नमस्कार मित्रांनो, Mahatma Phule Jan Arogya Yojana Card मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या लेखात आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड कसे मिळवायचे ते शिकू. यामध्ये मेंदू आणि मूत्रपिंडांसाठी मोफत तोंडी शस्त्रक्रिया देखील उपलब्ध आहे.
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय : Mahatma Phule Jan Arogya Yojana Card मध्ये रुग्णांना दिलासा, उपचार खर्च मर्यादेतही वाढ करून महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड मध्ये फायदेच फायदे होणार असल्याचे म्हटले आहे.
Table of Contents
काय आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड
महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सामान्य आणि गरीब रुग्णांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेत आता मॅक्सिलोफेशियल ‘ओरल अॅड सर्जरी’ शल्यचिकित्साशास्त्र या विशेष शाखेचा समावेश करण्यात आला आहे.
राज्य शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे या योजनेंतर्गत अक्कलदाढ काढण्यापासून नवीन 1 ते 22 नवीन दंत व मुख शस्त्रक्रियेसह मुख कर्करोगाशी संबंधित मुख उपचार मोफत मिळणार आहेत. यामुळे मुखाशी संबंधित गंभीर आजारांवर उपचार घेऊ न शकणाऱ्या राज्यातील लाखो गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये रेशन कार्ड (पांढरे/केशरी/पिवळे), अंत्योदय अन्न योजना कार्ड (AAY) किंवा अन्नपूर्णा कार्ड यापैकी एक असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, ओळख आणि पत्त्याचा पुरावा, आणि काही प्रकरणांमध्ये उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागू शकतो.
महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड मध्ये फायदे
राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड (Mahatma Phule Jan Arogya Yojana Card ) मध्ये उपचार घेणाऱ्या लोकांसाठी खर्चाची मर्यादाही वाढविण्यात आली, उपचारांच्या खर्चाची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही मर्यादा १.५ लाख रुपये (प्रतिकुटुंब प्रतिवर्ष) होती. आता ती वाढवून ५ लाख केली.
महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड मध्ये कसा घ्यायचा या योजनेचा लाभ ?
या योजनेचा लाभ हा केशरी, पिवळी शिधापत्रिकाधारक, तसेच अन्नपूर्णा व अंत्योदय कार्डधारक घेऊ शकतात. रुग्ण या योजनेत समाविष्ट असलेल्या कोणत्याही सरकारी किंवा खासगी रुग्णालयात जाऊन संबंधित उपचार मोफत मिळवू शकतात. रुग्णालयाच्या ‘आरोग्यमित्र’ कक्षात यासाठी विशेष मदत मिळते.
महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड ची अंमलबजावणी
राज्य सरकारच्या अंमलबजावणीला १५ दिवसांचा कालावधी या निर्णयाबाबत बोलताना महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, मुख शल्यचिकित्साशास्त्र शाखेचा समावेश करण्याने गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख कर्करोगाचे उपचार अत्यंत खर्चिक असतात आणि आता ते मोफत मिळणार आहेत. याविषयी शासन निर्णय निघाला असला तरी अंमलबजावणी होण्यासाठी आणखी १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड मध्ये २२ नवीन दंत व मुख शस्त्रक्रिया मोफत
या निर्णयामुळे महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आता एकूण २२ नवीन दंत व मुख शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध होणार आहेत. यात अक्कलदाढेवरील शस्त्रक्रिया, जबड्याचे फॅक्चर, चेहऱ्यावरील हाडांचे फॅक्चर, ओरल सबम्युकस फायब्रोसिस, जबड्याचा सांधा जाम झाल्यास, जबड्याचा हाडांचा संसर्ग, जबडा किंवा तोंडाच्या संरचनेशी संबंधित मोठे उपचार, निघून गेलेला दात पुन्हा जागेवर बसविणे या उपचारांचा समावेश आहे.
रूट कॅनॉलच्या समावेशाची करण्यात येतेय मागणी
या महत्त्वाच्या निर्णयाचे स्वागत होत असताना, अनेक दंतवैद्य संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रूट कॅनॉल या सर्वाधिक सामान्य आणि महत्त्वाच्या उपचाराचाही योजनेत समावेश करण्याची मागणी केली आहे. मुखाशी संबंधित बहुतेक समस्यांची सुरुवात दातांच्या किडण्यापासून होते व त्यावर ‘रूट कॅनॉल’ हा एक प्रभावी उपाय आहे. या उपचाराचा समावेश झाल्यास गरीब रुग्णांना याचा मोठा हातभार लागेल.
महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड मध्ये ‘मुख शल्यचिकित्साशास्त्र’ शाखेचा समावेश
राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना कार्ड (Mahatma Phule Jan Arogya Yojana Card )मध्ये तसेच या योजनेंतर्गत २,३९९ उपचारांचा लाभ दिला जातो. या योजनेत ‘मुख शल्यचिकित्साशास्त्र’ या विशेष शाखेचा समावेश नुकताच करण्यात आला आहे. मुख, जबडा आणि चेहऱ्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, कर्करोगाचे उपचार होणार आहेत.
Mahatma Phule Jan Arogya Yojana Card You Tube
निष्कर्ष
राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना कार्ड साठी विशेष तरतूद केलेली आहे, रुग्ण धारकांनी या योजनेचा आवश्यक तो लाभ घ्यावा. तसेच वरील सर्व माहिती आवडली असेल तर इतरांना हि नक्की शेअर करा. जेणेकरून या योजनेचा लाभ घेता येईल धन्यवाद (Mahatma Phule Jan Arogya Yojana Card)











