जन्म दाखला अर्ज नमुना मराठीत शोधत आहात का? या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उत्तम असा Janm Dakhala Arj In Marathi. जन्म दाखला अर्ज नमुना मराठीत अत्यंत प्रभावी आणि सोप्या भाषेतील माहिती देत आहे. Janm Dakhala Arj In Marathi वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी आत्ताच क्लिक करा!”
जन्म दाखला अर्ज नमुना 1
मा. सो. मुख्य अधिकारी महानगरपालिका
नवी मुंबई
नोंदवही ३ डिसेंबर २०२६
विषय : जन्म दाखला मिळण्याबाबत विनंती.
आदरणीय महोदय/महोदया,
मी शैलेश पावरा राहणार नवी मुंबई तुम्हाला विनंती करण्यासाठी हा अर्ज लिहित आहे की, कृपया माझ्या नवजात मुली दिपाली चा जन्म दाखला जारी करावा. माझ्या मुलीचा जन्म २ नोव्हेंबर रोजी के. के. हॉस्पिटल, नवी मुंबई येथे झाला आणि आम्ही १० नोव्हेंबर रोजी जन्म दाखला नोंदणी अर्ज भरला होता, म्हणजेच तिच्या जन्मानंतर १९ दिवसांच्या आत. मी अर्जासोबत फॉर्मची आणि के. के. हॉस्पिटलच्या डिस्चार्ज स्लिपची प्रत जोडली आहे. पालकांची नावे अनुक्रमे श्री. शैलेश पावरा आणि श्रीमती जमुना शैलेश पावरा आहेत.
कृपया मी तुम्हाला विनंती करतो की, जन्म दाखला जारी करावा आणि त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
आपला विश्वासू
श्री. शैलेश पावरा
जन्म दाखला अर्ज नमुना 2
मा. सो. पंचायत सचिव, देवळा ग्रामपंचायत
नवी मुंबई
विषय: जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज.
महाशय
मी नम्रपणे विनंती करतो की मी शैलेश पावरा राहणार नवी मुंबई गाव प्रभाग क्रमांक १५ चा कायमचा रहिवासी आहे. मला मुलगा हर्ष शैलेश पावरा व माझ्या मुलासाठी जन्म प्रमाणपत्र हवे आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत:
वडिलांचे नाव: श्री. शैलेश लालीसंग पावरा
आईचे नाव: श्रीमती जमुना शैलेश पावरा
जात : अनुसूचित जमाती
रहिवासी : देवळा ग्रामपंचायत नवी मुंबई
मुलाचे नाव:- हर्ष शैलेश पावरा
मुलाची जन्मतारीख:- १० /०१/२०२६
मी तुम्हाला विनंती करतो की कृपया मला माझ्या हर्ष शैलेश पावरा मुलासाठी जन्म प्रमाणपत्र द्या. ज्यासाठी मी कायमचा आभारी राहीन.
जन्म दाखला अर्ज नमुना 3
प्रति,
पंचायत सचिव, महोदय.
रोहिणी ग्रामपंचायत
विषय: जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज.
महोदय,
मी नम्रपणे विनंती करतो की मी राहुल पावरा राहणार रोहिणी ग्रामपंचायत, नवापाडा परिसर, ता. शिरपूर जिल्हा धुळे, येथील कायमचा रहिवासी आहे. मला देवदत पावरा या माझ्या मुलासाठी जन्म प्रमाणपत्र हवे आहे. सर्व आवश्यक तपशील खालीलप्रमाणे आहेत.
मुलाचे नाव : देवदत राहुल पावरा
जन्मतारीख : ०५/०१/२०२६
वडिलांचे नाव : श्री. राहुल शम्म पावरा
आईचे नाव : श्रीमती दुर्गा राहुल पावरा
जन्मस्थान : रोहिणी ग्रामपंचायत
लिंग : पुरुष
जात : अनुसूचित जमाती
म्हणून, मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की कृपया मला देवदत पावरा या माझ्या मुलासाठी मला जन्म प्रमाणपत्र द्या. मी याबद्दल कायम आभारी राहीन.
तुमचे विनम्र
नाव – श्री. राहुल शम्म पावरा
पत्ता : रोहिणी ग्रामपंचायत
जन्म प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे
- 1. हॉस्पिटलचा जन्म अहवाल / सर्टिफिकेट
- 2. आई-वडिलांचे आधार कार्ड
- 3. राहत्या पत्त्याचा पुरावा (आधार, रेशन कार्ड, वीजबिल इ.)
- 4. विवाह दाखला (लागू असल्यास)
- 5. साक्षीदाराचा दाखला / शपथपत्र (घरात जन्म झाल्यास)
- 6. पासपोर्ट साईझ फोटो (काही ठिकाणी आवश्यक)
जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज 4 – ग्रामपंचायत / नगरपालिका / महापालिका कार्यालयात किंवा ऑनलाइन
मा. सो. श्री. महानगरपालिका अधिकारी, औरंगाबाद
यांच्या सेवेशी
विषय: जन्म प्रमाणपत्रावरील नाव बदलण्यासाठी अर्ज.
महोदय,
मी नम्रपणे विनंती करतो की मी, दीपक दुरोधन , देवपूर गावचा रहिवासी आहे. महोदय, मी माझ्या कुमारी दीपाली दीपक दुरोधन मुलीच्या जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मला तो आज आपल्या कार्यालयातून मिळाला. तथापि, या जन्म प्रमाणपत्रात, माझ्या मुलीचे नाव दिपाली वरून शिवानी असे बदलले आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. मी ते कसे दुरुस्त करायचे ते विचारले आणि त्यांनी मला सांगितले की मला जन्म दाखला विनंती अर्ज कसा करायचा ते शिकावे लागेल. म्हणून, मी जन्म प्रमाणपत्रातील चूक दुरुस्त करण्यासाठी या अर्जाचा वापर करत आहे.
म्हणून, महोदय, मी तुम्हाला माझ्या मुलीचे जन्म प्रमाणपत्रावरील नाव दुरुस्त करण्याची विनंती करतो. यासाठी मी नेहमीच आभारी राहीन. धन्यवाद.
जन्म दाखला अर्ज नमुना 5
प्रति,
मा. सो. जन्म नोंदणी अधिकारी, शिक्रापूर
नगरपालिका/महानगरपालिकेचे नाव], पुणे.
विषय: जन्म प्रमाणपत्रातील नावात दुरुस्ती करण्याबाबत अर्ज
आदरणीय महोदय/महोदया,
मी माझ्या पूनम पावरा या मुलीच्या जन्म प्रमाणपत्रात नाव दुरुस्त करण्याची विनंती करण्यासाठी हा अर्ज लिहित आहे. प्रमाणपत्रात नाव जुने नाव पूर्वा असे नोंदवले गेले आहे, परंतु योग्य नाव पूनम पावरा आहे.
कृपया जन्म प्रमाणपत्रात योग्य नावाची नोंद करून ते अद्ययावत करावे. मी आपल्या माहितीसाठी आवश्यक ते दवाखान्याची कागदपत्रे सोबत जोडत आहे.
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
आपला विश्वासू,
रोहिदास पावरा
शिक्रापूर पुणे
Janm Dakhala Arj In Marathi PDF
निष्कर्ष
आजच्या लेखातून आपण जन्म दाखला अर्ज बद्दल काय शिकलो?
मित्रांनो, आजच्या लेखात Janm Dakhala Arj In Marathi समाविष्ट आहे. जीवनातील अशा महत्त्वाच्या प्रसंगांसाठी जन्म दाखला अर्ज आजचा दिवसा चा हा क्षण योग्य आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, ‘नवीन पासबुकसाठी अर्ज कसा लिहावा मराठी’ हा लेख उपयुक्त ठरेल.
आम्ही तुमच्या साठी काय दिले आहे किंवा तुम्हाला हे ‘जन्म दाखला अर्ज कसा लिहावा मराठी’ कसे वाटले ते कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये ‘जन्म दाखला अर्ज कसा लिहावा’ या बद्दल आम्हाला कळवा. तसेच, जर तुमच्याकडे ‘Janm Dakhala Arj In Marathi’ या विषयाशी संबंधित काही नवीन कल्पना असतील तर त्या आमच्यासोबत शेअर करा.
जर तुम्हाला ‘जन्म दाखला अर्ज कसा लिहावा मराठी’ हा लेख आवडला असेल, तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर (व्हॉट्सअप्स , फेसबुक) शेअर करा. अशाच Janm Dakhala Arj In Marathi या सारख्या विषयांवर अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
जन्म दाखला कुठे काढायचा?
जन्म दाखला हा ग्रामीण भागातील लोकांनी ग्रामपंचायत मधून तर शहरी भागातील लोकांनी नगरपालिका, महानगरपालिका मधून काढायचा असतो.
माझ्याकडे जन्म दाखला नसेल तर काय करावे?
जर तुमच्या कडे जन्म दाखला नसेल तर वकीला मार्फत कोर्टातून काढता येतो.
जन्म दाखल्यातील चुकीचे स्पेलिंग कसे दुरुस्त करावे?
जन्म दाखल्यातील चुकीचे स्पेलिंग दुरुस्त करण्यासाठी हाताने विनंती अर्ज लिहून करावे.
महाराष्ट्रात जन्म दाखल्यात नाव कसे जोडायचे?
महाराष्ट्रात जन्म दाखल्यात नाव हा ग्रामीण भागातील लोकांनी ग्रामपंचायत मधून तर शहरी भागातील लोकांनी नगरपालिका, महानगरपालिका मधून जोडायचे असतो.