Farewell Speech in Marathi: शाळेचा शेवटचा दिवस असो किंवा ऑफिसचा शेवटचा दिवसनिरोप घेणं नेहमीच कठीण असतं. नमस्कार वाचक मित्रांनो, आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, निरोप समारंभ भाषणे अतिशय प्रभावी आणि हृदयस्पर्शी देत आहे.
निरोप समारंभ भाषणे हे शाळा, महाविद्यालय किंवा ऑफिस मधील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी अशा सर्वांसाठी उपयुक्त ठरतील. तुम्ही तुमच्या ऑफिस मधील शाळा, महाविद्यालय किंवा इतर कार्यक्रमात या खालील भाषणाचा वापर करू शकता.
निरोप समारंभ भाषण नं 1
अधिक भावनिक आणि सुंदर निरोप (समारंभ) समारोप (Best for School/College Farewell Speech in Marathi)
पुज्यनीय शिक्षणाची देवी सावित्रीबाई फुले यांची प्रतिमेला वंदन करत, आजच्या निरोप समारंभाचे सर्व गावकरी, माझे शिक्षण वर्ग बंधू सर तसेच, खाली बसलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आदर प्रणाम.
आज मी पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आज मी आपल्या शाळेतून निरोप घेत आहे, आज माझा निरोपच्या शेवटचा दिवस आहे, हे मला फार दुखण्यासारखा दिवस आहे असा वाटत आहे. आज प्राथमिक शासकीय शाळेत चपराशी पासून तर हेडमास्तर पर्यंत आम्हाला प्रेमाच्या मोहानं बुडविलं आहे.
प्राथमिक शासकीय शाळेत सर्व वर्गाचे विद्यार्थी मिळून खांद्याला खांदा लावून प्रत्येक कार्यक्रमात हातभार लावत होतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणजे विद्येचे माहेर घर आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे माझे मंदिर आहे, या शाळेत माझे मन हळहळत म्हणजे येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना माझ्यापेक्षाही जास्त शिक्षण घ्यावे अशी माझी इच्छा आहे. या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आठवणी सदैव मनात राहणार.
आज सकाळीच शैलेश पावरा हा माझा चौथी चा लहान विद्यार्थी असून त्याने मला एक छान अशी गोष्ट आठवण करून दिली, की तो म्हणाला ‘एक मुलगा जसा आईवडिलांना सोडून शासकीय आश्रम शाळेत लांब शिक्षणासाठी जातो तसेच आम्हा विद्यार्थ्यांचा किस्सा आहे.’ हे एकूण माझे हृदय खालावले, असे म्हणतात मी त्याला देखील म्हणालो जसं ‘मी राहिलो तसेच एक नवीन शिक्षक तुम्हाला माझ्यासारखा किंवा माझ्याहून चांगला तुम्हाला मिळेल.’
शेवटी सर्वाना इतकंच म्हणेन, की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून निरोप घेतोय तुमचा पण माझा विसर पडू देऊ नका.
धन्यवाद!
निरोप समारंभ भाषण नं 2
सन्माननीय शिक्षक, पालक आणि माझ्या क्रांतिवीर भीमा नाईक शासकीय महाविद्यालय मधील प्रिय मित्रांनो,
आजचा दिवस माझासाठी आनंदाचा आहे, पण थोडासा भावनिकही आहे. इथून पुढे आपण प्रत्येक जण पुढे वेगवेगळ्या वाटांवर प्रवास करणार असलो, तरी पुढे या महाविद्यालयाती या सुंदर आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील.
आपल्या या महाविद्यालयाती शिक्षकांनी दिलेल्या शिकवणी, तसेचया महाविद्यालयाती मित्रांसोबत घालवलेले सोनेरी क्षण आणि इथला प्रत्येक अनुभद आपल्याला पुढे मोठे होण्यासाठी मदत करेल. भविष्यात कोणत्याही अडचणी आल्या, तरी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर आपण योग्य मार्गांवर यशस्वी होऊच !
ही फक्त तुमच्यासाठी एक सुरुवात आहे- या महाविद्यालयातुन उंच भरारी घ्या आणि आपल्या मनातील स्वप्नांना साकार करा ! तुम्हा सगळ्यांना उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
निरोप समारंभ भाषण नंबर 3
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, निरोप समारंभ च्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व बंधू-भगिनी. आणि ज्यांना आपण निरोप देतो आहोत असे आदरणीय. सर्वांना माझ्याकडून नमस्कार.
आज आपण एका कर्तव्यदक्ष आणि समर्पित अधिकाऱ्याला/अधिकाऱ्यांना निरोप देण्यासाठी येथे जमलो आहोत. या पोलीस अधिकारी यांनी अनेक वर्षे आपल्या सोबत प्रामाणिकपणे सेवा बजावली आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी मोलाचे योगदान दिले.
या पोलीस अधिकारी यांनी रात्रंदिवस परिश्रम, शिस्तबद्धता आणि जबाबदारी यांचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले. त्यांच्या अतुलनीय कामामुळे अनेकांना सुरक्षित वाटले, आणि पोलीस अधिकारी यांनी संविधानिक कायदा-सुव्यवस्थेच्या पालनात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
आजच्या या क्षणी, आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. यांचा हा नवा प्रवास आनंददायी आणि सुखसमृद्ध असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
निरोप समारंभ भाषण नंबर 4
“आयुष्याच्या प्रत्येक वळणावर . तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढचा प्रवासही हसरा अन्, सुख आनंद देणारा व्हावा.”
आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय निरोपमुर्ती माननीय पाटील सर, प्रमुख पाहूणे, गुरुजनवर्ग, सर्व मान्यवर आणि सरांमुळे स्वतःचे जीवन घडल्याने कृतज्ञतेच्या भावनेने या निरोप समारंभाच्या गौरव सोहळ्यास उपस्थित आपण सर्व – आज सरांचा निरोप व सदिच्छा समारंभ !
“भरून आले वरील आभाळ हळूवार बाजूला सारूयात… आणि आज पासून नविन पावलांवर नव्याने चालूया”
आदरणीय सर म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व, उत्तम संघटन शैली माणि आदर्श शिक्षक अशा अनेक भूमिका साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व.
गेल्या अनेक वषति शाळेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. आम्हा विद्याथ्याच्या ते नेहमीच पाठीशी राहिले.
“आज या शाळेत निरोप तुमचा घेताना, लागे ठेस उरी तुम्ही दिलेले ज्ञान, हीच जन्माची शिदोरी”
निरोप समारंभ चारोळ्या.
- आज निरोपाचा दिवस आहे, हा दिवस थांबवावा वाटला तरी थांबणार नाही, निरोपाचा हा हळवा क्षण, बाहेर निघून गेलो तरी, रेंगाळत राहील या प्रांगणातच माझे मन
- निरोपाच्या सोहळ्याची कधीही करू नये खंत, निरोपानंतरच्या भेरीला नसती कधीच अंत
- बोललो असेल उलटून झाल्या असतील चूका, विसरून सारे दया आशीवदि मनात काही ठेवू नका
- जीव लावले गुरुजनांनी आई-वडिलांसम आम्हाला कसे सांगू किती दुःख होने सीइन जाताना तुम्हाला
- कितीही सुखद आणि दुःखद असली तरी, कुठेतरी संपणारी वाट असते पण संपणाऱ्या वाटेसोबतच. जन्मनारी नवी पहाट असते.
निरोप समारंभ कविता | Farewell Poem I
निरोपाचा हा क्षण
निरोपाचा हा क्षण आला, मन हळवे झाले, त्या गोड आठवणींनी, आज डोळे पाणावले.
खूप हसलो खेळलो गोड जुळले ते नाते, आज जड होते मन, आम्हा वेळ दुरावते.
साथ दिली तुम्ही सर, सुख-दुःखाच्या वळणांवर, कधी मार्गदर्शन तर, कधी हात मदतीस पुढे सर
शब्द अपुरे पडती, मन गहिवरून आले, आयुष्याच्या या वाटेवर, आज मन दुःखी झाले
पुन्हा भेटू कधीतरी, नवी स्वप्नं उराशी, 8 उपरणात हील हा काळ, घेऊ भरारी आकाशी.
निष्कर्ष
आजच्या लेखातून आपण निरोप समारंभ भाषण मधून काय शिकलो?
मित्रांनो, आजच्या लेखात Best Farewell Speech in Marathi for Office And School समाविष्ट आहे. जीवनातील अशा महत्त्वाच्या प्रसंगांसाठी निरोपाचा हा क्षण योग्य आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, ‘निरोप समारंभ भाषण मराठी’ हा लेख उपयुक्त ठरेल.
आम्ही काय दिले आहे किंवा तुम्हाला हे ‘निरोप समारंभ भाषण मराठी’ कसे वाटले ते कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये निरोप समारंभ भाषण बद्दल आम्हाला कळवा. तसेच, जर तुमच्याकडे ‘निरोप समारंभ भाषण मराठी’ या विषयाशी संबंधित काही नवीन कल्पना किंवा कविता असतील तर त्या आमच्यासोबत शेअर करा.
जर तुम्हाला ‘निरोप समारंभ भाषण मराठी’ हा लेख आवडला असेल, तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर (व्हॉट्सअॅप, फेसबुक) शेअर करा. अशाच निरोप समारंभ भाषण मराठी या सारख्या विषयांवर अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.