History of Dhabadevi Ancient Temple | धबादेवी प्राचीन मंदिराचा इतिहास.

On: October 4, 2025 3:59 PM
Follow Us:
History of Dhabadevi Ancient Temple | धबादेवी प्राचीन मंदिराचा इतिहास.

नमस्कार वाचक मित्रांनो आज मी तुम्हाला धाबादेवीचे प्राचीन मंदिर (History of Dhabadevi Ancient Temple ). धबादेवी मंदिराचा इतिहास. बद्दल माहिती देत आहे, जे जुन्या काळातील छान असा मंदिर आहे, चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घ्या.

धुळे जिल्ह्यातील : शिरपूर तालुक्यात  प्रसिद्ध असा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला स्थळ म्हणजे धाबादेवी. येथील परिसर निसर्ग सौंदर्याने खुलून गेला आहे़. हिरवीगार  झाडी, हिरवा,गर्द,शालू पांघरलेले गर्भगिरीचे डोंगर, सातपुडाचा डोंगर, या सर्वांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी शिरपूर तालुक्यातील आदिवासी बांधव, बरोबर इतर समाज बांधव देखील, या ठिकाणी अनेक पर्यटक कुटुंबियासोबत रविवारी वन डे पिकनिक म्हणून या परिसरात गर्दी करतात़. धाबादेवी येथे श्री गौतम ऋषि महाराज यांचे यात्रा भरत असते, व महाआरती दिवाळी उत्सवाच्या कालावधीत भरणारा गौतम ऋषि महाराज यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या दोन दिवसा अगोदर होत असते.

धाबदेवी एक पर्यटन स्थळ :

धाबादेवी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून न्यू बोराडी ग्रामपंचायत च्या सलाईपाडा गावाजवळ तसेच या परिसरात अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेली स्थळे आहेत़. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून धाबादेवी हे जागतिक नकाशावर पोहचले आहे़. धाबादेवी परिसरातील निसर्ग सौंदर्य लाभलेल्या विविध स्थळांची विकास कामे हाती घेण्यात आली होते. यात म्हत्वाचे म्हणजे धाबादेवी येथे धबधबा देखील आहे. साधारणता हा धबधबा रस्त्यावरून दिसत नाही परंतु घनदाट जंगलात हा दिसून येतो. रस्ता चांगला नसल्याने लोकं तिथे पोहचू शकत नाही.

History of Dhabadevi Ancient Temple | धबादेवी प्राचीन मंदिराचा इतिहास.

सातपुडा धबादेवी मंदिर. History of Dhabadevi Ancient Temple

धबादेवी मंदिर. जवळच सर्व परिसर हा हिरवागार दिसतो. धाबादेवी च्या सातपुड्यातील छोटे-मोठे धबधबे आहे. धुळे जिल्हाच्या शिरपूर तालुक्यातील हा सातपुड्याच्या पर्वत रांगा ओल्याचिंब परिसरातून वाहणारे ओढे नाले यात भर घालत असतात. सातपुड्याच्या पर्वत च्या निसर्गाचा हा मनोहारी आविष्कार डोळ्यात साठविण्यासाठी आणि मनमुरादपणे आनंद लुटण्यासाठी शिरपूर तालुक्यातील पर्यटकांना आवडत असतो.

धाबादेवी येथील निसर्ग आणि धबधबा.

धाबादेवी येथील निसर्गरम्य वातावरण व हिरवळीने शालू पांघरलेल्या डोंगरांमध्ये, खळखळून वाहणारा पांढरा शुभ्र सलाईपाडा गावाजवळील धाबादेवी येथील निसर्ग आणि धबधबा आहे.आदिवासी बांधव पूर्वीपासून येथे नवस फेडण्यासाठी येतात. या मंदिराजवळच 200 मीटर च्या अंतर वर धबधबा आहे. येथे आजूबाजूला उंच डोंगर आहेत. जवळच दोन लहान धबधबे आहेत.

History of Dhabadevi Ancient Temple | धबादेवी प्राचीन मंदिराचा इतिहास.

धाबादेवी एक प्राचीन मंदीर. History of Dhabadevi Ancient Temple

धाबादेवी येथे प्राचीन मंदीर आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगेत असे डोंगर दर्या च्या पायथ्याशी असलेल्या धाबा देवी येथील पुरातन प्रसिद्ध असा गौतम ऋषि तीर्थक्षेत्र दीपावलीच्या दोन दिवशीय यात्रा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. येथे सुमारे सातव्या शतकातील धाबादेवी एक प्राचीन मंदीर आहे. धाबादेवी येथे देवदेवतांच्या मुर्ती आहे. म्हणजे पर्यटकांना एका दिवसात या ठिकाणी सर्व पर्यटन भेट घेता येते. या धाबादेवी स्थळांचा विकास झाला तर लोकांचे पर्यटन अजून जास्त वाळेल. व या आजूबाजूच्या ग्रामपंचायत च्या भागात लोकांना रोजगार मिळून विकासासाठी मदत होईल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़.

सातपुडा डोंगर मंदिर श्रध्दास्थान

शिरपूर शहरात विविध स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत़. सातपुड्याच्या टेकडीवर निसर्गरम्य परिसरात आहे आणि याच टेकडी वर श्री गौतम ऋषि महाराज यांचे मंदिर आहे. तसेच सातपुड्याच्या खुशित असंख्य अशा टेकडीवर दुर्बड्या गाव देखील आहे. याच ठिकाणी मॉ मूळ बिजासनी मातेचे मंदिर आहे. सातपुडा डोंगर मंदिर श्रध्दास्थान बरोबरच एक निसर्गरम्य परिसरात असल्याने ते एक पर्यटनाचे केंद्र बनले आहे. दुर्बड्या गावात २०० मिटर अंतरावर मंदिराच्या मूळ बिजासनी मंदिर दुर्बड्या येथील डोंगरावर आहे. पर्यटक तेथे जाऊन आंघोळ देखील करतात व पर्यटन चा खूप आनंद घेतात.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी दि. Oct. 2025 रोजी ऋषी महाराज धाबादेवी ता.शिरपुर जि.धुळे येथे यात्रेनिमित्त 1 दिवसचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व भाविकांनी गौतम ऋषी महाराज धाबादेवी, बाबा कुवर, घोड्याल माता, प्रधानदेवी, लहान घोड्याल माता, यांचा दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आव्हान गावकरांनी सांगितले आहे.

टिप:- (History of Dhabadevi Ancient Temple) धाबादेवी येथे येण्याचा मार्ग बोराडी पासून 7 कि.मी.अंतरावर आहे. व मध्यप्रदेश मधुन येण्याचं मार्ग निवाली ते घोडल्यापाणी व गुह्राडपाणी. तसेच दारु विक्री पुर्ण बंदी आहे. असा ग्रामपंचायत ठराव देखील टाकण्यात आले आहे.

निकष

वाचक मित्रांनो तुम्हाला आम्ही धबादेवी प्राचीन मंदिराचा इतिहास(History of Dhabadevi Ancient Temple), धाबदेवी एक पर्यटन स्थळ, सातपुडा धबादेवी मंदिर, धाबादेवी येथील निसर्ग आणि धबधबा, धाबादेवी एक प्राचीन मंदीर, सातपुडा डोंगर मंदिर श्रध्दास्थान अशी बरीच माहिती तुम्हाला या लेखात दिलेली आहे. तर मित्रांनो आम्ही दिलेली माहिती आपणास आवडली असेल तर आपल्या सातपुडा भागातील सर्व मित्रांना हि माहिती शेअर नक्कीच शेअर करा. आणि आपल्या काही शंका असेल तर आम्हला खाली कमेंट करून नक्कीच सांगा.

Leave a Comment