सारंगखेडा यात्रा २०२५: देशातील सर्वात मोठा घोडा बाजार सुरू! पहा ‘या’ घोड्यांची किंमत आणि खास आकर्षणे

On: December 22, 2025 12:54 PM
Follow Us:
Sarangkheda Yatra 2025 Horse Market

नंदुरबार: उत्तर महाराष्ट्राची शान आणि खान्देशची सांस्कृतिक ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा चेतक फेस्टिवल (Sarangkheda Chetak Festival 2025) ला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दत्त जयंतीच्या मुहूर्तावर भरणारी ही यात्रा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. ​(Sarangkheda Yatra 2025 Horse Market)

​काय आहे सारंगखेडा यात्रेचे वैशिष्ट्य?

​तापी नदीच्या काठावर वसलेल्या सारंगखेडा येथे गेल्या ३०० हून अधिक वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे. या यात्रेला ‘चेतक फेस्टिवल’ म्हणूनही ओळखले जाते. येथे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात यांसारख्या राज्यांमधून उच्च जातीचे घोडे विक्रीसाठी येतात.

​यावर्षीची मुख्य आकर्षणे: ​Sarangkheda Yatra 2025 Horse Market

​१. कोट्यवधींचे घोडे:

  • यावर्षी यात्रेत मारवाड, काठियावाडी आणि नुखरा जातीचे देखणे घोडे दाखल झाले आहेत. काही घोड्यांची किंमत तर लक्झरी गाड्यांपेक्षाही जास्त म्हणजे 50 लाखांपासून ते सर्वात जास्त म्हणजे 15 कोटी रुपयांपर्यंत आहे.

२. अश्व प्रदर्शन आणि स्पर्धा:

  • घोड्यांच्या चालण्याच्या पद्धती, त्यांचे सौंदर्य आणि त्यांची उंची यानुसार विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

३. सांस्कृतिक कार्यक्रम:

  • पर्यटकांच्या मनोरंजनासाठी येथे दररोज संध्याकाळी खान्देशी संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

​पर्यटकांची मोठी गर्दी

​खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारसह संपूर्ण राज्यातून हजारो पर्यटक दररोज या यात्रेला भेट देत आहेत. घोड्यांच्या खरेदी-विक्रीसोबतच येथील स्थानिक खाद्यपदार्थ आणि यात्रेतील दुकाने पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

​सारंगखेडा यात्रा २०२५ कशी पोहोचायचे?

  • ​जवळचे रेल्वे स्टेशन: दोंडाईचा किंवा नंदुरबार.
  • बस सुविधा: धुळे आणि जळगाव येथून थेट एसटी बसची सुविधा उपलब्ध आहे.​
  • रस्ते मार्ग: धुळे-नंदुरबार महामार्गावरून तुम्ही खाजगी वाहनाने सहज पोहोचू शकता.

​हे पण वाचा: [​Sarangkheda Yatra 2025 Horse Market]

​सारंगखेडा यात्रा २०२५ (Sarangkheda Yatra 2025)

सारंखेडा येथील चेतक फेस्टिवल ला नवा आयाम देऊन संस्कृती व वारसा जपला जावयासाठी प्रयत्न केले जात आहेत. आश्चच्या विविध स्पर्धा बरोबर सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्यात नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र अंतर्गत सहा राज्यातील लोककलेचा आविष्कार सारंखेडा चेतक फेस्टिवल मध्ये अनुभवायला मिळत असून या लोककलांच्या आविष्काराने गुरुवारी चेतक फेस्टिवल अध्यक्ष जयपाल सिंग रावत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

​चेतक फेस्टिवल नंदुरबार (Chetak Festival Nandurbar)

चेतक फेस्टिवल मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्सव आणि कला प्रदर्शन आयोजित करते प्रेक्षकांना सहा राज्यातील लोककलेचा आविष्कार अनुभवयाला मिळाले यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील अधिकारी शेता तिवारी वैशाली व्यवहारे उपस्थित होते. या महोत्सवात पारंपारिक लोकनृत्याची सादरीकरण करण्यात आले या लोक नृत्य कलावंताचे पारंपारिक वेशभूषा पारंपारिक वाद्यावर येथील लोककलेची अनुभूती प्रेक्षकांना धरून दिली

​सर्वात महागडा घोडा सारंगखेडा

सारंगखेडा यात्रेत विविध प्रकारचे घोडे आले होते, त्यात Luxury Car पेक्षा महाग सारंगखेडा चा ब्राहमोस घोडा तब्ब्ल पंधरा कोटी चा घोडा. विकला घेला.

​सारंगखेडा घोडा बाजार माहिती

मी कशाला आरशात पाहू गं, बीच माझ्या रूपाची राणी ग… या ओळी प्रमाणे येथील चेतक फेस्टिवलअंतर्गत येण्यात आलेल्या देखण्या व रुबाबदार मारवाड प्रजातीचा आश्चर्य स्पर्धेत गुजरातच्या मनराज नावाच्या घोड्याचा प्रथम क्रमांक पटकावला असून देशातील सर्वोत्कृष्ठ मनाचा भान त्यास मिळाला गोवा राज्यातील अनोजी अधात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. पोकांची घोडे बाजारात विक्रमी गर्दी झाली होती.

​सारंगखेडा खान्देश पर्यटन २०२५ (​Sarangkheda Yatra 2025 Horse Market)

येथील चेतक फेस्टिवलच्या स्टेडीयममध्ये डे – नाईट स्पर्धा झाल्या. रविवारी सौदर्य स्पर्धेत देशाच्या अनेक भागांतून कोट्यावधीची किंमत असलेले आश्चर्य येथे दाखल झाले आहेत. मारवाड़ प्रतीच्या अधांची तीन दिवसांपासून स्पर्धा सुरु होती. त्यात अहमदाबाद गुजरात चा रखुभाई राबारी अश्च तो देशाचा चैपीवन अध ठरला.

Sarangkheda Yatra 2025 Winner Horse 

मारवाड प्रजातीच्या अश्व स्पर्धेत गुजरातचा ‘मनराज’ ठरला, गोतर व्याच्या ‘अनोजी’ ने मिळविला द्वितीय क्रमांक, या घोड्याला स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. 

या महोत्सवात पारंपारिक लोकनृत्य बरोबरच येथील पारंपारिक पोशाख आणि हस्तकलेचाही अनुभव घेता येत आहे या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रांतर्गत आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि गोवा या राज्यातील लोककला आदिवासी कला आणि शिस्त कला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे संवर्धन करण्यासाठी त्यांना बळकट करण्यासाठी कार्य करते.

देशातील विविध राज्यातून आलेले अश्व व्यापारी सारंखेडा यात्रेत येतात. आयोजकाशी संबंध असल्याकारणाने विविध भेट वस्तू आणतात. नागपूरहून आलेल्या व्यापाऱ्यांनी, नारंगी कोणी वस्तू आणली तर कोणी मिठाई, राज्यातील ज्याच्या त्याच्या राज्यातून प्रसिद्ध भेट वस्तू आणल्या.

Sarangkheda Yatra 2025 First Winner Horse

Leave a Comment