महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सध्या ‘सोलर पंप योजना’ जोरात राबवली जात आहे. अनेक शेतकरी बांधवानी या योजनेसाठी अर्ज केले आहेत आणि ऑनलाईन पैसे देखील भरले आहेत. मात्र, अनेक शेतकरी या काही ठिकाणी पैसे भरूनही महिना-दोन महिने उलटले तरी निवड केलेल्या कंपनीकडून (Vendor) शेतात सोलर पॅनल बसवले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत.
solar panel yojana complaint maharashtra : जर तुमचीही सोलर पंप योजनाची समस्या असेल, तर घाबरू नका. पैसे भरूनही सोलर मिळाले नाही? अशी करा ऑनलाईन तक्रार! हा आम्ही दिलेला लेख शेवटपर्यंत वाचा, यात आम्ही तुम्हाला सोलर पंप योजना तक्रार करण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगितली आहे.
Table of Contents
सोलर पंप योजना पैसे भरूनही सोलर का मिळत नाही? (मुख्य कारणे)
- कंपनी व्हेंडरचा निष्काळजीपणा: काही निवड केलेल्या कंपन्यांकडे कामाचा लोड जास्त असल्याने त्या टाळाटाळ करतात.
- सोलर पंप साहित्याचा तुटवडा: सोलर पॅनल आणि मोटार पंप उपलब्ध नसल्याचे कारण दिले जाते.
- वायरमन तांत्रिक अडचण: वायरमन मार्फत तुमच्या जागेची पाहणी (well Site Survey) वेळेत न होणे.
सोलर पंप योजना ची तक्रार कोठे आणि कशी करावी? (Step-by-Step Guide)
जर तुम्हाला कंपनी कडून प्रतिसाद मिळत नसेल, तर तुम्ही खालील तीन मार्गांनी तक्रार करू शकता:
१. सोलर पंप योजना पोर्टलवर ऑनलाईन तक्रार (solar panel yojana complaint maharashtra online Portal Complaint)
सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे सोलर पंप योजना इमेल किंवा अधिकृत वेबसाईटवर तक्रार नोंदवणे.

- सर्वप्रथम https://www.mahaurja.maharashtra.gov.in/FeedbackText/GrievanceForm या वेबसाईटवर जा.
- ‘Register Complaint’ किंवा ‘Grievance’ या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा user name आणि मोबाईल नंबर टाकून लॉग-इन करा.
- तुमचा जिल्हा, तालुका, आणि गावाचे नाव टाका.
- विभाग निवडा ( ऊर्जा )
- आपल्या तक्रारी शी संबंधित कार्यालय निवडा ( Energy Department Mantralay )
- तक्रारीचे स्वरूप निवडा ( इतर )
- तक्रारीचे तपशील द्या ( यात तुम्ही 2000 शब्दांत लिहून टाकू शकता)
- तुमच्या समस्येचा प्रकार निवडा (उदा. Installation Delay) आणि तक्रार सबमिट करा.
- प्रतिमा किंवा दस्तावेज अपलोड करू शकता
- शेवटी कॅपचा कोड टाकून पूर्वाव लोकन करा.
२. सोलर पंप योजना कार्यालयात लेखी अर्ज ( solar panel yojana complaint maharashtra Offline Complaint)
जर आपले सरकार ऑनलाईन पोर्टल ऑनलाईन तक्रारीला यश आले नाही, तर तुमच्या जवळच्या जिल्हा लेवल च्या कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंत्यांच्या नावाने लेखी अर्ज द्या. अर्जासोबत तुमच्या पैशांच्या पावतीची झेरॉक्स जोडायला विसरू नका.
तक्रार अर्जात कोणत्या गोष्टी असणे आवश्यक आहे?
तक्रार करताना खालील माहिती सोबत ठेवा:
- तुमचा MK किंवा MT Application ID (अर्ज क्रमांक).
- ज्या सोलर पंप योजना कंपनीला काम दिले आहे, त्या व्हेंडरचे नाव.
- सोलर पंप योजना साठी पैसे भरल्याची तारीख आणि पावती.
सोलर पंप योजना साठी तक्रारी अर्ज : solar panel yojana complaint maharashtra Arj
शेतकरी बांधवांनो तुमच्या नावावर सोलर पंप योजना मंजूर होऊन आणि ऑनलाईन पैसे भरूनही जर काम सुरू झाले नसेल, संबंधित कपंनी एजन्सी आणि ज्या व्हेंडरला वायरमन (Vendor) तुम्ही पैसे दिले आहेत, त्यांना उद्देशून तक्रार अर्ज करावा लागेल.
खाली तक्रार अर्जाचा एक नमुना दिला आहे. तो तुम्ही कागदावर लिहून किंवा ईमेलद्वारे पाठवू शकता. (solar panel yojana complaint maharashtra)
तक्रार अर्जाचा नमुना
- प्रति,
- मा. सो. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य,
- मुंबई मंत्रालय, मुबंई यांच्या सेवेशी
- विषय: ‘सोलर पंप योजने’अंतर्गत सोलर पॅनल कंपनी द्वारा शेतात सोलर प्यानल न बसवल्याबाबत तक्रार.
महोदय,
मी [शैलेश पावरा], [बोराडी] येथील रहिवासी असून मी राज्य सरकारच्या ‘सोलर पंप योजने’ अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला होता आणि त्या अंतर्गत माझ्या अर्ज मंजूर झाला, तसेच शेतीसाठी सोलर पॅनल बसवण्यासाठी अर्ज केला होता. माझा अर्ज क्रमांक (MK किंवा MT Application ID) [तुमचा अर्ज क्रमांक लिहा] हा आहे.
सदर योजनेसाठी मी आवश्यक असलेले पैसे ऑनलाईन पोर्टल वरच (Beneficiary Share) रुपये [भरलेली रक्कम] भरले आहे, दिनांक [तारीख] रोजी [बँकेने किंवा ऑनलाइन मोड] द्वारे भरले आहेत. नंतर वायरमर यांनी पंधराशे रुपये घेऊन सर्वे देखील केला. मला राज्य शासनाकडून सदर योजना मंजूर झाल्याचा संदेश/ईमेल प्राप्त देखील झाला आहे.
परंतु, पैसे भरून आणि वायरमन सर्वे चे तीन महिने कालावधी उलटला तरीही संबंधित मी निवड केलेली कंपनीकडून (Vendor Name: [कंपनीचे नाव माहिती असल्यास लिहा]) अद्याप माझ्या शेतात सोलर पॅनल बसवण्याबाबत कंपनी कडून कोणतीही योग्य कार्यवाही करण्यात आलेली नाही. वारंवार कंपनी वेडर शी संपर्क साधूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये.
तरी ब्लॅकलिस्ट करून कार्यवाही करावी आणि त्याची एक प्रत मला देखील देण्यात यावे. या सोलर पंप योजना अर्जासोबत मी भरलेल्या पैशांची पावती (Receipt) आणि अर्जाची प्रत जोडत आहे.
सहकार्याची अपेक्षा.
- आपला/आपली नम्र,
- (सही)
- नाव: [तुमचे पूर्ण नाव]
- मोबाईल नंबर: [तुमचा मोबाईल नंबर]
- दिनांक: [आजची तारीख]
- ठिकाण: [तुमचे गाव/शहर]
सोलार पंप योजना तक्रारी अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा:
पुराव्यांच्या प्रती जोडा: तुम्ही जे पैसे भरले आहेत त्याची पावती (Receipt) आणि कंपनी निवड केलेली (Sanction Letter) अर्जासोबत नक्की जोडा. (solar panel yojana complaint maharashtra)
निष्कर्ष:
सोलर पंप योजना ही सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे. जर तुम्ही तुमचे पैसे ऑनलाइन पद्धतीने भरले असतील, तर तुम्हाला एका महिन्याच्या आत वेळेत सेवा मिळणे हा तुमचा हक्क आहे. वरील पद्धतीने ऑनलाइन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने तक्रार केल्यास तुमची समस्या १० ते १५ दिवसांत सुटू शकते.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (solar panel yojana complaint maharashtra FAQs)
१. मुख्यमंत्री सोलर पंप योजनेसाठी पैसे भरल्यानंतर साधारण किती दिवसांत सोलर बसवले जाते?
उत्तर: शासकीय नियमानुसार, ऑनलाईन पैसे भरल्यानंतर आणि व्हेंडरची निवड केल्यानंतर साधारणपणे १५ ते ३० दिवसांच्या आत शेतात सोलर पॅनल बसवण्याची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असते.
२. जर व्हेंडर कपंनी (Vendor) कॉल उचलत नसेल तर काय करावे?
उत्तर: जर व्हेंडर कपंनी प्रतिसाद देत नसेल, तर त्वरित ‘मुख्यमंत्री सोलर पंप योजना’ पोर्टलवर लॉग-इन करून त्या व्हेंडरच्या विरोधात तक्रार (solar panel yojana complaint maharashtra) नोंदवावी.
३. आपले सरकार ऑनलाईन पोर्टल तक्रार केल्यानंतर किती दिवसांत कारवाई होते?
उत्तर: आपले सरकार ऑनलाईन पोर्टल वर तक्रार केल्यानंतर साधारणपणे ८ ते १० दिवसांत संबंधित विभागाकडून यावर कार्यवाही सुरू होते आणि तुम्हाला त्याबद्दल अपडेट दिले जातात.
४. मी सोलर पंप योजना साठी भरलेले पैसे बुडण्याची शक्यता असते का?
उत्तर: नाही. ही महाराष्ट्र राज्य सरकारी योजना असल्याने तुमचे पैसे सुरक्षित असतात. जर व्हेंडर कंपनी धारक काम करत नसेल, तर राज्य सरकार त्या व्हेंडरला ब्लॅकलिस्ट करू शकते किंवा तुमचे काम दुसऱ्या व्हेंडरकडे किंवा कंपनीकडे सोपवले जाऊ शकते.
५. आपले सरकार ऑनलाईन पोर्टल वर तक्रार करण्यासाठी काही शुल्क भरावे लागते का?
उत्तर: नाही, आपले सरकार ऑनलाईन पोर्टल वर तक्रार (solar panel yojana complaint maharashtra) नोंदवण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे.
६. शेतातील सोलर पॅनल बसवताना व्हेंडरने अतिरिक्त पैशांची मागणी केली तर काय करावे?
उत्तर: सोलर पॅनल बसवण्यासाठी पैशाची मागणी करणे बेकायदेशीर आहे. असे घडल्यास त्वरित आपले सरकार ऑनलाईन पोर्टलवर (solar panel yojana complaint maharashtra) तक्रार करावी.








