नमस्कार वाचक मित्रांनो आज मी तुम्हाला माझी शेती माझा सातबारा.. मीच नोंदविणार माझा पिकपेरा..!! या वाक्या नुसार सविस्तर माहिती देत आहे. Wel Come To E Pik Pahani deadline extended, registration can be done till October 30
पुणे : खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीकपाहणीची मुदत चौदा सप्टेंबर असून अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करता आलेली नाही. काही ठिकाणी दुबार पेरणीही झाली आहे. त्यामुळे या ई-पीक पाहणीला सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही मुदत आता २० सप्टेंबर अशी करण्यात आली आहे. त्यानंतर सहायकांमार्फत नोंदणी केली जाणार आहे. राज्यातील एकूण पीक क्षेत्राच्या सुमारे ४० टक्के अर्थात ६७ लाख १९ हजार हेक्टर झाली आहे, अशी माहिती ई-पीकपाहणी प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.
Table of Contents
अंतिम मुदत 30 ऑक्टोबर पर्यंत. E Pik Pahani deadline extended registration can be done till October 30
खरीप हंगामातील पिकांची नोंदणी करण्यासाठी शेतकरी स्तरावर एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. परंतु पुनः अंतिम मुदत 30 ऑक्टोबर पर्यंत देण्यात आली आहे. मात्र, ऑगस्टमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांना शेतात जाऊन पिकांची नोंदणी करता आली नव्हती. तसेच राज्यातील काही शेतकऱ्यांनी पावसाळ्यात आधीच पेरलेल्या पिकांची नोंदणी केली.
| विभागनिहाय नोंदणी | क्षेत्र (हेक्टरमध्ये) |
| कोकण | १०६०९९.४१ |
| संभाजीनगर | २०९३५३०.४८ |
| अमरावती | १९३४४२८.०१ |
| नागपूर | १०५५९४०.४६ |
| नाशिक | ११६६९१०.४५ |
| पुणे | ३६२७४३.५९ |
| एकूण | ६७१९६५२.०४ |
बहुवर्षीय पिकांची नोंदणी
अतिवृष्टीने पिकांची नासाडी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. परिणामी पीक पाहणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार पिकांच्या नोंदणीसाठी अतिरिक्त रक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही मुदत आता वीस सप्टेंबर असेल. त्यानंतर ३० सप्टेंबरपासून ४ नोव्हेंबरपासून सहायक ही ई-पीक पाहणी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्यात शनिवारपर्यंत (दि. 02 ) एकूण सदूसस्ट लाख एकोणीस हजार सहाशे बावन्न हेक्टरवरील खरीप आणि बहुवर्षीय पिकांची नोंदणी झाली होती. त्यात तीस लाख हेक्टर सोयाबीन पिकाची नोंदणी झाली आहे. राज्यात २०१९ पूर्वी खरीपातील सरासरी पेरणी क्षेत्र एक कोटी एकोणासत्तर लाख बावीस हजार नऊ शे सदूशष्ट हेक्टर इतके आहे. त्यानुसार नोंदणी केलेले क्षेत्र ३९.७१ टक्के आहे.
ई-पीकपाहणी मोबाईल अँप
आपल्या शेतातील पिकाची नोंद सातबारावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आपल्या शेतातुनच ई पीकपाहणी DCS मोबाईल ऍप मधुन आपल्या पिकाची सातबारावर नोंद करता येते.
- ई पिकपाहणी का करायची
- नैसर्गिक आपत्ती मदतीसाठी
- अचुक व वस्तुनिष्ठ पिक पेरणीची माहिती मिळण्यासाठी
- पिकविमा योजना साठी पीकपेरा माहिती
- कृषी विभागाच्या विविध योजना लाभासाठी
- पीककर्ज साठी पीकपेरा माहिती
जमिनीच्या अचुक मुल्यांकन साठी पीकपेरा
- वन्य प्राणी पीकनुकसान मदतीसाठी पिकपेरा : ई-पीक पाहणीला मुदतवाढ, 30 ऑक्टोबर पर्यंत करता येणार नोंदणी : E Pik Pahani deadline extended registration can be done till October 30
ई पिकपाहणी नोंदविता येणाऱ्या बाबी
- फळबागा माहिती
- पॉलिहाऊस पिक/शेडनेट पिक माहिती
- पड जमिन माहिती (घरपड, गवतपड)
- जलसिंचन साधन व प्रकार (विहीर, बोअरवेल, शेततळे)
- बांधावरील झाडांची माहिती
- निर्भेळ पीक/मिश्र पिक माहिती.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र
विषय – खरीप हंगाम २०२५ च्या अनुषंगाने पीक पाहणी बाबत.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने, ई पीक पाहणी (Digital Crop Survey) App द्वारे करण्यात आलेल्या पिक पाहणीचा राज्यांमधील जिल्हा निहाय सद्यस्थितीचा तपशील प्रपत्र अ मध्ये देण्यात आलेला आहे, त्याचे अवलोकन व्हावे. सद्यस्थितीमध्ये राज्यातील एकूण लागवडी योग्य क्षेत्र १.६९ Cr हेक्टर पैकी ८१.०४ लक्ष हेक्टर म्हणजेच ४७.८९% क्षेत्रामध्ये पिकांची नोंद झाली आहे.
वास्तविक पाहता दि.१४ सप्टेंबर २०२५ पर्यंत शेतकरी स्तरावरीले पिकांची नोंद किमान ६०% होणे अपेक्षित होते. त्या तुलनेमध्ये पीक पाहणीचे प्रमाण कमी आहे. राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर इत्यादी कारणास्तव क्षेत्रीय कायोलयाकडून केलेल्या मागणी नुसार शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करीता पत्र क्र.रा.भू.अ.आ.का.२/DCS/खरीप/शेतकरी/२०२५, दि. १२/०९/२०२५ अन्वये दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
ई पीक पाहणी चे पत्र
तसेच सदर मुदत पुन्हा वाढवण्याबाबत विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर यांचे कडून पत्र क्र. जा.क्र.२०२५/मशाका/जमीन-१/कावि-६२४/८९१, दि. १७/०९/२०२५ अन्वये विनंती आली तसेच दि.१८/०९/२०२५ रोजी मा. मुख्य सचिव यांच्याकडील बैठकीतील चर्चेनुसार शेतकरी स्तरावरील पीक नोंदणी करणेसाठी दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे. याबाबत आपले स्तरावरून स्थानिक पातळीवर सूचना देणेत याव्यात.
ई पीक पाहणी (Digital Crop Survey) App द्वारे पिकांची नोंदणी करण्यासाठी AgriStack योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पिक पाहणी सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्यामधील पीक पाहणी सहाय्यकांची माहिती प्रपत्र व मध्ये देण्यात आली आहे. राज्यामध्ये एकूण ४९,३६६ सहाय्यक यांची नोंद झालेली असून आपले स्तरावरून सदर पीक पाहणी सहाय्यकांपैकी किती कार्यरत आहेत याबाबत आढावा घेणेत यावा.

पीक पाहणी साठी संपर्क
पीक पाहणी सहाय्यकांचे नाव व संपर्क क्रमांक हे आपली चावडी (https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi) या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेले आहेत. सदर याद्यांमधील माहिती आपले स्तरावरून तपासणेत यावी तसेच त्यामध्ये काही बदल झाले असल्यास ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे. सर्व पीक पाहणी सहाय्यकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. तसेच त्यांचे जिल्हा व तालुका स्तरावर प्रशिक्षण पूर्ण झाले असेल अशी या कार्यालयाची धारणा आहे.
पीक पाहणी सहाय्यकामार्फत प्रत्येक गावातील १०० % ओनर्स प्लॉटची पीक पाहणी करून घेण्याची जबाबदारी ही सर्वस्वी जिल्हाधिकारी यांची असल्याने त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करणेत यावी.











