Tar Kumpan Anudan Yojana : नमस्कार वाचक मित्रांनो आज मी तुम्हाला खास योजनाची माहिती घेऊन आलो आहे, ती म्हणजे शेतासाठी तार कुंपण योजना 90% अनुदान वर मिळेल. या योजनेचे फायदे, आवश्यक कागदपत्रे, पात्रत्ता व अटी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Table of Contents
काय आहे ? तार कुंपण योजना 90% अनुदान योजना
वन्य प्राण्यांमुळे शेती बरोबर पिकांचे होणारे नुकसान सांभाळण्यासाठी तसेच पशुधनावर होणारे हल्ले यामुळे शेतकऱ्यांचा शेतात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत जाते म्हणून, सध्याच्या या MAHA DBT पोर्टल वर शेतासाठी तार कुंपण योजना 90% अनुदान देण्याची घोषणा विधान सभेत मांडण्यात आले आहे. या अनुषंगाने शेतात तार कुंपण अनुदान योजना साठी मागणी वाढत चाललेली होती त्यानुसार 90 टक्के अनुदान देण्याचे घोषणा करण्यात आली आहे.
राज्य सरकारने तार कंपनी योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती तसेच शेतकऱ्यांना तार कुंपण देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे स्पष्टपणे सांगितले होते अनेक अडथळे या योजनेत पाहायला मिळाले यापूर्वी या योजनेत 85% अनुदान म्हणजेच जवळपास 15 हजार रुपयांच्या अनुदान मिळत होता मात्र आता हे अनुदात थेट 90% मिळणार सन शेतकऱ्यांना दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
योजनेचे फायदे
पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण नुकसान कमी करून उत्पादन वाढते शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे पिकांचे संरक्षण होऊन उत्पादन वाढते चांगल्या साहित्यामुळे मजबूत कुंपण प्राणी व चोरांपासून पिके सुरक्षित
आवश्यक कागदपत्रे
शेतकरी ओळख क्रमांक (Farmer Id), (महाडीबीटीसाठी) जात प्रमाणपत्र, बँक पासबुक, ग्रामपंचायतीचा दाखला, समितीचा ठराव, एकापेक्षा जास्त मालक असल्यास संमती पत्र, वन अधिकाऱ्याचा दाखला, स्वयंघोषणापत्र.
पात्रता व अटी
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा कायदेशीर मालक / भाडेतत्त्वावर शेती आवश्यक शेती अतिक्रमणमुक्त असावी वन्य प्राण्यांच्या भ्रमण हद्दीत शेती नसावी पिकांच्या नुकसानीचा पुरावा आवश्यक ग्रामविकास समिती/संयुक्त वन समितीची संमती आवश्यक
आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्यासाठी, सर्वप्रथम, महाराष्ट्र सरकारच्या MAHA DBT पोर्टलवर लॉग इन करा आणि विभागाचे नाव निवडा.
नंतर कृषी विभागाच्या शीर्षकावर क्लिक करा आणि तार कुंपण योजना अर्ज करा निवडा. जर तुम्ही हे केले तर शेवटी तार कुंपण योजना पर्याय दिसेल. जर तुम्ही तार कुंपण योजना पर्याय निवडला तर एक अर्ज दिसेल. त्या /अर्जात, तुमचे नाव आणि Farmer Id दिसेल, शेताचे क्षेत्र किती आहे, ते दिसेल, इतर ७२/१२ वरील माहिती भरल्यानंतर, ग्रामपंचायतीचा दाखला, समितीचा ठराव, एकापेक्षा जास्त मालक असल्यास संमती पत्र, वन अधिकाऱ्याचा दाखला, स्वयंघोषणापत्र. ‘कागदपत्र अपलोड’ पर्याय निवडा आणि स्कॅन केलेले कागदपत्रे अपलोड करा –
- ग्रामपंचायतीचा दाखला,
- समितीचा ठराव
- एकापेक्षा जास्त मालक असल्यास संमती पत्र
- वन अधिकाऱ्याचा दाखला
- आधार कार्ड
- स्वयंघोषणापत्र पहिले पान अपलोड करा.
- बँक पासबुक
वरील सात कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, सेव्ह पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर, सर्व प्रकारचे पे फी (पेमेंट) नावाचा पर्याय उघडेल. त्यानुसार, MAHA DBT पोर्टलवर,तुम्ही २३.६० रुपये शुल्क भरताच, तुमचा अर्ज स्वीकारला जाईल आणि अर्ज MAHA DBT पोर्टलवर, नोंदणीकृत होईल.

MAHA DBT पोर्टल Tar Kumpan Anudan Yojana
त्यानंतर, तुम्ही कधीही अर्ज केलेल्या बाबी – फिल्टर्स अंतर्गत अर्जाची स्थिती पाहू शकता आणि अर्ज वाचू शकता. (स्रोत: https://mahadbt.maharashtra.gov.in)
तार कुंपण योजना 90% अनुदान शासन निर्णय
अधिक माहितीसाठी, तुम्ही ४ ऑगस्ट २०१५ रोजी, (स्रोत: https://gr.maharashtra.gov.in) महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णय क्रमांक WLP-0515/Pr.Kr.155/F-1 चा संदर्भ घेऊ शकता.
तसेच महाराष्ट्र सरकारच्या MAHA DBT पोर्टलवर, शेतकऱ्यांसाठी सरकारच्या विविध लाभ योजना आणि या योजनांसाठी अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती देखील उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची स्थिती कशी पहावी
राज्य सरकारने MAHA DBT पोर्टलवर लॉगिन ही farmer id द्वारे देण्यात आलेले असून सध्याही ऑनलाईन लॉगिन करून सर्वप्रथम खालील ठिकाणी अर्ज करण्याची स्थिती वर क्लिक करून अर्ज भरताना जो तुमच्या कडे असलेला पावती क्रमांक हा तेथे सबमिट करावा आणि या योजनेचे अर्ज पहा म्हणून सबमिट बटन वर क्लिक करून अर्ज स्थिती पहा.

तार कुंपण योजना 90% अनुदान योजना गावाची यादी
एकंदरीत राज्य सरकारने या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तार कुंपण योजना देण्याची बाब स्पष्टपणे दिलेली आहे मात्र ही योजना पात्र लाभार्थी यांची निवड ही गावांमध्ये राबवण्यात येणार आहे. जी काही क्षेत्र अशी आहे जी गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता अशा गावांची यादी वेळोवेळी शासनाकडून प्रसारित करण्यात आली होती म्हणून सध्याच्या यावर्षी या यादीमध्ये काही नवीन गावांचे नाव देखील देण्यात आले आहे.
निकष
वाचक मित्रांनो वरील सर्व माहिती वाचलीच असेल, फॉर्म भरण्य अगोदर जवळील कृषी कार्यालय येथे प्रथम भेट द्यावी आणि विचारणा करावी कि, शेतासाठी तार कुंपण योजना 90% अनुदान योजना सुरु आहे का! म्हणून. नंतरच ऑनलाईन अर्ज करावा धन्यवाद.












Tar kunfan yojna
Tar kunfan yojna