भूमिहीन शेतकरी महिलांना मिळेल महिला शेतकरी प्रमाणपत्र

भूमिहीन शेतकरी महिलांना मिळेल महिला शेतकरी प्रमाणपत्र

Scheme

नांदेड (जिमाका), दि. ०३ : नांदेड जिल्ह्यात शेती व शेतीपूरक व्यवसायामध्ये महिलांचा मोठा सहभाग असून, शेतीशी संबंधित कामांमध्ये प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या महिलांना अधिकृत ओळख मिळावी तसेच कृषीविषयक शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ व्हावे, यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ६९ हजार महिलांनी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिली आहे.

महिला शेतकरी प्रमाणपत्र साठी ऑनलाइन पोर्टल उपलब्ध

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी कृषी विभागाने १७ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. महिलेच्या नावावर जमीन असणे हा एकमेव निकष नसून, शेती व शेतीपूरक व्यवसायात प्रत्यक्ष सहभागाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे भूमिहीन महिला, नावावर सातबारा नसलेल्या महिला, भाडेपट्ट्याने किंवा बटाईने शेती करणाऱ्या महिला, शेतमजूर, रोपमळा मजूर तसेच पशुचारक महिलांचाही या व्यापक संकल्पनेत समावेश करण्यात आला आहे.

हे देखील वाचा: महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026

शेतीपूरक व्यवसायात कार्यरत महिलांचाही समावेश

ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रातील १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आणि शेती व्यवसायात प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या महिलांना या प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो. यामध्ये पीक उत्पादन व लागवड, बीजोत्पादन, भाजीपाला उत्पादन, फलोत्पादन व पुष्पोत्पादन, पशुपालन व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम उत्पादन, कृषी-वनीकरण, अळंबी उत्पादन, गांडूळखत व कंपोस्ट निर्मिती, कृषीमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन आदी शेती व शेतीपूरक उपक्रमांचा समावेश आहे.
शासकीय योजनांचा लाभ घेणे होणार सुलभ

हे देखील वाचा: Lakhpati Didi Yojana: महाराष्ट्र शासनाचा महिला सक्षमीकरणाचा मोठा संकल्प.

महिला शेतकरी म्हणून अधिकृत नोंदणी झाल्यामुळे कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये महिलांची ओळख सुलभ होण्यास मदत होणार आहे. कृषी कर्ज, कृषी निविष्ठा, पीकविमा, शेतकरी प्रशिक्षण, अभ्यास दौरे, कृषी विस्तार सेवा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त ठरू शकते. तथापि, संबंधित योजनेच्या स्वतंत्र पात्रता व नियम लागू राहतील.ऑनलाइन अर्जाची सुविधामहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्जासाठी आधार क्रमांक, जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल क्रमांक तसेच कृषी कार्याचा प्रकार आदी माहिती भरावी लागते. उपलब्ध असल्यास कुटुंबातील सदस्याचा फार्मर आयडी जोडून त्याची पडताळणी करता येते.

महिला शेतकरी प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी

अर्ज करण्यासाठी कृषी विभागाच्या https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service/ या अधिकृत महिला शेतकरी पोर्टलला भेट द्यावी. अप्लाय नाऊ (Apply Now) निवडून आधार क्रमांक व ओटीपीद्वारे पडताळणी करावी.वैयक्तिक तसेच शेती/कृषी कार्याची माहिती भरावी. उपलब्ध असल्यास फार्मर आयडी जोडून पडताळणी करावी. भरलेली माहिती तपासून अर्ज सबमिट करावा. अर्ज करताना अडचण आल्यास किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

Download Your Certificate

Enter your acknowledgment number, or verify via Aadhaar OTP to download your Woman Farmer Certificate.By Acknowledgment No.By Aadhaar (with OTP)

Track by Acknowledgment Number

Acknowledgment Number *Get Certificate

कोण अर्ज करू शकतात?

महिला शेतकरी प्रमाणपत्र साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी पात्रतेचे निकष काळजीपूर्वक वाचा. चुकीच्या माहितीसह अर्ज केल्यास तो नाकारला जाऊ शकतो.

तुम्ही पात्र आहात जर…
०१
महिला शेतकरी
अर्जदार ही एक महिला असावी जी जमीनमालक, वैध कुळ, वाटेकरी, कुळ शेतकरी, शेतमजूर किंवा वाटेकरी म्हणून कृषी कार्यात सक्रियपणे गुंतलेली आहे.

०२
महाराष्ट्र रहिवासी
तुम्ही वैध अधिवास प्रमाणपत्रासह महाराष्ट्राचे कायम रहिवासी असणे आवश्यक आहे.

०३
वैध आधार कार्ड
सक्रिय मोबाईल क्रमांकाशी जोडलेले वैध आधार कार्ड अनिवार्य आहे. सर्व लाभांचे हस्तांतरण आधार-संलग्न बँक खात्यात केले जाते.

०४
समाविष्ट कामाचा प्रकार
तुम्ही करत असलेले कृषी कार्य या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या कामाच्या प्रकारांपैकी एक असले पाहिजे (पीक शेती, फलोत्पादन, पशुपालन, मत्स्यपालन, इत्यादी).

०५
वय १८ वर्षे आणि त्याहून अधिक
अर्जदाराचे वय अर्जाच्या तारखेनुसार १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • रहिवासाचा पुरावा
  • रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा युटिलिटी बिल

महिला शेतकरी प्रमाणपत्र अर्जाची स्थिती

ज्या वेळेस तुम्ही ऑनलाइन अर्ज केला तेव्हा तुमच्या अर्जाचा मागोवा घेण्यासाठी तुमचा पोचपावती क्रमांक किंवा वैयक्तिक मोबाईल वर SMS द्वारे आला असेल तो तुम्ही अधिकृत वेबसाईट वर तपशील प्रविष्ट करून पाहू शकता.

  • तुमच्या अर्जाचा मागोवा घ्या
  • पोचपावती क्रमांक *
  • उदा. MSP-A1B2C3D4
  • अर्जाचा मागोवा घ्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत