Anganwadi cum creche : पाळणा योजना सुरू

Anganwadi cum creche Palana Yojana In Marathi :  राज्यातील ग्रामीण भागातील शासकीय नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या लहान मुलांना सांभाळ करता येत नाही. म्हणून गावातील अंगणवाडीत दोन महिला सांभाळ करतील अशा महिलांसाठी हि योजना सुरु केली आहे, एक प्रकारे अंगणवाडी मध्ये नवीन महिला नोकरीला लागतील.

पाळणा योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अद्याप सूचना दिलेल्या नाहीत. तरी ज्या कोणाला नोकरी करायची असल्यास आताच शौक्षणिक कागदपत्रेचा एक बंच गोळा करून सोबत ठेवा, लवकरच अंगणवाडी पाळणा सेविका व एक पाळणा मदतनीस म्हणून भरती निघणार आहे.

Anganwadi cum creche : भारत सरकारच्या दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती मधील “सामर्थ्य” या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यात “पाळणा” ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

काय आहे? पाळणा योजना (What Is Anganwadi cum creche)

केंद्र आणि राज्याच्या शासकीय नोकरी करणाऱ्या महिलांना आपल्या मुलांची काळजी त्यांच्या घरी घेता येत नव्हती, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ६ महिने ते ६ वर्ष वयोगटातील मुलांसाठी राज्यातील सर्व अंगणवाडीत “पाळणा” योजना राबवण्यात येणार आहे. 

पाळणा योजनेअंतर्गत मुलांना मिळणाऱ्या सुविधा  

  • – डे केअर सुविधा
  • – पूर्व शालेय शिक्षण
  • – पूर्वपोषण आहार
  • – वाढीचे निरीक्षण
  • – आरोग्य तपासणी
  • – लसीकरण 
  • – दिवसातून तीन वेळा आहार (सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम शिजवलेले जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता)

पाळणाघर योजना मधून महिन्यातील २६ दिवस, दररोज ७.५ तास अंगणवाडी सुरू असणार आहे. पाळणाघराच्या योजना अंतर्गत लवकरच महिला व बालविकास मार्फत व्यवस्थापनासाठी एक पाळणा सेविका व एक पाळणा मदतनीस नेमण्यात येईल.

अंगणवाडी पाळणा सेविका भरतीसाठी लागणारे कागदपत्रे

  • १० वी पास आणि १२ वी पास
  • पदवीधर आवश्यक
  • आधार कार्ड पतीच्या नावाने असणे आवश्यक आहे.
  • बँक पासबुक पतीच्या नावाने असणे आवश्यक आहे.
  • स्वयं घोषणा रहिवासी दाखला.
  • अनुसूचित जाती / जमाती असल्यास जातीचा दाखला
  • ग्रामपंचायत चा ठराव
  • चारित्र्य प्रमाणपत्र ( संतापी महिलास फॉर्म भरता येणार नाही.)
  • इतर कागदपत्रे

अंगणवाडी पाळणा मदतनीस भरतीसाठी लागणारे कागदपत्रे

  • १० वी पास आणि १२ वी पास.
  • आधार कार्ड पतीच्या नावाने असणे आवश्यक आहे.
  • बँक पासबुक पतीच्या नावाने असणे आवश्यक आहे.
  • स्वयं घोषणा रहिवासी दाखला.
  • अनुसूचित जाती / जमाती असल्यास जातीचा दाखला
  • चारित्र्य प्रमाणपत्र ( संतापी महिलास फॉर्म भरता येणार नाही.)
  • ग्रामपंचायत चा ठराव

भारत सरकारने सद्यस्थितीत दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात तीनशे पंचेचाळीस पाळणा सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र च्या सरकार ने भारत सरकार ला मान्यता दिली आहे कि पाळणा सेविका व एक पाळणा मदतनीस यांची अधिका अधिक जागा भरू. तसेच, पाळणा योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश देण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

शासन परिपत्रक :-

केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती मधील “सामर्थ्य” या कार्यक्रमांतर्गत राज्यात पाळणा (Anganwadi cum creche) ही योजना सुरु करण्यास संदर्भाधीन क्रमांक २ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. 

शासन निर्णय

राज्य सरकार ने पाळणा (Anganwadi cum creche) या योजने अंतर्गत भारत सरकार च्या सद्यस्थितीत दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात तीनशे पंचे चाळीस पाळणा (Anganwadi cum creche) सुरू करण्यास तसेच केंद्र शासनाकडून यापुढे जस जशी मंजुरी देण्यात येईल त्याप्रमाणे पाळणा घर (Anganwadi cum creche) सुरु करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. 

पाळणा योजनेची अंमलबजावणी

सदर पाळणा योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र एकात्मिक बाल विकास सेवा योजना मार्फत प्रत्येक आयुक्तालयाकडून संदर्भाधीन क्र. ३ व ४ येथील पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून सोबतच्या परिशिष्टानुसार मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

पाळणा योजेनेचे सूचना

राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन पाळणा (Anganwadi cum creche) या योजनेची अंमलबजावणी तात्काळ सुरू होईल याबाबतची दक्षता आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी घ्यावी. 

त्यानुसार राज्यातील एकूण अंगणवाडी केंद्रांपैकी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय स्तरावरून निश्चित केलेल्या तीनशे पंचे चाळीस पाळणा अंगणवाडी केंद्रांकरिता “पाळणा योजना”(Anganwadi cum creche) कार्यान्वित करण्यात यावीत. तदनंतरच्या कालावधीत केंद्र शासनाकडून मंजुर करण्यात येणा-या पाळणा (Anganwadi cum creche) च्या बाबतीत शासन मान्यतेने पुढील कार्यवाही करावी.

“पाळणा योजना” (Anganwadi cum creche) या योजनेबाबत केंद्र व राज्य शासनाकडून निर्गमित केलेले अथवा करण्यात येणारे आदेश विचारात घेऊन योजनेची अंमलबजावणी होण्याबाबत आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे सदर मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने ही योजना राबविण्यात येणार आहे.

निकष

अंगणवाडी “पाळणा” योजनेबाबत शासन निर्णय दिलेला आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकार लवकरच भरती घेतील इच्छुक महिला असतील त्यांनी आताच तयारीला लागा. तसेच अंगणवाडी “पाळणा” योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्कीच कमेंट करा. जेणेकरून आपल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही देऊ. धन्यवाद.

You Tube Video अंगणवाडी “पाळणा” (Anganwadi cum creche) योजना

1 thought on “Anganwadi cum creche : पाळणा योजना सुरू”

Leave a Comment

Exit mobile version