Grampanchayat Rasta Atikraman Tkrari Arj Kasa Lihava
Grampanchayat Rasta Atikraman Tkrari Arj Kasa Lihava? : गावात लोकांच्या ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण बद्दल अनेक वेळा तक्रारी असतात. परंतु कधीच ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण निघत नाही म्हणून आज आम्ही हि समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण काढण्याबाबत तक्रार अर्जाचा नमुना देत आहे. हा अर्ज वापरून अतिक्रम काढू शकता.
Table of Contents
ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण म्हणजे काय?
ग्रामपंचायत मध्ये गायरान जमीन मध्ये लोकांनी रस्त्यात जागा ताब्यात केले, म्हणजे ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण होय. लोकांना ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण चा कायदा माहित असून देखील स्वत च्या मर्जीने जागा मध्ये अतिक्रम करतात. जेव्हा कायदेशीर नुसार अतिक्रम निघते तेव्हा त्यांचेच नुकसान होते.
ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण काढण्याबाबत तक्रार अर्जाचा नमुना (Grampanchayat Rasta Atikraman Tkrari Arj Namuna Format)
- प्रती,
- सरपंच/ ग्रामविकास अधिकारी
- ग्रामपंचायत (गावाचे नाव लिहा)
- दिनांक :
- अर्जदार : (ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रार दाराचे पूर्ण नाव लिहा)
- विषय : ग्रामपंचायत सार्वजनिक रस्ते आणि गल्ल्या चे अतिक्रमण काढून मिळणे बाबत.
महोदय,
मी, वरील विषय अनुसरून : (ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रार दाराचे पूर्ण नाव लिहा) सदर या गावाचा रहिवासी असून, माझा गल्लीत चार महिन्यापासून अतिक्रमण केले आहे. तो सार्वजनिक रस्ता असून तेथील लोकांनी गल्ली पूर्णतः बंद करून ठेवल्या आहे. मलाच नाही तर तेथे येणारे जाणारे लोकांना रस्ता, नाही, त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तरी महोदय यांना विनंती आहे की, मागील कित्येक वर्ष झाले, ग्रामपंचायत ही गायरान जमीन असून सदर मोकळी जागा होते, येथे दोन पदरी रस्ता बनेल असा रस्ता होता. परंतु आता सध्या या ठिकाणी ये जा करण्यासाठी कुठलाच रस्ता नाही, त्या मुळे आम्हांला त्रास सहन करावा लागतो.
तरी महोदय यांना विनंती आहे की, आपल्या गावातील ग्रामपंचायत मधील गल्ली नंबर, सार्वजनिक रस्ते आणि गल्ल्या चे अतिक्रमण काढून मिळावे ही नम्र विनंती.
- (तक्रार दाराचे नाव लिहा )
- (मोबाईल नं लिहा)
गट विकास अधिकारी यांना अतिक्रमण काढण्याबाबत तक्रार अर्ज | BDO Grampanchayat Rasta Atikraman Tkrari Arj Namuna
- प्रती,
- मा. सो. गट विकास अधिकारी पंचायत समिती
- (तालुक्याचे नाव लिहा ) यांच्या सेवेशी.
- दिनांक :
- अर्जदार : (ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रार दाराचे पूर्ण नाव लिहा)
- विषय : (गावाचे नाव लिहा) ग्रामपंचायत सार्वजनिक रस्ते आणि गल्ल्या चे अतिक्रमण काढून मिळणे बाबत.
महोदय,
मी वरील विषयाअनुसरून (गावाचे नाव लिहा) (ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रार दाराचे पूर्ण नाव लिहा) (सोबत मोबाईल नंबर लिहा ) सदर माझा गावात गल्ली नं. या ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे, मी दिनांक ( सरपंच/ ग्रामविकास अधिकारी यांच्या कडे केलेल्या तक्रारी ची तारीख टाका. ) रोजी माझा (गावाचे नाव लिहा, ) ग्रामपंचायतला सार्वजनिक रस्ते आणि गल्ल्या चे अतिक्रमण काढून मिळावे या साठी तक्रारी अर्ज केला, परंतु तेथील रस्ता काढून मिळालेला नाही. या उलट मलाच दमदाटी करून अर्ज मागे घेणासाठी लोकांना माझा घरापर्यंत पाठविण्यात आले.
सदर आपल्या पंचायत समिती कढून अधिकारी नेमण्यात यावे. किंवा आपणच (गावाचे नाव लिहा. ) या गावात येऊन गल्ली नं. ची पाहणी करावी आणि आज मी केलेल्या तक्रारी ची किती सत्यता आहे ते देखील पाहावे.
मा. महोदय मी दिनांक : (तारीख टाका ) रोजी केलेल्या तक्रारी वरून आपल्या स्तरावरून ग्रामविकास अधिकारी यांच्या वर कार्यवाही करावी आणि ग्रामसेवक यांच्या वर केलेल्या कार्यवाही ची एक प्रत मला देखील देण्यात यावी ही नम्र विनंती.
- (तक्रार दाराचे नाव लिहा)
- (मोबाईल नं लिहा.)
ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण तक्रार कुठे सादर करावी?
Grampanchayat Rasta Atikraman Tkrari Arj सादर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायतला तक्रारी अर्ज सादर करावा. सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही, तर आपल्या तालुका पंचायत समिती ला तक्रारी अर्ज सदर करावा. जर का ३० दिवसांनी कोणतेही कार्यवाही झाली नाही तर आपल्या जिल्हा परिषद कार्यालयाला तक्रारी अर्ज करा.
ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण तक्रार कोणाकडे करावी?
सर्वप्रथम आपण आपल्या जवळील ग्रामपंचायतला सरपंच आणि ग्रामसेवक यांना लेखी तक्रारी अर्ज करावा. जर का सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कोणतीही एक कार्यवाही केली नाही तर आपल्या जवळील तालुका पंचायत समिती यांना सरपंच आणि ग्रामसेवक बद्दल तक्रारी अर्ज करा.
Online Grampanchayat Rasta Atikraman Tkrari Arj Namuna : ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण तक्रार कशी करावी? (Step-by-Step)
- सर्वप्रथम गुगल वर आपले सरकार तक्रार पोर्टल सर्च करा.
- आपले सरकार तक्रार पोर्टल वर नोंदणी असेल तर लॉग इन करा.
- आपला जिल्हा निवडा
- आपला तालुका निवडा
- आपले गाव निवडा
- ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण तक्रार अर्ज २०० हजार शब्दांत लिहा.
- सरपंच , ग्रामसेवक , गट विकास अधिकारी यांना केलेल्या तक्रारी अर्ज pdf अपलोड करा.
- शेवटी पूर्वावलोकन करा.
ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रार अर्ज कसा लिहावा? पहा नमुना PDF : Grampanchayat Rasta Atikraman Tkrari Arj Kasa Lihava? Namuna Pdf
Related Post : Sutti Arj Marathi | सुट्टी मिळणे साठी अर्ज नमुना मराठी
FAQ
ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण काढण्याचा अधिकार कोणाला आहे?
ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण काढण्याचा अधिकार सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांना आहे. (Grampanchayat Rasta Atikraman Tkrari Arj In Marathi)
ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण तक्रार केल्यावर किती दिवसात कारवाई होते?
ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण तक्रार केल्यावर साधारणतः १५ ते ३० दिवसात कारवाई होते. (Grampanchayat Rasta Atikraman Tkrari Arj In Marathi)
ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण बाबत ग्रामसेवकाने तक्रार ची दखल न घेतल्यास काय करावे?
ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण बाबत ग्रामसेवकाने तक्रार ची दखल न घेतल्यास गट विकास अधिकारी यांना ग्रामसेवक बद्दल तक्रारी करा.