महाराष्ट्र पोलीस भरती २०२५: 15631 पदांसाठी भरती PDF संपूर्ण माहिती.

On: October 30, 2025 7:52 AM
Follow Us:
Maharashtra Police Bharti अधिसूचना 2025-25

महाराष्ट्र सरकार Maharashtra Police Bharati 2024-25 साठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करणार आहे. ही घोषणा महाराष्ट्र पोलीस विभागात सामील होण्यास इच्छुक उमेदवारांसाठी एक उत्तम संधी घेऊन आली आहे. १५६३१ हून अधिक कॉन्स्टेबल पदे उपलब्ध असण्याची अपेक्षा असल्याने, महाराष्ट्र पोलीस भरती उमेदवारांनी या भरती मोहिमेशी संबंधित सर्व महत्वाच्या माहितीसह अपडेट राहावे.

Table of Contents

Maharashtra Police Bharti अधिसूचना 2025-25

महाराष्ट्र व्यावसायिक परीक्षा मंडळ (Maharashtra Police Bharti २०२५) किंवा महाराष्ट्र कर्मचारी निवड मंडळ (महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२५) मार्च २०२५ पर्यंत महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्याची अपेक्षा आहे. या अधिसूचनेत पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखांविषयी तपशील समाविष्ट असतील. इच्छुक उमेदवारांना अद्यतनांसाठी नियमितपणे अधिकृत वेबसाइट आणि विश्वसनीय पोर्टलला भेट देण्यास प्रोत्साहित केले जाते.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४-२५ ठळक मुद्दे

  • एकूण रिक्त जागा: १५६३१ हून अधिक पदे
  • भरती संस्था: महाराष्ट्र कर्मचारी निवड मंडळ (महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२५)
  • अपेक्षित अधिसूचना प्रसिद्ध: २९ ऑक्टोबर २०२५
  • अर्ज सुरू होण्याची तारीख जाहीर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत राहील.
  • निवड टप्पा: पहिली शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी.

महाराष्ट्र पोलीस भरती लिंक

महाराष्ट्र पोलीस पोलिस पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृपया संबंधित वेबसाइट्स policerecruitment2025.mahait.org आणि www.mahapolice.gov.in ला भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र पोलीस खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.

पात्रता निकष

  • वय मर्यादा
  • किमान वय: १८ वर्षे
  • कमाल वय: २८ वर्षे
  • वय सूट: सरकारी नियमांनुसार राखीव श्रेणींसाठी ५ वर्षे.
  • पोलीस कॉन्स्टेबल-ड्रायव्हर: १९ ते २८ वर्षे
  • अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹४५०/- [मॅगस प्रवर्ग: ₹३५०/-]
  • उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात नमूद केलेल्या तपशीलवार निकषांनुसार त्यांची पात्रता पडताळावी.

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कागदपत्रे

  • 1) इ.१० वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र
  • 2) इ. १२वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र
  • 3) उच्चतम शैक्षणिक अर्हता असल्यास, त्याचे गुणपत्रक/प्रमाणपत्र
  • 4) शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड प्रमाणपत्र
  • 5) ड्रायव्हिंग लायसन्स (चालक पदाकरीता )
  • 6) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • 7) जातीचे प्रमाणपत्र
  • 8) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • 9) आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS)
  • 10) खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरीता ३० टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र
  • 11) प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र (आरक्षण करीता)
  • 12) विभागीय उपसंचालक यांचेकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र ( खेळाडू असल्यास)
  • 13) होमगार्ड प्रमाणपत्र (१०९५ दिवसांचे)
  • 14) अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र (आरक्षण करीता )
  • 15) पोलीस पाल्य प्रमाणपत्र (आरक्षण करीता)
  • 16) माजी सैनिक उमेदवारांकरीता डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र
  • 17) अनाथ आरक्षणाची निवड केली असल्यास अनाथ प्रमाणपत्र
  • 18) संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास, त्याचे गुणपत्रक / प्रमाणपत्र
  • 19) जात वैधता झालेली असल्यास, त्याचे प्रमाणपत्र
  • 20) आधार कार्ड 22 पॅन कार्ड मतदार ओळखपत्र 23 नजीकच्या कालावधीतील पासपोर्ट साईजचे ०५ फोटो
  • 21) नावात बदल झाला असल्यास, त्याबाबत शासकीय राजमत्राची प्रतिज्ञा पत्र

महाराष्ट्र पोलीस भरतीला लागणारी कागदपत्र माहिती

  • !! हि माहिती आताच्या GR नुसार 100% योग्य आहे तरी नवीन GR मध्ये यात काही बदल झाल्यास तुम्हाला कळवले जाईल !
  • !! कोणत्याही कागदपत्रावर नाव चुकले असेल तर गॅझेट करून घ्या फक्त कास्ट सर्टिफिकेट व कास्ट व्हॅलिडिटी वर नाव चुकलेले चालत नाही ते नवीनच काढावे लागते
  • पोलीस भारतीबद्दल काहीही शंका असल्यास हे सर्व कागर्दपत्र अर्ज करण्याच्या दिवसाच्या आधीचे असले पाहिजे आणि त्या कालावधी मध्ये व्हॅलिड असले पाहिजे
  • अर्ज सादर करताना कोणताही विलंब टाळण्यासाठी सर्व कागदपत्रे आवश्यक स्वरूपात आणि आकारात असल्याची खात्री करा.

महिलांसाठी अत्यंत महत्वाची माहिती महाराष्ट्र सरकारचा नवा निर्णय

  • महाराष्ट्र पोलीसांनी मोफत राईड योजना सुरु केली आहे. जिथे महिलांसाठी रात्री १० ते सकाळी ०६ या वेळेत एकट्या घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नाही.
  • महिला पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर १०९१ किंवा ७८३७०९८५५५ कॉल करु शकतात व वाहन मागु शकतात.
  • कंट्रोल रूम चे वाहन किंवा जवळपासके PCR वाहन / SHO वाहन येईल आणि, 408 तिला सुराक्षितपणे तिच्या घरी सोडेल.
  • हे मोफत केले जाईल, तुमच्या ओळख प्रत्येक व्यक्तील हा संदेश पाठवा.

महाराष्ट्र पोलीस 2025 | पोलीस भरती जिल्हा नुसार रिक्त पदे

  1. सोलापूर शहर पोलीस = 73 पदे
  2. सोलापूर बॅट्समन पोलीस = 06 पदे
  3. सोलापूर ग्रामीण = 90 पदे
  4. जालना पोलीस = 156 पदे
  5. नांदेड ग्रामीण = 199 पदे
  6. नवी मुंबई = 396 पदे
  7. मुंबई लोहमार्ग = 743 पदे
  8. पुणे शहर = 1733 पदे
  9. पुणे ग्रामीण = 73 पदे
  10. मीरा – भाईंदर = 837 पदे
  11. छत्रपती संभाजी नगर शहर = 150 पदे
  12. पिंपरी चिंचवड = 298 पदे
  13. नागपूर शहर = 596 पदे
  14. कोल्हापूर = 88 पदे
  15. सांगली = 82 पदे
  16. सिंधुदुर्ग = 109 पदे
  17. पालघर = 202 पदे
  18. बीड = 174 पदे
  19. धुळे = 133 पदे

महाराष्ट्र पोलीस भरती विशेष सूचनाः

ऑनलाईन अर्जामध्ये भरलेली माहिती आणि कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यातील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवाराची निवड भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकेल तसेच उमेदवाराने मागितलेले सामाजिक समांतर आरक्षण अथवा बयोमबांदा शिथील करणे इत्यादी मधील बदल/ सवलती नामंजूर करण्यात येतील.

  • लेखी परीक्षे दरम्यान परीक्षा कक्षात किवा परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे.
  • कागदपत्र पडताळणीच्या वेळी प्रमाणपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास माहिती खोटी आढळल्यास अथवा एखादे प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवाराला त्याचवेळी पुढील प्रक्रियेसाठी अपात्र केले जाईल.
  • जाहिरातीतील नमुद केलेले सर्व शासन निर्णयः अधिसूचना/ शासन परिपत्रके ही महाराष्ट्र शासनाच्या www.policerecruitment2025.mahait.orgwww.mahapolice.gov.in या वेवसाईटवर उपलब्ध आहेत,

महाराष्ट्र पोलीस भरती महत्वाची टिप

  • उमेदवारांकडे आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे, नसल्यास प्रथम त्यांनी त्यांचे आधारकार्ड मोबाईल क्रमांकवर लिंक करुन घेण्यात आल्यानंतरच आवेदन अर्ज सादर करावा, याबाबतचा सविस्तर तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • ऑनलाईन आवेदन अर्ज भरतानाच वैध कालावधीची प्रमाणपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्रावरील उमेदवाराचे स्वतःचे नांव, शिक्का, जात प्रवर्ग, निर्गमित दिनांक, सक्षम प्राधिकाऱ्यांची स्वाक्षरी इ. बरोबर असल्याची खात्री उमेदवारांने स्वतः करावी, आवश्यक प्रमाणपत्रामध्ये त्रुटी आढळल्यास किंवा अपूर्ण असल्यास किंवा अवैध असल्यास सदरहू उमेदवारास भरती प्रक्रियेतून कोणत्याही टप्प्यावर बाद करण्यात येईल व त्याबाबत कोणताही दावा / तक्रार करण्यास उमेदवारास कोणताही हक्क राहणार नाही.
  • ऑनलाईन आवेदन अर्ज भरतानाच वैध कालावधीची प्रमाणपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्रावरील उमेदवाराचे स्वतःचे नांव, शिक्का, जाल प्रवर्ग, निर्गमित दिनांक, सक्षम प्राधिकाऱ्यांची स्वाक्षरी इ. बरोबर असल्याची खात्री उमेदवारांने स्वतः करावी. आवश्यक प्रमाणपत्रामध्ये त्रुटी आढळल्यास किवा अपूर्ण असल्यास किवा अवैध असल्यास सदरह उमेदवारास भरती प्रक्रियेतून कोणत्याही टण्यावर बाद करण्यात बेईल व त्याबाबत कोणताही दावा तक्रार करण्यास उमेदवारास कोणताही हक्क राहणार नाही.
  • उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करु शकतो. एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येतील.
  • अर्जदारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेशक यांच्या आस्थापनेवरील १) पोलीस शिपाई, २) पोलीस शिपाई चालकः ३) बॅण्डस्मन ४) राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई: ५) कारागृह शिपाई अशा एकूण ५ पदांकरीता प्रत्येक पदाकरीता फक्त एक वाप्रमाणे पाच स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील. त्यासाठी उमेदवारांस प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे व त्याप्रमाणे प्रत्येक पदाकरीता स्वतंत्र परिक्षा शुल्क भरावे लागेल.
  • उमेदवाराने चुकीची खोटी माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टण्यावर रह होईल.
  • उमेदवारांनी जाहीरात काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाांकरीता उपलब्ध पर्दाच्या १% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
  • उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येताना शारीरिक व लेखी चाचणोसाटो त्यास देण्यात येणारे प्रवेशपत्र सोबत आणावे, विहित नमुन्यातील पोलीस भरती प्रवेश पत्राशिवाय पोलीस भरतीच्या कोणत्याही टप्प्यावरील चाचणीस तपासणीस प्रवेश दिला जाणार नाही, याबाबत कोणतीही तक्रार अथवा निवेदन विचारात घेतले जाणार नाही,
  • काही उमेदवार मागासवर्गीय असूनही खुला प्रवर्ग (Unreserved) म्हणून अर्ज सादर करतात. परंतु कागदपत्र पडताळणीच्या वेळो जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र सादर करुन मागास प्रवर्गाच लाभ मिळण्याबाबत अर्ज सादर करतात. यास्तव ऑन लाईन अर्ज सादर करण्यापूर्वीच (संबंधीत पोलीस घटकाच्या आस्थापनेवर त्या मागास प्रवर्गासाठी पदे रिक्त असल्यावावत खात्री करुन) त्यांनी कोणत्या प्रवगांतून अर्ज भरावयाचा आहे हे निश्चित करुन नंतरच ऑनलाईन अर्जात तशी माहिती नोंद करावी व संबंधित प्रवर्गाचा निर्विवाद दावा अर्ज भरताना करावा, अर्ज सादर केल्यानंतर प्रवर्ग बदलण्यावावत उमेदवारांकडून अभिवेदन अथवा दावा तक्रार विचारात घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • कागदपत्र पडताळणीदरम्यान सादर करण्यात वेणान्या प्रमाणपत्रावर संपूर्ण नाव, आवश्यक प्रमाणपत्राचा निर्गमित दिनांक, जात प्रमाणपत्र असल्यास जात व जातीचे वर्गीकरण [SC, ST., VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, SEBC & EWS] स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक आहेत, जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्र विहित नमुन्यातील असावे.
  • मागासवगर्गीय उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले स्वतंत्र जातप्रमाणपत्र व स्वतंत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (अ.जा. व अ.ज. प्रवर्ग वगळून) सादर करणे बंधनकारक आहे. सदर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर न करणाऱ्या उमेदवारास जात प्रवर्गाचा समांतर आरक्षणाचा लाभमिळू शकणार नाही. तसेच ज्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र नसतील तर असे उमेदवार इच्छुक असल्यास खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवार म्हणून अटी व शर्तीच्या अधिन राहून ऑनलाईन अर्ज सादर करु शकतील.

महाराष्ट्र पोलीस भरती SMS AND E-Mail

उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या त्या त्या टप्प्याबाबत SMS किंवा E-Mail द्वारे माहिती दिली जाईल तसेच त्यांनी अधिकृत संकेतस्थळावरुन वेळोवेळी माहिती प्राप्त करुन घ्यावी.

महाराष्ट्र पोलीस भरती समाजीक समांतर आरक्षण

आवेदन अर्ज सादर करताना ज्या सामाजिक समांतर आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी विनंती केली असेल, त्याच सामाजिक समांतर आरक्षणाबाबतची प्रमाणपत्रे विचारात घेण्यात येतील, कागदपत्र पडताळणीच्या वेळो अन्य कोणत्याही सामाजिक समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र विचारात घेतले जाणार नाही, तसेच, याबाबत आवेदन अर्जात कोणताही बदल करता येणार नाही अथवा आरक्षणाचा लाभ दिला जाणार नाही. आवेदन अर्जात दावा केल्यानुसार कागदपत्रे सादर करण्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहिल. त्याबाबतची प्रमाणपत्रे कागदपत्रे नसल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल,

महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन आवेदन पद्धती

कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराने, त्यांनी ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या आवेदन अर्जाची (अॅप्लीकेशन आयडी नमूद असलेली) प्रत, पोलीस भरतीकरीता देण्यात आलेल्या शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या प्रवेशपत्रांची प्रिंट व २ पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. Link

महाराष्ट्र पोलीस भरती वैद्यकीय तपासणी

पोलीस शिपाई / बॅण्डस्मन / पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई पदावर निवड झालेल्या उमेदवारांचे चारित्र्य पडताळणी पूर्वचारित्र्य पडताळणी अहवाल व वैद्यकीय तपासणीत पात्र असल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय नियुक्ती देण्यात येणार नाही.

महाराष्ट्र पोलीस भरती जाहिरात वाचन

ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी,

महाराष्ट्र पोलीस भरती नोटीस बोर्ड

रोजगार व स्वयंरोजगार सेवायोजन कार्यालयात, तसेच समाजकल्याण, जिल्हा सैनिक बोर्ड, आदिवासी विकास विभाग यांच्यामार्फत चालविल्या जाणाज्या प्रशिक्षण केंद्रात नाव नोंदविलेले उमेदवार, या जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शतींची तसेच आवश्यक त्या प्रमाणपत्रांची पूर्तता करीत असतील, तर त्यांनी सुध्दा ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत. अशा उमेदवारांना पोलीस घटकांकडून स्वतंत्रपणे कळविण्यात येणार नाही. तसेच, वरील संबंधीत कार्यालयांनी पोलीस भरतीची जाहिरात आपल्या नोटीस बोर्डावर उमेदवारांच्या माहितीसाठी लावण्याची व्यवस्था करावी.

महाराष्ट्र पोलीस भरती अपात्रता नियुक्ती माहिती

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) (सेवाप्रवेश) नियम-२०१२. नुसार निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शती) नियम, १९८१

तसेच, शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या तरतुदो लागू होतील, याशिवाय वैद्यकीय चाचणीत दृाटोदोष, तिरळेपणा, रातआंधळेपणा, वर्गांधळेपणा, गुडघ्यास गुडघा लागणे, सपाट तळवे, त्वचारोग, छातीचे रोग, तोतरेपणा इ विषयक चाचण्या व पोलीस महासंचालकांनी वेळोवेळी विहित केलेल्या वैद्यकिय चाचण्यांचा समावेश असेल, या चाचण्यांमध्ये उमेदवार अपात्र ठरल्यास त्यास नियुक्ती देण्यात येणार नाहो.

  • प्रस्तुत भरतीकरिता सर्व अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारण्यात येतील. अन्य कोणत्याही मार्गाने सादर केलेले अर्ज भरतीकरिता स्विकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारास स्वतःची ओळख पटविण्यासाठी पासपोर्ट पॅनकार्ड आधार ओळखपत्र / ड्रायव्हीग
  • लायसन्स / निवडणूक ओळखपत्र राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक फोटोसह शाळा-महाविद्यालयीन ओळखपत्र / सैनिक बोर्डाने दिलेले माजी सैनिकांचे ओळखपत्र भारत सरकार महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले ओळखपत्र / ग्रामीण भागातील उमेदवारांकरीता तहसीलदाराने यांनी प्रमाणित केलेले कोणतेही फोटोसह ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र चाचणीच्या वेळी सोबत आणावे लागेल,
  • पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी शारीरिक चाचणी दरम्यान उमेदवारास कोणतीही शारिरीक इजा । नुकसान झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जवाबदार राहील. त्याकरिता उमेदवाराने स्वतःची शारिरीक क्षमता विचारात घेऊन मैदानी चाचणीच्या प्रकारात सहभागी व्हावे,
  • भरती प्रक्रियेमधील कोणत्याही चाचणीसाठी येण्या जाण्याकरिता उमेदवारांस प्रवास खर्च दिला जाणार नाही. उमेदवारास प्रत्येक पोलीस भरती चाचणीकरिता स्वखचांने हजर रहावे लागेल,
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना वापरलेले User ID, Password लक्षात ठेवावेत, तसेच अर्जामध्ये दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल आयडी कृपया बदलू नयेत.

महाराष्ट्र पोलीस भरती उमेदवारांना भरती प्रक्रियेबाबतच्या सूचना

वेळोवेळी निकाल www.policerecruitment2025.mahait.org व पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे संकेतस्थळ www.mahapolice.gov.in व (संबंधित पोलीस घटकाचे संकेतस्थळ नमूद करावे) या संकेतस्थळावर दिल्या जातील. त्याप्रमाणे उमेदवारांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

महाराष्ट्र पोलीस भरती निकष

महाराष्ट्र पोलीस भरती उमेदवाराची गुणवत्ता यादीतील निवड, भरती निकषांची पुर्तता आणि आवश्यक ती मूळ प्रमाणपत्रे । कागदपत्रांची अंतिम पडताळणी आवश्यक ती पूर्तता, वैद्यकीय चाचणी अहवाल, चारित्र्य व पूर्वचारित्र्य पडताळणी अहवालास अधिन राहून करण्यात येईल, निवड यादीतील उमेदवाराची निवड तात्पुरत्या स्वरुपाची असेल. निवड यादीत नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये.

  • पोलीस भरतीतील प्रक्रियेबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील व तो उमेदवारावर बंधनकारक राहील.
  • आवश्यक प्रमाणपत्रे / कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतीम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वीच्या दिनांकाची असावीत व सदरची मूळ प्रमाणपत्रे कागदपत्रे, कागदपत्र पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. सदर मूळ प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवारांस अपात्र ठरविण्यात येईल.
  • समांतर आरक्षणाचा लाभ घेवून निवड झालेल्या उमेदवारांची (खेळाडू / माजी सैनिक / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / होमगार्ड अंशकालीन अनाथ) त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्राची संबंधित विभागाकडून पूर्न: तपासणी केल्यानंतरच तपासणीअंती सदर प्रमाणपत्र वैध ठरल्यास उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल.
  • उपरोक्त सूचना शासन निर्णय परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये काही संदिग्धता वाटल्यास उमेदवाराने संबंधित शासन निर्णय / परिपत्रकातील सूचना यांचे अवलोकन करावे.

महाराष्ट्र पोलीस भरती तात्पुरती निवड यादी व अंतिम निवड यादीबावतः

उमेदवारांना शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे कागदपत्रांच्या पडताळणीच्या अधिन राहून तात्पुरतो गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल, त्यानंतर जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या रिक्त पदांनुसार कागदपत्रे पडताळणीच्या अधिन राहून तात्पुरती निवडयादी प्रतीक्षावादी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार तयार करुन प्रसिध्द करण्यात येईल.

Maharashtra Police Bharti अधिसूचना 2025-25
Maharashtra Police Bharti अधिसूचना 2025-25

(उदा. गृह विभाग, शासन निर्णय क्रमांक पोलीस-१८१९/प्र.क्र.३१६. पोल-५ अ, दिनांक १०/१२/२०२०) तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवारांच्याच कागदपत्राची पडताळणी करण्यात येऊन, कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांचाच अंतिम निवडसूची प्रतीक्षासूचीमध्ये समावेश करण्यात येईल, भरती प्रक्रियेत कागदपत्रांची पडताळणी शेवटी करण्यात येणार असली तरी, उमेदवारांनी भरती प्रक्रियेत येतांना प्रवेशपत्रासोबत आवेदन अर्जाची प्रत, आवेदन अर्जात नमूद केलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात, भरत्ती प्रक्रियेत मूळ कागदपत्रे सादर करण्याबाबत पोलीस घटक प्रमुखांकडून ज्या ज्या वेळी मागणी करण्यात येईल त्या त्या वेळी कागदपत्रे सादर करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.


महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर

कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

महाराष्ट्राची राजधानी

मुंबई व उपराजधानी नागपूर.

महाराष्ट्राला किती कि.मी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या

– ३६.

महाराष्ट्राने भारताचा किती? टक्के भाग व्यापलेला आहे.

महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या सीमारेषा आहे.?

महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

महाराष्ट्रात तेरेखोल खाडी कोठे आहे. ?

महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.

विदर्भातील कोणती मालगुजारी नावाने ओळखले जातात.

विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात मोठ्या संख्येने तलाव आहे.

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठ्या संख्येने तलाव आहे.

महाराष्ट्रात मोठया प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते.

महाराष्ट्रात मोठया प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

Leave a Comment