How to write a letter police for violation of Pesa Act and rules.: नमस्कार मित्रांनो आपण आदिवासी बहुन भागात खेड्यापाड्यात राहतो गावात शांतता राहावी म्हणून पेसा कायदा व नियम यांचे उल्लंघनचा पोलिसांना पत्र कसे लिहावे. त्या बाबत चा एक नमुना पत्र तुम्हाला वाचायला देत आहे. गरज भासल्यास आपला हाताने लिहून सादर करा.
Table of Contents
पेसा कायदा आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांना पत्र कसे लिहावे: How to write a letter police for violation of Pesa Act and rules
प्रति ,
पोलिस अधिक्षक ,
ग्रामीण पोलीस जि धुळे.
अर्जदार : अशोक पावरा
विषय : पेसा कायदा व नियम यांचे उल्लंघन
महोदय,
पेसा कायदा 1996 चे कलम 4(घ ) नुसार प्रत्येक ग्रामसभेला विवाद-तंट्यावर निर्णय देण्याची रूढ पद्धत यांचे जतन व संवर्धन करण्याचा अधिकार आहे आणि पेसा नियम 2014 च्या पोट नियम 17 नुसार गावांत शांतता , सुरक्षा आणि तंटामुक्तीसाठी शांतता समिती गठीत करण्याचा ग्रामसभेला अधिकार असताना गृह विभाग /पोलीस प्रशासन अनुसूचितक्षेत्रातील पेसा गावात गाडगे महाराज तंटामुक्ती समिती गठीत करून पेसा कायदा व नियम यांचे उल्लंघन करीत आहे .
तसेच पोलिस ठाण्यामध्ये पेसा गावांशी संबंधित ज्या सर्व प्रकरणामध्ये गुन्ह्याची नोद केली जाते त्याच्या अहवालाची एकप्रत ग्रामसभा किंवा शांतता समितीला पोलीस प्रशासन देत नाही असे निदर्शनास आले आहे.
महोदय , म्हणून आपणास विनंती आहे की धुळे जिल्ह्यतोल अनुसूचित क्षेत्त्रातील साक्री, शिरपूर तालुक्यातील ज्या पेसा गावात गाडगे महाराज तंटामुक्ती समिती गठीत केल्या आहेत त्या त्वरित बरख़ास्त कराव्यात .
तसेच अनुसूचित क्षेत्त्रातील ज्या पेसा गावात पोलिस ठाण्यामध्ये पेसा गावांशी संबंधित सर्व प्रकरणामध्ये गुन्ह्याची नोद केल्यास अहवालाची एकप्रत ग्रामसभा किंवा शांतता समितिलला तरित देण्याचे आदेश द्यावेत ही विनंती
सविनय सादर
आपले विश्वासू
पेसा कायदा आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांना पत्र कसे लिहावे. : How to write a letter police for violation of Pesa Act and rules
मा. सो. पोलीस अधीक्षक साहेबजिल्हा धुळे यांच्या सेवेची.
दिनांक : 12/03/2026
अर्जदार : अशोक पावरा
विषय : पोलिसांविरोधात पेसा कायदा आणि नियमांचे उल्लंघन केल्याबाबत.
महोदय
मी अशोक पावरा वरील विषयानुसार आपणास विनंती तक्रारी अर्ज करतो की, माझ्या गावात ग्रामसभेला विविध तंट्यावर निर्णय घेतले जातात त्यानुसार आमच्या ग्रामसभेला अधिकार असतानाही पिसा क्षेत्रात आम्ही विविध मुद्दे मांडत असताना, संत गाडगे महाराज तंटामुक्त समिती यांनी पेसा कायदा व नियमांची उल्लंघन केले होते त्या विरोधात मी जवळील पोलीस स्टेशन येथे या संदर्भात सर्व काही तक्रारी केल्या होत्या.
माझ्या जवळील पोलीस ठाण्यामध्ये, मी केलेल्या तक्राराची निकाली अजून लागलेली नाही तरी मी आपणास विनंती करतो की आपल्या कार्यालयातून, तंटामुक्तीसाठी शांतता समिती गठीत करण्याचा ग्रामसभेलाअधिकार असताना पोलीस प्रशासन अनुसूचितक्षेत्रातील पेसा गावात गाडगे महाराज तंटामुक्ती समिती गठीत करून पेसा कायदा व नियम यांचे उल्लंघन करीत आहे. म्हणून मी आपणास या संधर्भात योग्य अशी चौकशी करावी अशी विनंती करितो. ही नम्र विनंती.
निष्कर्ष :
आम्ही दिलेला वरील पेसा कायदा व नियम यांचे उल्लंघनचा पोलिसांना पत्र (How to write a letter police for violation of Pesa Act and rules) तुम्हाला आवडला असेल तर आपल्या सर्व आदिवासी बांधवांना किंवा इतर बांधवांना नक्कीच शेअर करा. (पेसा कायदा आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांना पत्र कसे लिहावे.)
FAQ
पेसा कायदा म्हणजे काय
सन १९९६ मध्ये पेसा कायदा चा अंमलबजावणी झाली आज पण प्रत्येक पेसा ग्रामपंचायत मध्ये या कायदानुसार ग्रामपंचायत चालत आहे. पेसा कायदा हा अनुसूचित जमाती साठी आहे. त्यांच्या ग्रामपंचायत मध्ये गावापासून ते त्यांची संस्कृती, रूढी प्रथा – परंपरा यांचे जतन संवर्धन हे ग्रामसभे मधून केले जाते, आणि त्यांची ग्रामपंचायत अधिक मजबूत व्हावी म्हणून हा पेसा कायदा आमलात आणला गेला आहे.
पेसा कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे?
PESA कायद्याची मुख्य उद्देश असे आहे कि, पेसा ग्रामपंचायत त्यांच्या ग्रामसभा मजबूत करणे, ५ % अबंध निधीतून अधिक विकास करणे. मुख्य उद्देश हाच कि पेसा ग्रामपंचायत अजून मजबूत व्हावी. तसेच पेसा ग्रामपंचायत सभा घेऊन अनुसूचित क्षेत्राच्या लोकांचे गरजा पूर्ण करणे तसेच पेसा कायदानुसार जबाबदाऱ्या योग्य भूमिका बजावणे असे होय.
पेसा कायदा कधी लागू झाला?
पेसा कायदा , 1996 मध्ये – गृह मंत्रालय यांनी अंमलबजावणी करून पेसा ग्रामपंचायत मजबूत व्हावी म्हणून 24 December 1996 मध्ये लागू झाला. Pesa Act Full Form Panchayats (Extension to Scheduled Areas) Act असा आहे.