अमरावती, दि. 01 (Pesa Vanrakshak Bharti 2023): वनरक्षक सरळसेवा भरती-2023 अंतर्गत अमरावती वनवृत्तातील ‘पेसा’ (PESA) क्षेत्रातील माजी सैनिक प्रवर्गाच्या रिक्त जागांवर नियुक्ती देण्याबाबत वनविभागाने प्रचलित शासकीय व कायदेशीर नियमांच्या आधारे वस्तूस्थिती स्पष्ट केली आहे.
Pesa Vanrakshak Bharti 2023 वनवृत्तांत
यानुसार, अमरावती वनवृत्तांतर्गत वनरक्षक भरती प्रक्रियेची जाहिरात जून 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्यामध्ये अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीसाठी एकूण 230 पदांचा समावेश होता. या भरतीची ऑनलाईन परीक्षा आणि शारीरिक पात्रता चाचणी पूर्ण झाल्यानंतर जानेवारी 2024 मध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादी देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात न्यायालयीन प्रक्रियेमुळे अंतिम नियुक्तीची कार्यवाही प्रलंबित होती. मात्र, उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी व रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासनाच्या विशेष सूचनेनुसार 230 पैकी 193 पात्र उमेदवारांना मानधन तत्त्वावर तात्पुरते नियुक्ती आदेश देण्यात आले होते.
Pesa Vanrakshak Bharti 2023: पेसा भरतीचा नवीन शासन निर्णय PDF, सर्वोच्च न्यायालयाच्या महत्वपूर्ण निर्णय,
वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झालेल्या मार्गदर्शनानुसार, प्रचलित शासन परिपत्रकातील नियमांन्वये समांतर आरक्षणाची पदे एका सामाजिक प्रवर्गातून दुसऱ्या सामाजिक प्रवर्गात वर्ग करता येत नाहीत. तसेच, पेसा क्षेत्रातील उमेदवारांना मानधन तत्त्वावर दिलेल्या नियुक्त्या ही एकवेळची विशेष बाब म्हणून केलेली तात्पुरती तरतूद असल्याने, या प्रक्रियेतील रिक्त पदे प्रतीक्षा यादीतून भरणे उचित ठरणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार प्रचलित नियमांच्या अधीन राहूनच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे वनविभागाने नमूद केले आहे.
महत्वाची माहिती जाणून घ्याची असल्यास आमच्या whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा.
PESA Act in Marathi | महाराष्ट्र पेसा कायदा












