सरपंच सिझन – ५ चा कोण ठरणार मानकरी ? निवड करताना ज्युरी मंडळाचे कसब पणाला,

By Shailesh Pawara

Published On:

Date:

सरपंच सिझन - ५ चा कोण ठरणार मानकरी ? निवड करताना ज्युरी मंडळाचे कसब पणाला, Who will be the winner of Sarpanch Season 5? The jury's expertise is at stake while making the selection,

Who will be the winner of Sarpanch Season 5? The jury’s expertise is at stake while making the selection,, जिल्ह्यातील आदर्श सरपंचाची होणार निवड : ६ जून रोजी रंगणार गौरव सोहळा

धुळे : जिल्ह्याला उत्सुकता लागलेल्या बीकेटी प्रस्तुत ‘लोकमत सरपंच अवॉईस’ पॉवर्ड बाय संतूर, को- पॉवर्ड बाय ‘टाटा पॉवर सोलर रूफ, आयटेल, एमपी बिर्ला सिमेंट’ च्या पाचव्या सीझनमध्ये कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागून आहे. ज्युरी मंडळाने प्रस्तावांच्या परीक्षणानंतर विजेते निवडण्याचे आव्हान पूर्ण केले आहे.

ज्यूरी मंडळामध्ये सहायक गटविकास अधिकारी (ग्रा.पं.) नितीन खंडेराय, अ.भा. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालयाचे डॉ. रवींद्र सोनवणे, मनपाचे कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा विभाग) नवनित सोनवणे, सेवानिवृत्त कृषी उपसंचालक विनय बोरसे, कृषी भूषण प्रकाश पाटील, धुळे कृषी विकास केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील या मान्यवरांचा समावेश होता. या ज्युरींनी जिल्ह्यातून आलेल्या २२५ हून अधिक ग्रामपंचायतीच्या १४ ग्रामपंचायतींची पुरस्कारांसाठी निवड केली आहे. याची घोषणा आता शनिवार, ६ जून रोजी पारितोषिक वितरण समारंभात केली जाणार आहे

१४ कॅटेगरीमध्ये आले प्रस्ताव

14 कॅटेगरीमध्ये आले प्रस्ताव ‘सरपंच ऑफ द इअर’च्या सीझन-5 मध्ये वेगवेगळ्या 14 कॅटेगरींमधून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. जलव्यवस्थापन, वीजव्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन /ई-प्रशासन / लोकसहभाग, रोजगारनिर्मिती, कृषी तंत्रज्ञान, सौरऊर्जा, उदयोन्मुख नेतृत्व आणि सरपंच ऑफ द इअर या कॅटेगरींमधून प्रस्ताव आले आहेत.

विविध ग्रामपंचायतींनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांची सविस्तर माहिती तसेच छायाचित्रे सादर केली होती, यामध्ये वेगळी कामे करणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्याही कमी नव्हती.

६ जून रोजी विजेत्यांची घोषणा

या स्पर्धेतील जिल्हास्तरीय विजेत्यांची घोषणा शनिवार, दि. 6 जून रोजी सकाळी 11.00 वाजता धुळे येथील दाते रीजन्सी, धुळे. येथे आयोजित समारंभात केली जाईल.

विक्रमी अर्ज

स्पर्धेला विक्रमी प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील 225 हून अधिक ग्रामपंचायतींनी विविध कॅटेगरींमध्ये प्रस्ताव दाखल केले होते.

गौरव सोहळा अनुभवायला या ! Who will be the winner of Sarpanch Season 5

शनिवार, दि. ६ जून २०२६ सकाळी ११:०० वाजता, दाते रिजन्सी मालेगाव रोड रेल्वे क्रॉसिंग जवळ, धुळे अधिक माहितीसाठी संपर्क : ७७७००३४०७५,

WordPress Market Tripay – Travel & Tour Booking WordPress Theme Tripzia – Immigration Consulting WordPress Theme + RTL Tristero – Tattoo WordPress Theme Tritmix – Fashion Elementor WooCommerce Theme Triump - Life Coach & Motivator Elementor Template Kit Troof – Roofing Service Elementor Template Kit Trophy – Soccer and Football Club WordPress Theme Trotol – Renovation Elementor Template Kit Trucking-Transportation & Logistics HTML Template TruckPress – Logistics & Transportation WP Theme