शिकण्याची संधी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल.

New trades can now be learned in ITIs, including 13 new age trades including AI, drones, solar,

WordPress Market IT Solutions & Technology Multi-Purpose Elementor WordPress Theme – Agiletech iTalk – Event & Conference Elementor Template Kit Itechie – IT Solutions and Services WordPress Theme IThemes BackupBuddy WordPress Plugin iThemes Content Upgrades iThemes Sales Accelerator Inventory iThemes Sales Accelerator MultiChannel iThemes Sales Accelerator Reporting Pro iThemes Security Pro ITok – ICO and Cryptocurrency WordPress Theme