Gramin Pashudhan Yojana Online Registration 2026

Gramin Pashudhan Yojana Online Registration 2026: ५० शेळ्या आणि ५ बोकड गटासाठी असा करा अर्ज, मिळवा ८.५३ लाखांपर्यंत अनुदान!

Scheme

तुम्हाला जर थोड्या मोठ्या प्रमाणात शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर महाराष्ट्र शासनाने तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केली आहे. Gramin Pashudhan Yojana Online Registration या योजनेअंतर्गत सरकारकडून ५० शेळ्या आणि ५ बोकड यांचा गट दिला जाणार असून, यासाठी तब्बल ८ लाख ५३ हजार ९१५ रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

या योजनेत फक्त शेळ्या-बोकडच नाही, तर त्यांचा ३ वर्षांचा विमा, शेड बांधकाम आणि आवश्यक साधनसामग्रीसाठी देखील आर्थिक मदत दिली जाते. या लेखात आपण Gramin Pashudhan Yojana Online Registration 2026 कुठे व कसे करायचे, प्रकल्पाची एकूण किंमत किती आहे, पात्रता आणि कागदपत्रे कोणती लागतील याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Table of Contents

योजनेचे स्वरूप आणि मिळणारे लाभ

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्याला खालीलप्रमाणे संपूर्ण पॅकेजचा लाभ मिळतो:

  • पशुधन गट: ५० शेळ्या आणि ५ बोकड (किंवा ५० मेंढ्या आणि ५ मेंढे).
  • विमा संरक्षण: या संपूर्ण पशुधन गटाचा ३ वर्षांचा विमा.
  • पायाभूत सुविधा: गोठा (शेड) बांधकाम, कडबा कुट्टी यंत्र आणि ३ किलोवॅट क्षमतेचा सोलर पॅनेल.
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन (महाडीबीटी २.० पोर्टलवर).

प्रकल्पाची एकूण किंमत आणि अनुदानाचे गणित

शासनाने ५० शेळ्या आणि ५ बोकड या प्रकल्पाची एकूण किंमत ११ लाख ३८ हजार ५५४ रुपये इतकी निश्चित केली आहे. या खर्चाचे सविस्तर विभाजन खालील तक्त्यात दिले आहे:

प्रकल्पाचा घटकतपशीलअंदाजित खर्च (रुपये)
५० शेळ्या / मेंढ्याप्रति शेळी ₹१२,००० प्रमाणे₹६,००,०००
५ बोकड / मेंढेप्रति बोकड ₹१५,००० प्रमाणे₹७५,०००
एकूण पशुधन गट किंमत५० शेळ्या + ५ बोकड₹६,७५,०००
३ वर्षांचा विमा१२% विमा + १८% GST सह₹१,०१,५५४
शेड निर्मितीगोठा बांधकामासाठी₹२,००,०००
कडबा कुट्टी यंत्रचारा कापणी मशिन₹३०,०००
सोलर युनिट३ किलोवॅट सोलर पॅनेल₹१,३२,०००
एकूण प्रकल्प किंमतसंपूर्ण प्रकल्पाचा खर्च₹११,३८,५५४

प्रवर्गानुसार मिळणारे अनुदान:

  1. सर्वसाधारण प्रवर्ग (General / OBC): यांना प्रकल्प खर्चाच्या ५०% अनुदान मिळेल, म्हणजेच एकूण ₹५,६९,२७७ इतके अनुदान देय राहील.
  2. अनुसूचित जाती व जमाती (SC / ST): यांना प्रकल्प खर्चाच्या ७५% अनुदान मिळेल, म्हणजेच तब्बल ₹८,५३,९१५ इतके अनुदान मिळणार आहे.

महत्त्वाची सूचना (अनुदान वितरण टप्पे): हे अनुदान अर्जदाराला आगाऊ (अगोदर) मिळत नाही, तर दोन टप्प्यांत वितरित केले जाते. सुरुवातीला लाभार्थ्याला स्वतः खर्च करावा लागतो. पहिल्या टप्प्यात शेड निर्मिती व साधनसामग्री खरेदी केल्यानंतर एकूण अनुदानाच्या ५०% रक्कम दिली जाते आणि दुसऱ्या टप्प्यात शेळी-मेंढी गट खरेदी केल्यानंतर उर्वरित ५०% अनुदान दिले जाते.

या योजनेअंतर्गत कोणत्या व्यवसायांसाठी अनुदान मिळते?

शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून खालील प्रकल्पांसाठी आर्थिक मदत मिळू शकते:

  1. दुधाळ जनावरे वाटप: संकरित गाई किंवा सुधारित म्हशींचा गट (२, ४ किंवा ६ जनावरांचा गट).
  2. शेळी व मेंढी पालन: स्थानिक किंवा सुधारित जातीच्या शेळ्या-मेंढ्यांचा गट.
  3. कुक्कुटपालन (Poultry Farming): मांसल व अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे संगोपन.
  4. वैरण विकास (Fodder / Silage): जनावरांसाठी मुरघास निर्मिती व चारा पीक लागवड.

लाभार्थी निकष आणि आरक्षण

या योजनेसाठी राज्यातील सर्व प्रवर्गातील पात्र नागरिक अर्ज करू शकतात:

  • अत्यल्प भूधारक शेतकरी: १ हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी.
  • अल्पभूधारक शेतकरी: १ ते २ हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी.
  • इतर पात्र घटक: वनहक्क धारक आणि महिला बचत गट हे सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • आरक्षण: या योजनेत अ, ब, क, ड नुसार आरक्षण लागू असून महिलांसाठी ३०% आणि दिव्यांग व्यक्तींसाठी ५% आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे.

योजनेसाठी पात्रता आणि निकष (Eligibility Criteria)

Gramin Pashudhan Yojana Online Registration साठी, पात्रता आणि निकष खालीलप्रमाणे पहा.

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे.
  • कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्जदाराकडे जनावरे सांभाळण्यासाठी स्वतःची जागा किंवा गोठा असणे आवश्यक आहे.
  • महत्त्वाची अट: या वर्षी लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने न होता ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (First Come First Serve) या तत्त्वावर होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करणे फायदेशीर ठरेल.

योजनेसाठी अटी आणि शर्ते

  1. जमिनीची अट: अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर किमान १ एकर जमीन असणे आवश्यक आहे. जर स्वतःची जमीन नसेल, तर किमान ५ वर्षांचा नोंदणीकृत भाडेकरार (Registered Rent Agreement) केलेली जमीन असावी. (टीप: वनहक्क धारकांना ही दोन्ही जमीन अट लागू राहणार नाही).
  2. प्रशिक्षण किंवा अनुभव प्रमाणपत्र: पशुपालन किंवा दुग्ध व्यवसायाचे शासकीय/निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा किमान २ वर्षांचा शेळी-मेंढी व्यवसायाचा अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे. (हे प्रमाणपत्र आत्ता अर्ज करताना लागणार नाही, तर अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ घेण्यापूर्वी सादर करावे लागेल).

आवश्यक कागदपत्रे

Gramin Pashudhan Yojana Online Registration 2026 साठी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत:

  • जमिनीचा पुरावा: स्वतःच्या नावे असलेला ७/१२ उतारा किंवा स्वतःची जमीन नसल्यास ५ वर्षांचा नोंदणीकृत भाडेकरार (रेंट ॲग्रीमेंट).
  • वनहक्क धारकांसाठी: ७/१२ च्या इतर अधिकारात नोंद किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र.
  • दिव्यांग प्रमाणपत्र: अर्जदार दिव्यांग असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
  • बचत गट प्रमाणपत्र: महिला बचत गटाच्या माध्यमातून अर्ज करत असल्यास गटाचे प्रमाणपत्र.
  • इतर आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, बँक पासबुक आणि जातीचा दाखला (SC/ST प्रवर्गासाठी).

Gramin Pashudhan Yojana Online Registration 2026: अर्ज कसा करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल:

अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वात आधी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत MahaDBT 2.0 पोर्टल (mahadbt2.maharashtra.gov.in) वर जा.

Gramin Pashudhan Yojana Online Registration 2026, MahaDBT 2.0 पोर्टल
Gramin Pashudhan Yojana Online Registration 2026, MahaDBT 2.0 पोर्टल

लॉगिन किंवा नवीन नोंदणी करा: तुमचा MahaID आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. तुमचे खाते नसेल, तर ‘नवीन अर्जदार नोंदणी’ वर क्लिक करून आधार क्रमांकाद्वारे तुमचे प्रोफाईल तयार करा.

Gramin Pashudhan Yojana Online Registration 2026, MahaDBT 2.0 पोर्टल Log In
Gramin Pashudhan Yojana Online Registration 2026, MahaDBT 2.0 पोर्टल Log In

प्रोफाईल अद्ययावत करा: लॉगिन केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, बँक तपशील आणि जमिनीची माहिती अचूक भरा.

Gramin Pashudhan Yojana Online Registration 2026, MahaDBT 2.0 पोर्टल Profile
Gramin Pashudhan Yojana Online Registration 2026, MahaDBT 2.0 पोर्टल Profile

योजना निवडा: मुख्य डॅशबोर्डवर ‘पशुसंवर्धन विभागाच्या योजना’ (Animal Husbandry Department) या पर्यायावर क्लिक करा.

Gramin Pashudhan Yojana Online Registration 2026, MahaDBT 2.0 पोर्टल Scheme
Gramin Pashudhan Yojana Online Registration 2026, MahaDBT 2.0 पोर्टल Scheme

घटक निवडा: तिथे ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ निवडा. त्यानंतर तुम्हाला गाय-म्हैस, शेळीपालन किंवा कुक्कुटपालन यापैकी जो व्यवसाय करायचा आहे, तो घटक निवडा.

कागदपत्रे अपलोड करा: विचारलेली सर्व कागदपत्रे योग्य साईजमध्ये अपलोड करा.

अर्ज सबमिट करा: सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट (पावती) काढून जवळ ठेवा.

Gramin Pashudhan Yojana Online Registration Staus कसे पाहावे?

  1. सर्वात आधी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महाडीबीटी २.० (MahaDBT 2.0) या पोर्टलवर जा.
  2. तुमचे युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  3. डॅशबोर्डवर ‘पशुसंवर्धन विभाग’ निवडा आणि त्यामध्ये ‘Gramin Pashudhan Yojana Online Registration‘ या पर्यायावर क्लिक करा.
  4. त्यानंतर ‘५० शेळ्या + ५ बोकड गट’ हा घटक निवडून Gramin Pashudhan Yojana Online Registration Staus चेक करा.

Tips: Gramin Pashudhan Yojana Online Registration, या योजनेचा सविस्तर शासन निर्णय (GR) वाचण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अधिकृत GR PDF (202603091924368401) डाउनलोड करून तपासू शकता.

Gramin Pashudhan Yojana Online Registration अनुभव प्रमाणपत्र PDF साठी क्लिक करा.

योजनेची थोडक्यात माहिती (Scheme Overview)

तपशीलमाहिती
योजनेचे नावमुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना
विभागपशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन
लाभार्थीराज्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील तरुण
अनुदान (Subsidy)सर्वसाधारण प्रवर्ग ५०% आणि अनुसूचित जाती/जमाती ७५%
अर्ज सुरू होण्याची तारीख२६ नोव्हेंबर २०२६
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन (MahaDBT 2.0 पोर्टल)
निवड पद्धतप्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First Come First Serve)

Gramin Pashudhan Yojana Online Registration – नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q१. ५० शेळ्या आणि ५ बोकड योजनेसाठी एकूण किती अनुदान मिळते?

उत्तर: प्रकल्पाची एकूण किंमत ₹११,३८,५५४ असून सर्वसाधारण (General/OBC) प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५०% म्हणजेच ₹५,६९,२७७ आणि अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५% म्हणजेच ₹८,५३,९१५ इतके अनुदान मिळते.

Q२. शेळीपालन योजनेसाठी स्वतःची जमीन नसल्यास अर्ज करता येतो का?

उत्तर: होय, जर तुमच्या स्वतःच्या नावावर १ एकर जमीन नसेल, तर तुम्ही किमान ५ वर्षांचा नोंदणीकृत भाडेकरार (Registered Rent Agreement) केलेली जमीन दाखवून या योजनेसाठी अर्ज करू शकता.

Q३. अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे का?

उत्तर: नाही, ऑनलाइन अर्ज भरताना प्रशिक्षण प्रमाणपत्राची आवश्यकता नसते. मात्र, प्रत्यक्ष अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी शासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा २ वर्षांचा अनुभव दाखला सादर करणे आवश्यक आहे.

Q४. पशुधन योजना २०२६ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर: सध्या २६ नोव्हेंबर २०२६ पासून Gramin Pashudhan Yojana Online Registration अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उद्दिष्ट (Target) पूर्ण होईपर्यंत आणि ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. शेवटची तारीख निश्चित झालेली नाही.

निष्कर्ष (Conclusion)

महाराष्ट्र शासनाची Gramin Pashudhan Yojana Online Registration ही राज्यातील शेतकरी, महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी शेळीपालन व्यवसाय मोठ्या स्तरावर उभारण्याची एक सुवर्णसंधी आहे. ५० शेळ्या आणि ५ बोकडांसह शेड, सोलर पॅनेल आणि ३ वर्षांचा विमा एकाच छताखाली मिळत असल्याने व्यवसाय सुरू करण्याचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होतो. तुम्ही पात्र असाल, तर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून महाडीबीटी २.० (MahaDBT 2.0) पोर्टलवर लवकरात लवकर आपला ऑनलाइन अर्ज नक्की सादर करा आणि या लेखाची माहिती इतर गरजू शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत