वनहक्क प्रमाणपत्र धारक शेतकर्त्यांसाठी नवीन योजना सुरु झालेली आहे. Kusum Mahaurja Saur Krishi Pump Yojana आता वनहक्क प्रमाणपत्र धारक शेतकऱ्यांना त्यांच्या वनपट्टे मधील शेतात सौर कृषी पंप बसवता येणार आहे. त्यासाठी kusum mahaurja च्या वेबसाईट वरून ऑनलाइन अर्ज मागविले जात आहे. तर कुसुम सौर कृषी पंप या योजनेची माहिती आपन या लेख मध्ये बघणार आहोत.
कुसुम सौर कृषी पंप योजना – Kusum Mahaurja Saur Krishi Pump Yojana
कुसुम सौर कृषी पंप योजना अशा शेतकऱ्यांसाठी आहे. ज्यांच्याकडे वनहक्क प्रमाणपत्र आहे , आणि पाण्याचे विश्वसनीय स्त्रोत आहेत, परंतु शेतात सिंचनासाठी महावितरण कडून वीज उपलब्ध नाही. वनहक्क प्रमाणपत्र धारक शेतकरी या योजनेंतर्गत शेतात सिंचनासाठी कुसुम सौर कृषी पंप च्या मदतीने शासन अनुदान देऊन शेतात सोलर पंप बसवण्यात येणार आहेत.
योजनेची ठळक वैशिष्टे
- वनहक्क प्रमाणपत्र धारक शेतकऱ्यांना सिंचनाचा अधिकार मिळावा याची खात्री देणारी स्वयंपूर्ण कुसुम सौर कृषी पंप योजना.
- फक्त 10% खर्च देऊन वनहक्क प्रमाणपत्र धारक शेतकरी सौर पॅनेलचा संपूर्ण संच आणि कृषी पंप मिळवू शकतात.
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी, फक्त 5% रुपये भरावे लागतील.
- उर्वरित खर्च भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार करतात.
- जमिनीच्या आकारानुसार 3 HP पासून ते 7.5 HP पर्यंतचे व सध्या १० HP पंप दिले जातील.
- सौर पॅनेलचा विम्यासह कंपनी हे 10 वर्षांच्या दुरुस्तीची हमी समाविष्ट आहे.
- वाढीव वीज बिल किंवा शेतातील वीज कपातीची काळजी करण्याची गरज नाही.
- दिवसा सिंचन वापरासाठी हमी दिली जाते.
लाभार्थी निवडीचे निकष
- वन पट्टे धारक शेतकरी यांच्या कढील प्रमाणपत्रात कक्ष हे साधारणता 1.50 एकरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 3 हॉर्सपॉवर (3.HP) पर्यंतचे सौर पंप मिळतील.
- वन पट्टे धारक शेतकरी यांच्या कढील प्रमाणपत्रात कक्ष 2.50 ते 3 एकर जमीन असलेल्या वनपट्टे धारक शेतकऱ्यांना ५ एचपी (5.HP) पंप मिळणार आहेत.
- वन पट्टे धारक शेतकरी यांच्या कढील प्रमाणपत्रात कक्ष 3 ते 5 एकर जमीन असलेल्या वन पट्टे धारक शेतकऱ्यांना 7 एचपी (7.HP) पंप मिळणार आहेत.
- वन पट्टे धारक शेतकरी यांच्या कढील प्रमाणपत्रात कक्ष 5 पेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना 10 HP पंप मिळणार आहेत. (वन पट्टे धारक शेतकरी त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी उर्जा असलेला पंप देखील निवडू शकतात.)
- वन पट्टे धारक शेतकरी स्वता त्याच्या नावाने किंवा परिवारातील सदस्य चा नावे असेल तरीहि फोर्म भरता येणार मात्र वन पट्टे धारक शेतकरी कडे बोअरवेल,शेततळे, विहिरी, आणि नद्या किंवा नाल्या असायला पाहिजे तेव्हाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- वन पट्टे धारक शेतकरी विहिरी, बोअरवेल किंवा नद्या असलेल्या शेतकऱ्यांकडे त्यांच्या जागेवर पाण्याचा विश्वसनीय स्रोत असणे आवश्यक आहे. (तथापि, वन पट्टे धारक शेतकरी संवर्धनासाठी असलेल्या जलाशयांमधून पाणी घेण्यासाठी पंप वापरता येत नाहीत.)
- ज्या वन पट्टे धारक शेतकऱ्यांनी मागील ५ वर्षा पूर्वीच्या सौर पंप योजनांचा लाभ घेतला नाही ते अजूनही कुसुम सौर कृषी पंप योजना या मोहिमेसाठी अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे
- शेतक-यांकडे असलेल्या शेतीचा वनहक्क प्रमाणपत्र आवश्यक आहे. वनहक्क प्रमाणपत्र अर्जदार स्वत: शेतजमिनीचा एकटा मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा / वनहक्क प्रमाणपत्र मालकांचा ना हरकत दाखला रु.२००/- च्या स्टॅम्प पेपर वर देणे बंधनकारक आहे.
- वनहक्क प्रमाणपत्र धारकाचे आधारकार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- SC / ST(अनुसुचित जाती/ जमाती लाभार्थींसाठी)
- पाण्याचा स्त्रोत असल्याच्या तलाठी चा दाखला.
- भूजल नकाशा वन समिती सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
Note – सर्व कागदपत्रे 500 KB pdf फाईल मध्ये अपलोड करावीत ज्यांची साइज पेक्षा जास्त नसावीत.
Kusum Mahaurja Saur Krishi Pump Yojana Apply Online, ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
कुसुम सौर कृषी पंप योजनेला अर्ज करण्यासाठी अधिकृत KUSUM MAHAURJA पोर्टल जा त्यानंतर लाभार्थी सुविधा या टॅब वर क्लिक करून अर्ज करा या बटनावर क्लिक करा.

Kusum Mahaurja Saur Krishi Pump Yojana Apply Online Official Website
अर्जामध्ये वनहक्क प्रमाणपत्र धारकाचे वैयक्तिक नाव असावे. आणि वन धारकाचे जमिनीची माहिती, आधार कार्ड वरील रहिवासी पत्ता, तलाठी यांचे जलस्तोत्र चा दाखला / वन पट्टे मध्ये सिंचन स्रोत ची नोंद माहिती, अगोदर असलेल्या वन समिती चा पंपाचा पंच नामा तपशील, वन अधिकारी यांचा लागणाऱ्या पंपाचा तपशील, राष्ट्रीय कृत बँक तपशील, पाणी असल्याचा घोषणापत्र आणि विचारलेले सर्व कागदपत्रे अपलोड करून शेवटी अर्ज Submit करा.
Kusum Mahaurja Saur Krishi Pump Yojana Status Check
अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला MK नंतर दहा अंकी नंबर असेल ती पोचपावती मिळेल. ज्याचा मोबाईल नंबर चा वापर करून ऑनलाईन अर्ज केला असेल तो व्यवस्थित सांभाळून ठेवा. कारण सध्याची अर्जाची स्थिती कधीहि पाहू शकता आणि विचारलेल्या वेळी ऑनलाईन रक्कम भरणा करू शकता.

Kusum Mahaurja Saur Krishi Pump Yojana Status Check
Kusum Mahaurja Saur Krishi Pump Yojana Payment
कुसुम सौर कृषी पंप योजनेचा अर्ज केल्यानंतर Meda च्या ऑफिस मध्ये नाव सिलेक्शन होते, नंतर ऑनलाईन अर्ज केलेल्या मोबाईल वर SMS सोडले जाते, व Kusum Mahaurja Saur Krishi Pump Yojana Payment १५ दिवसाच्या आत भरणे सांगितले जाते.
हेल्पलाइन नंबर
एखाद्या वनहक्क प्रमाणपत्र शेतकऱ्याला ऑनलाइन अर्ज करताना अडचण आल्यास त्यांनी जवळच्या सेतू केंद्राला किंवा जिल्ह्याच्या MEDA च्या कार्यालयाशी संपर्क साधावा. ते MEDA च्या केंद्रीय कामे करत असतात. किंवा आपले सरकार च्या सेवा केंद्राशीही संपर्क साधू शकतात. मदतीसाठी वनहक्क प्रमाणपत्र शेतकरी १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ या टोल-फ्री नंबरवर कॉल करू शकतात.
निकष
काही वेळेस कुसुम सौर कृषी पंप योजनेला अर्ज सबमिट न झाल्यास, सकाळी ८ वाजता किंवा रात्री ८ वाजता फोर्म भरावा. फोर्म सबमिट देखील होईल, आणि Kusum Mahaurja Saur Krishi Pump Yojana चा ऑनलाईन देखील फॉर्म भरला जाईल. कुसुम सौर कृषी पंप योजनेचा अर्ज कसा करावा आणि केव्हा भरावा ते तुम्हाला समजलेच असेल. अशाच शासकीय योजनेचा माहिती साठी आमच्या सोसिअल मिडीयाला कायम जोडून राहा.