शेतकरी सुविधा केंद्र उभारणी करणे: Best Shetkari Suvidha Kendra in Marathi 2026
Shetkari Suvidha Kendra in Marathi : या घटकांतर्गत शेतीचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने राज्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी/गट यांच्या सहभागातून शेतीसाठी उपयुक्त संसाधनांचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने राज्यात २७७८ शेतकरी सुविधा केंद्रे उभारण्यास मान्यता देण्यात येत आहे. कृषि विभागामार्फत प्रचलित योजनांच्या माध्यमातून ज्या विविध सुविधा पुरविल्या जातात, त्या सुविधा या एकाच घटकाच्या माध्यमातून देण्यात येतील,
Table of Contents
Shetkari Suvidha Kendra in Marathi शेतकरी सुविधा केंद्र उभारणी करणे उद्दिष्टे:-
- १. शेतकऱ्यांना सामुदायिक स्वरुपात शेतीसाठी आवश्यक त्या सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करुन देणे.
- २. जमीन सुपीकता वाढवणे.
- ३. जैविक निविष्ठांचे उत्पादन ग्राम स्तरावर करून शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे.
- ४. ग्राम स्तरावर अवजारे बैंक च्या माध्यमातून शेतक- यांना कमीत कमी खर्चामध्ये शेतीमधील श्रम कमी करणारी, वेळ आणि खर्चाची बचत करणारी औजारे व यंत्रसामुग्री माफक दरामध्ये उपलब्ध करुन देणे,
- ५. स्थानिक परिस्थितीनुरुप ग्राम स्तरावर उपलब्ध होणा-या शेतीमालाचे संकलन, प्रतवारी, साठवणूक, प्रक्रिया व विपणनासाठी सामुदायिक सुविधा निर्माण करणे.
- ६. ग्राम स्तरावर रोजगार निर्मिती वाढविणे.
- ७. स्थानिक स्तरावर कीड व रोगाचे सर्वेक्षण आणि विश्लेषण करुन, त्या अनुषंगाने कमी खर्चिक सामुदायिक नियंत्रण पध्दतीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करुन देणे.
- ८. सामुदायिक पद्धतीची सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी सहाय्य करणे.
शेतकरी सुविधा केंद्र उभारणी करणे स्वरुप :- Shetkari Suvidha Kendra in Marathi
या बाबी मध्ये नमूद केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, प्रस्तावित बाबींची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी राज्यात एकूण २७७८ शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करण्यात येईल. उत्पादक कंपनीला घटकनिहाय देय अनुदानाच्या मर्यादेत कामाच्या प्रगतीनुसार तीन वर्षाच्या कालावधीत अनुदान देण्यात येईल. यामध्ये सर्वसाधारण प्रकल्पमूल्य रुपये ३.०० कोटी असेल. याहून अधिक प्रकल्पमूल्य असल्यास, उर्वरित खर्च शेतकरी उत्पादक कंपनीने स्वतः करणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांतील सर्व शेतकऱ्यांना या घटकाचा लाभ देणे कंपनीस बंधनकारक राहील. अशाप्रकारे, २७७८ शेतकरी सुविधा केंद्रांसाठी अधिकतम रु.५००० कोटी इतके अनुदान देय राहील.
अंमलबजावणीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची निवड करण्याचे निकष व कार्यपध्दती:- Shetkari Suvidha Kendra in Marathi
- १. शेतकरी उत्पादक कंपनी भारतीय नोंदणी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- २. माहे ऑक्टोबर, २०२५ अखेर कंपनीस ३ वर्ष पूर्ण झालेली असणे बंधनकारक राहील.
- ३. जिल्हास्तरावर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावातून कंपनीच्या कार्यक्षमतेच्या आधारे मुल्यांकन करून जिल्हास्तरीय समिती मार्फत कंपनीची निवड करण्यात येईल.
- ४. कंपनीच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांपैकी कंपनीचे जिथे सर्वाधिक सभासद आहेत, ते गाव मुख्यालय म्हणून घोषित करून कार्यक्षेत्रातील किती क्षेत्रासाठी व किती शेतकऱ्यांना शेतकरी सुविधा केंद्राचा लाभ दिला जाईल याची माहिती सादर करणे आवश्यक राहील.
- ५. जिल्हास्तरीय समितीने कंपनीची निवड केल्यानंतर एक महिन्याच्या आत कंपनीने, प्रकल्प अहवालाच्या २०% रक्कम, कंपनीच्या अकाउंटला जमा करणे आवश्यक राहील. ज्या ठिकाणी कंपनी स्वःहिश्श्याची रक्कम बँक कर्ज स्वरूपात उभारणार असेल, अशा ठिकाणी कंपनी निवड झाल्यानंतर एक महिन्याच्या आत बँकेकडून तत्त्वतः कर्ज मंजुरी पत्र (In principle sanction letter) प्राप्त करून सादर करणे आवश्यक राहील. तथापि, या मंजुरी पत्रासोबत प्रकल्प अहवालाच्या १० टक्के कंपनी हिश्श्याची रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा करणे देखील अनिवार्य राहील. यापुष्ट्यर्थ दस्तऐवजासह सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्वसंमतीकरिता, तालुका कृषी अधिकारी कार्यालयास सादर करणे आवश्यक राहील, कंपनी निवड ही पूर्वसंमती ग्राह्य धरली जाणार नाही.
- ६. जिल्ह्यासाठी विहित लक्षांकापेक्षा जास्त प्रस्ताव प्राप्त झाल्यास, कंपनीच्या कार्यक्षेत्रातील पीक पद्धती, कंपनीची कार्यक्षमता, शेतकऱ्यांच्या समस्या व आवश्यक तंत्रज्ञान, कोरडवाहू क्षेत्राची व्याप्ती इत्यादी बाबींचा विचार करून जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे मूल्यांकन करून त्याआधारे कंपनीची निवड करावी.
- ७. जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या लक्षांकापेक्षा जास्त प्रस्ताव प्राप्त झाल्यास कंपनीच्या कार्यक्षेत्रातील पीक पद्धती, कंपनीची कार्यक्षमता, शेतकऱ्यांच्या समस्या व आवश्यक तंत्रज्ञान. कोरडवाहू क्षेत्राची व्याप्ती इत्यादी बाबींचा विचार करून जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे मूल्यांकन करून त्याआधारे कंपनीची निवड करावी.
- ८. कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल.
शेतकरी सुविधा केंद्र उभारणी करणे अंमलबजावणीची कार्यपध्दती:- Shetkari Suvidha Kendra in Marathi
- १. जिल्हास्तरावर संबंधित विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक आणि राज्यस्तरावर आयुक्त, कृषि यांच्या अध्यक्षतेखाली योजना संनियंत्रण व अंमलबजावणी समित्या स्थापन करण्यात येतील.
- २. कृषी आयुक्तालयामार्फत प्रकल्प संचालक, आत्मा यांना जिल्हानिहाय लक्षांक कळविण्यात येईल.
- ३. इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी आपला अर्ज संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयास सादर करेल.
- ४. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त अर्जाची छाननी करून प्रस्ताव प्रकल्प संचालक, आत्मा, कार्यालयास सादर करण्यात येईल.
- ५. प्रकल्प संचालक, आत्मा, कार्यालयामार्फत योजनेच्या जिल्हास्तरीय समिती पुढे सर्व अर्ज ठेऊन प्राप्त अर्जामधून पात्र असणाऱ्या कंपनीची निवड जिल्हास्तरीय समिती करेल.
- ६. जिल्हास्तरीय समितीमार्फत निवड झालेल्या कंपनीला, प्रकल्प संचालक, आत्मा, कंपनीच्या नावे निवड पत्र देण्यात येईल.
- ७. निवडपत्र दिल्यानंतर १ महिन्याच्या आत योजनेच्या निकषानुसार आवश्यक दस्तऐवजांसह सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्व संमतीकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालयास सादर करावा.
- ८. कंपनीमार्फत प्राप्त होणाऱ्या सविस्तर प्रकल्प अहवालाची छाननी, प्रकल्प संचालक, आत्मा, कार्यालयामार्फत करण्यात येईल व प्राप्त प्रस्तावातील पात्र बाबी राबविण्याकरता जिल्हास्तरीय समितीमार्फत अंतिम मान्यता देण्यात येईल.
९. कंपनीचे दैनंदिन कामकाज, तसेच, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व योजनेची अंमलबजावणी करणे ही कामे करण्यासाठी, कंपनीस एका कंत्राटी व्यवस्थापकाची, तसेच, कंपनीच्या नियमित आर्थिक व्यवहारांचे काम करण्यासाठी कंत्राटी अकाऊंटंटची नेमणूक करणे आवश्यक राहील. कंपनीचा व्यवस्थापक हा Agriculture/Horticulture/ABM तत्सम विषयातील तज्ञ असणे आवश्यक राहील.
व्यवस्थापक व अकाऊटंट यांच्या निवडीचे पॅनल विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत निश्चित करून देण्यात येईल. या पॅनल मध्ये समाविष्ट असणाऱ्यापैकीच, व्यवस्थापक व अकाऊंटंटची निवड करणे कंपनीस बंधनकारक असेल. कोणत्याही परिस्थितीत या पॅनल बाहेरील कोणत्या व्यक्तीस व्यवस्थापक व अकाऊंटंट म्हणून नेमता येणार नाही. व्यवस्थापक व अकाऊंटंट यांची मानधन निश्चिती कंपनी करेल. व्यवस्थापक यांना प्रतिमाह किमान रु.१०,०००/- व अकाऊटंट यांना प्रतिमाह किमान रु. ८०००/- याप्रमाणे, मानधन कंपनीमार्फत देय राहील.
Shetkari Suvidha Kendra in Marathi PDF
शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा :- Shetkari Suvidha Kendra in Marathi
- १. जागा उपलब्धता :- शेतकरी सुविधा केंद्र (Shetkari Suvidha Kendra in Marathi)स्थापन करण्यासाठी कंपनीच्या नावे किंवा किमान १० वर्षाच्या भाडेकरार तत्त्वावर जागा उपलब्ध करुन घेणे किंवा ग्रामपंचायती कडील उपलब्ध असलेल्या जागा सुविधा केंद्रास उपलब्ध करुन घेणे अनिवार्य राहील.
- २. बांधकाम शेतकरी सुविधा केंद्र संचलित करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री, प्रयोगशाळा, साठवणूक केंद्र, संकलन केंद्र, प्रतवारी केंद्र, (Shetkari Suvidha Kendra in Marathi) शीतवाहन याशिवाय त्या गावच्या स्थानिक शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आवश्यक असणाऱ्या सुविधा निर्माण करण्यासाठी किमान ५००० चौरस फूट क्षेत्रावर बांधकाम करता येईल. त्यापैकी १५०० चौरस फूट क्षेत्र हे प्रयोगशाळा, कार्यालय व जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र याकरीता अनिवार्य बांधकाम राहील.
शेतकरी सुविधा केंद्र उभारणी करणे अनिवार्य बाबी :-
बांधकामः- या बाबी अंतर्गत कंपनीचे कार्यालय, मृद चाचणी प्रयोगशाळा, जैव निविष्ठा उत्पादन केंद्र, तसेच, अवजारे बैंक मधील अवजारे ठेवण्यासाठी बांधकाम, तसेच, कंपनीस इतर आवश्यक बांधकामांचा समावेश राहील. या घटकांतर्गत उच्चतम १५०० चौरस फुटांचे बांधकाम करता येईल.
मृदा नमुना तपासणी प्रयोगशाळा (Mini soil testing Lab):- भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR) या संस्थेमार्फत प्रमाणित करण्यात आलेल्या मृद चाचणी प्रयोगशाळा या घटकांतर्गत घेता येतील. यामध्ये मृद चाचणी उपकरण संच व आवश्यक रसायने यांचा समावेश राहील. या प्रयोग शाळेमध्ये गावातील शेतकऱ्यांचे माती नमुने सशुल्क तपासून देणे व तपासणी करण्यात येणाऱ्या नमुनांची Soil Health Card portal (Shetkari Suvidha Kendra in Marathi) नंबर नोंदणी करणे कंपनीस बंधनकारक राहील. माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या दृष्टीने संस्थांची निवड, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने मान्यता दिलेल्या संस्थांमधून ompanelment च्या माध्यमातून करण्यात येईल.
शेतकरी सुविधा केंद्र उभारणी करणे जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र (BRC):-
या घटकाची अंमलबजावणी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येईल.
भाडेतत्त्वावर कृषी अवजारे उपलब्धता केंद्र नाफक दरामध्ये शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, अवजारे व ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी सामुदायिक अवजारे बैंक स्थापन करणे आवश्यक आहे. कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेमधील सर्व पात्र उपकरणे व त्यामधील किमतीचे मापदंड ग्राह्य राहतील. कंपनीस कोणत्या यंत्राची व अवजारांची आवश्यकता आहे, याबाबत स्थानिक पीक पद्धतीनुसार (Shetkari Suvidha Kendra in Marathi) निश्चिती कंपनीने करावी. त्याबाबत लेखी स्वरुपात, प्रकल्प संचालक, आत्मा, कार्यालयास कळवावे. कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेमधील नियमावलीनुसार अवजारे खरेदी पूर्ण करावी.
एकात्मिक कीड नियंत्रण उपाययोजना या घटकांतर्गत जैविक कीड नियंत्रण करण्यासाठी आवश्यक असणारे प्रकाश सापळे, कामगंध सापळे आणि lures व इतर आवश्यक जैविक व अन्नद्रव्य घटक इ. शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. याकरिता केंद्र शासन व विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रचलित योजनांमध्ये विहित केलेले अनुदान देय राहील.
गावाच्या निकडीनुसार आवश्यक बाबी (ऐच्छिक बाबी):
गावामध्ये उत्पादित होणाऱ्या मालाचे संकलन, प्राथमिक प्रक्रिया व साठवणूक, तसेच, मूल्यवृद्धी करता आवश्यक सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याकरिता, एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत काढणी पश्चात तंत्रज्ञान या उपघटकांतर्गत समाविष्ट होणाऱ्या सर्व घटकांचा या अंतर्गत समावेश करण्यात येईल. यामध्ये सामुदायीक सिंचन सुविधेकरिता लाभ देता येईल. गावातील शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार बाब निवडण्याचे स्वातंत्र्य शेतकरी सुविधा केंद्रास (Shetkari Suvidha Kendra in Marathi) राहील. ऐच्छिक बाबीअंतर्गत अधिकतम रु. ७६.०० लाख एवढे अनुदान देय राहील.
शेतकरी सुविधा केंद्र उभारणी करणे समित्या
योजनेच्या संनियंत्रण व अंमलबजावणीसाठीच्या समित्या या योजनेची अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी राज्य, जिल्हा स्तरावर खालील प्रमाणे समित्या गठीत करण्यात येतील.
१) राज्यस्तरीय समिती रचना :-
- १. आयुक्त कृषी अध्यक्ष
- २. कृषी संचालक (सर्व) कृषी आयुक्तालय, पुणे – सदस्य
- ३. विभागीय कृषी सहसंचालक सर्व सदस्य
- ४. संचालक विस्तार (सर्व कृषी विद्यापिठे) सदस्य
- ५. महाव्यवस्थापक, अग्रणी बैंक सदस्य
- ६. उपसंचालक, आत्मा (सामेती) सदस्य सचिव
समित्या कार्यकक्षा :- योजना अंमलबजावणीचा आढावा घेणे व योजनेमधील घटकांची अंमलबजावणी करण्याकरिता सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे. (Shetkari Suvidha Kendra in Marathi)
२) जिल्हास्तरीय समिती रचना :-
- १. विभागीय कृषी सहसंचालक – अध्यक्ष
- २. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी – सदस्य
- ३. जिल्हा अग्रणी बैंक – सदस्य
- ४. उपविभागीय कृषी अधिकारी – सदस्य
- ५. कृषी विज्ञान केंद्र / कृषी विद्यापीठ यांचे प्रतिनिधी – सदस्य
- ६. पुरस्कार प्राप्त शेतकरी २ – सदस्य
- कृषी विकास अधिकारी – सदस्य
- प्रकल्प संचालक आत्मा सदस्य सचिव
वरील समित्यांची वर्षातून किमान तीन वेळा बैठक होईल. योजना अंमलबजावणीच्या दृष्टीने समितीमध्ये आवश्यकता भासल्यास इतर सदस्यांना देखील निमंत्रित करता येईल. (Shetkari Suvidha Kendra in Marathi)