आदिवासी विकास विभाग/का.१०. मा. मंत्री (आ.वि.) यांनी सदरहू प्रस्तावाबाबत “चर्चा कराबी ” असे अभिप्राय नोंदविले होते. परंतु चर्चा होऊ शकली नाही. म्हणून प्रस्तुत प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात येत आहे. (Adivasi Hindu Nahi Pripatrak)
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषय यांनी डिसेंबर, १९९५ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात एकूण १९ मागण्या सादर केल्या होत्या. या मागण्यांवरील अभिप्राय नमूद करुन डिसेंबर, १९९८ च्या अधिवेशनामध्ये मा. मुख्यमंत्र्यांनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेत्यांकडे सुपूर्द केले होते. या कार्यासनाशी संबंधित पुढील प्रमाणे एक मागणी आहे.
“आदिवासीत मोडणाऱ्या सुचीतील प्रत्येक जमातीच्या धर्माचे संशोधन होणे अत्यंत जरुरीचे आहे. आदिवासी या शब्दानेच हे सिध्द होते की ते हिंदू नाहीत. परंतु हिंदू धर्माशी जवळीक साधल्यामुळे अज्ञानी आदिवासी समाज स्वतःला हिंदू समजून जामतीच्या नावासमोर हिंदू शब्दाचा उल्लेख करु लागला. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात हिंदू-भिल्ल, हिंदू-ठाकूर, हिंदू-कोकणा, हिंदू-कोकणी, हिंदू-वारली, हिंदू-महादेव कोळी, हिंदू कातकरी असा उल्लेख करुन तालुका मॅजिस्ट्रेटने सुध्दा प्रमाणित केलेले आहे. आदिवासींच्या घटनात्मक सुचीमध्ये अशाप्रमाणे शब्दप्रयोग करण्यात आलेला नाही.”
३. वरील मागणीच्या संदर्भात अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देताना धर्माचा उल्लेख करु नये अशा सूचना देण्यात येत आहेत. असे अभिप्राय नमूद केलेले आहेत. त्यामुळे आता सर्व सक्षम प्राधिका-यांना सूचना देण्यात याव्यात. सर्वसाधारणपणे शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये हिंदू-भिल्ल, हिंदू-व्यकूर, हिंदू-कोकणा, हिंदू-कोकणी, हिंदू-वारली, हिंदू-महादेव कोळी, हिंदू कातकरी असा उल्लेख आढळून येतो. या उल्लेखाचा विचार करुन जातीचे प्रमाणपत्र देणारे सक्षम प्राधिकारी देखील वरील प्रमाणे उल्लेख करुन जातीचा दाखला देत असतात अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ज्याप्रमाणे उल्लेख केलेला आहे त्याप्रमाणेच उल्लेख करुन जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे याकरीता परिपत्रकाचा मसूदा पृढे पवि वर सादर केला आहे. मान्य झाल्यास निर्गमित करण्यात येईल.
अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये नमूद केलेल्या जमार्तीचा उल्लेख करून जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत.
शासन परिपत्रक क्रमाक महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन परिपत्रक क्रमाक एसटीसी-१०९९/प्र.क्र.३१/का.१० मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ दिनांकः १२ जानेवारी, २०००. (Adivasi Hindu Nahi Pripatrak)
परिपत्रकः- अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना जातीथा दाखला देताना दाखला देणाऱ्या काठी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून “हिंदू-भिल, हिंदू ठाकूर, हिंदु-कोकणा, हिंदू कोकणी, हिंदू-वारली, हिंदू-कातकरी, हिंदू-कोळी महादेव” असा उल्लेख करुन जातीचा दाखला दिला जातो. या नोंदी शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये सर्वसाधारणपणे आढळून येोतात. या नांदीचाच उल्लेख जातीच्या दाखल्यात करण्यात येत असतो. अशा प्रकारे नोंदी करुन जो जातीचा दाखला दिलेला आहे, तो वैध समजला जात नाही. म्हणून सर्व सक्षम प्राधिकान्यांनी जातीचा दाखला देताना अनुसूचित जमातीच्या यादोमध्ये ज्याप्रमाणे त्या जमातीचा उल्लेख आहे, तो उल्लेख करुन जातीचे दाखले देण्याबाबत दक्षता घेण्यात यावी. जातीचा दाखला देताना “भिल, ठाकूर, कोकणा, कोकणी, वारली, कातकरी, कोळी महादेव,” अशा प्रकारे उल्लेख करुन जातीचे दाखले देण्यात यावेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Table of Contents
(Adivasi Hindu Nahi Pripatrak) आदिवासी हिंदू नाही आपले सरकार पोर्टलवरील तक्रार
- प्रती, सर्व मुख्याध्यापक. पुणे जिल्हा सर्व शाळा, पुणे.
- विषय :- आदिवासी विदयार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे होणा-या धर्माच्या उल्लेखाविषयी.
- संदर्भ :- आपले सरकार पोर्टलवरील तक्रार क्र. २१७८.
उपरोक्त संदर्भीय विषवान्चचे, आपले सरकार पोर्टलवर आदिवासींना देण्यात येणा-या शाळेच्या दाखल्यामध्ये धर्माचा उल्लेख आढळतो त्यामुळे आदिवासी ममाजाचे भविष्यान नुकसान होऊ नये यासाठी दाखल्यामध्ये व शाळेच्या रजिस्टर मध्ये धर्माचा उन्ले कर नये अभी विनंतीवजा तकार या कार्यालयाला पाप्त झालेली आहे.
तरी आपणास या पत्राद्वारे मूचित करण्यात येते की, आदिवासी विकास विभागाकडील शासन परिपत्रक क्रमांक एमटीमी-१०९९/प्र.क.३१/का. १० दिनांक १२ जानेवारी २००० मधील मूचनेनुमार कार्यवाही करण्यात यावी.
सर्व मुख्याध्यापक यांना सूचना
- प्रति, सर्व मुख्याध्यापक (सर्व माध्यमे)
- विषय :- दिनांक २६/०१/२०१९ रोजी विदयार्थ्यांचे जनरल रजिस्टर मधील नोंदींचे अवलोकन करणेबाबत..
उपरोक्त विषयानुसार सर्व जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक तसेच खाजगी प्रार्यामक, माध्यमिक सर्व शाळांना कळविण्यात येते की विदयार्थी शाळेत दाखल करताना त्यांचे नाव जन्मतारिख जात, धर्म जन्मठिकाण, आईचे नाव व मातृभाषा इ. उल्लेख असतो. सदरची नोंद अचुक नसेल तर भविष्यात विदयाथी व पालक यांना फार मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो.
तसेच नावात, जन्मतारखेत किंवा जातीची नोद करताना जर काही चुका झालेल्या असतील तर त्या आत्ताच लक्षात याव्यात म्हणजे प्रस्ताव देऊन मंजुरी घेवुन आदेशानुसार नोंदीमध्ये दुरुस्ती करता येईल.
म्हणून दिनांक २६/०१/२०१९ रोजी सर्व पालकांसमक्ष शिकणा-या विदयार्थ्यांचे नोंदीचे वाचन करावे. पालकांच्या निदर्शनास आणावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास केंद्रप्रमुखांमार्फत कळविण्यात यावा. किंवा काही दुरुस्तीचे प्रस्ताव असतील तर ते त्वरित सादर करावेत.
- प्रति,
- मुख्याध्यापक,
- सर्व मनपा, खाजगी, अनुदानीत, विना अनुदानीत प्राथमिक शाळा शिक्षण विभाग प्राथमिक
- विषय :- आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे होणा-या धर्माच्या उल्लेखाबाबत…
- संदर्भ : शासन परिपत्रक क्र. एसटीसी-१०९९/प्र.क्र.३१/का-१० दि.१२/०१/२०००

परिपत्रक : Adivasi Hindu Nahi Pripatrak
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. एसटीसी-१०९९/प्र.क्र.३१/का-१० दिनांक १२ जानेवारी २००० च्या परिपत्रकानुसार अनुसुचीत जमातीच्या व्यक्तींना जातीचा दाखला देताना हिंदू-भिल, हिंद ठाकूर, हिंदू-कोकणी, हिंदू-वारली, हिंदू-कातकरी, हिंदू-कोळी महादेव असा उल्लेख करुन दाखला दिला जातो या नोंदी शाळा सोडल्याच्या दाखल्या मध्ये सर्वसाधारणपणे आढळून येतात. शाळा सोडल्याच्या दाखल्या मध्ये या नोंदीचाच उल्लेख जातीच्या दाखल्यात करण्यात येत असतो. अशा प्रकारे नोंदी करुन जो जातीचा दाखला दिला जातो तो दाखला वैद्य समजला जात नाही.
सबब सदर परिपत्रकान्वये सर्व संबंधित मुख्याध्यापकांना निर्देशीत करण्यात येते की जातीचा दाखला देताना शासन परिपत्रक क्र. एसटीसी-१०९९/प्र.क्र.३१/का-१० दि.१२ जानेवारी २००० नुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
निष्कर्ष
आदिवासी हिंदू नाही हरे सर्व परिपत्रक वाचलेच असाल. तरी महाराष्ट्र राज्यातील सर्व आदिवासी बांधवाना हि माहिती नक्कीच शेअर करा. धन्यवाद








