Navadevi नमस्कार वाचक मित्रांनो आज मी तुम्हाला शिरपूर तालुक्यातील नवादेवी धबधबा (Nava Devi waterfall) बद्दल संपूर्ण माहिती देत आहे. तसेच नवादेवी धबधबा जवळ कोणकोणते पर्यटन स्थळ आहे, व नवादेवी कोडीद येथील किल्ला बद्दल माहिती देखील देत आहे.
शैलेश पावरा तालुका प्रतिनिधी : नवादेवी धबधबा हा महाराष्ट्र च्या आणि ( सातपुडा ) उत्तर सीमेवर आहे. हा धबधबा धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील कोडीद ग्रामपंचायत मध्ये असून हा धबधबा शिरपूर तालुका पासून 38.5 किलो मीटर वर अंतरावर आहे. पावसाळ्यात हा धबधबा दर रविवारी पर्यटकांनी फुलून गेल्याचे दिसते. नवादेवी येथे वरूनच काही फुटांवरून कोसळणारा धबधबा मनमोहक प्रमाणे, उडणारे तुषार थेंब आणि कोसळणाऱ्या धबधब्याचा एकसुरी आवाजाने शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागातील पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतो. नवादेवी धबधब्यात पर्यटक मनसोक्त पणाने भिजतात. असा या धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहण्याचा आनंद लोकं काही औरच करतात.
Table of Contents
नवादेवी मंदिर. ( Nava Devi waterfall , Navadevi Temple Information In Marathi )
शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागात नवादेवी नावाचा छोटा आदिवासी पाडा आहे. येथे नवादेवीचे अतिशय सुरेख असा छान मंदिर आहे जो मनाला मनमोहक करून छोडतो. तर नवादेवी मंदिरात नवादेवी चेच देवीची मुर्ती आहे. त्रिशुलच्या प्रतिकृती देखील आहे आणि मंदीरावर मोठा असा नाग, काढल्या आहेत. आदिवासी बांधव पूर्वीपासून नवादेवी येथे आदिवासी बांधव नवस फेडण्यासाठी येतात. नवादेवी धबधब्यालगत मंदिर असल्याने या पर्यटन स्थळाला तेथील पर्यटकांची जास्त गर्दी दिसते. धबधब्याच्या काठावर असलेल्या मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. पावसाळी पर्यटनात नवादेवी परिसरात मनमोहक वातावरण पहावयास मिळते. यामुळे नवादेवी धबधब्यालगत कोसळणाऱ्या या धबधब्यास भेट देऊन परिसरातील पर्यटनस्थळांना भेट दिल्यास मंदिरात जात असतात.

Z.P. SCHOOL NAVADEVI जिल्हा परिषद मराठी शाळा नवादेवी.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवादेवी. या नवादेवी च्या शाळेत १ ली ते ४ वी पर्यंतचे वर्ग असून शाळेत गुणवत्ते बरोबर, आदिवासी बांधवांचे मुलांचे सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम शिक्षक राबवत आहेत. जसे भविष्यात त्यांचा खेळा बद्दल माहिती मिळते, अभ्यास कसा करावा. राहणीमानात बदल कसा करावा. कारण शहरात आणि गाव खेड्यात राहणाच्ये हाव भाव चाली, सर्व वेगळे असते. या गावात चौथी नंतर पुढील वर्ग नसल्याने आणि चांगल्या शिक्षणासाठी , पालकांना पैसे जमत नसल्याने मुलांचा अभ्यास घेण्यात येणाऱ्या अडचणींमुळे पालक आता मुलांना जिल्हा परिषद नंतर आश्रम शाळेतच घालत आहेत.
शिरपूर तालुक्यातील कोडीद येथील किल्ला.
टाक्यापानी गावाजवळ आजूबाजूला उंच डोंगर आहेत. जंगलातून वेगाने पाणी येते. नवादेवी धबधबा हा खळखळून खाली पांढराशुभ्र प्रमाणे पाणी खाली येतानाचे दृश्य अतिशय रमणीय आहे व दिसतोच असा. पाण्याचा तीरकस उतार असल्यामुळे चांगला आनंद घेता येतो. कोडीद येथे पुरातन काळातील छान असा मंदीर आहे व कोडीद ग्रामपंचायत मध्ये पुरातन काळाचे किल्ल्याचे अवशेष देखील सद्या आहेत. आजही तेथे दिसते.
पुरातन काळात कोडीद येथे बांधलेला किल्ला पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो परंतु प्रशासन कडे किंवा शासन विभागाकडे कोडीद येथील किल्ला चा इतिहास उपलब्ध नाही. असे म्हटले जाते की सेंधवा येथील किल्ला परमार काळातील आहे. या कोडीद येथील किल्ल्यावर परमार, मुघल, ब्रिटिश आणि होळकर यांनी राज्य केले आहे. त्यांनीच कोडीद येथील किल्ला वर देखील राज केले असावे. कारण कोडीद येथेल किल्ला जवळ सेंधवा हाच किल्ला आहे. असे जाणकार यांचे म्हणणे आहे.
निकष
वाचक मित्रांनो तुम्हाला आमच्या या वेबसाईट वर नवादेवी धबधबा, नवादेवी येथील मंदिर, नवादेवी येथील जिल्हा परिषद मराठी शाळा, तसेच नवादेवी च्या कोडीद ग्रामपंचायत मधील पुरातन काळातील किल्ला चे, माहिती दिलेली आहे. वाचक मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इस्छितो कि, आपल्या क्षेत्रातील जुने मंदिर / पर्यटन स्थळ कायमस्वरूपी गुगल वर अपडेट करण्यासाठी. आम्हला कमेंट करा, किंवा खालील contact us वर जाऊन नक्कीच संपर्क करा.

Faq. नेहमी विचारले जाणारे प्रश्न.
1) नवादेवी मंदिरात जाणारा रस्ता कसा आहे.
उत्तर : नवादेवी मंदिरात जाणारा रस्ता ओबड-धोबाड रस्ता आहे.
2) नवादेवी धबधबा येथे दररोज गर्दी असते का!
उत्तर : नाही – फक्त रविवारी जास्त गर्दी असते. कारण सुट्टी असल्या कारणाने तालुक्यातील लोकं जास्तीत जास्त येथ असतात.
3) नवादेवी धबधबा आदिवासी पेसा क्षेत्रात आहे का!
उत्तर : हो ‘ नवादेवी धबधबा आदिवासी पेसा क्षेत्रात येत असते. म्हणून संविधानिक कायद्याने पाचवी अनुसूचीत उल्लेख दिलेली आहे.
4 ) शिरपूर तालुक्याहून नवादेवी चे अंतर किती आहे.
उत्तर : साधारणता. 38.5 किलो मीटर इतके अंतर आहे.








