जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Jaticha Dakhla Document Marathi

On: January 4, 2026 3:55 PM
Follow Us:
जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Jaticha Dakhla Document Marathi

Jaticha Dakhla Document Marathi : जातीचा दाखला महाराष्ट्रसाठी हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे जे विविध उद्देशांसाठी महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या व्यक्तीच्या जातीचा दाखला पडताळणी करते. जातीचा दाखला महाराष्ट्र साठी हे एक अधिकृत दस्तऐवज म्हणून काम करते जे व्यक्तीच्या कोणत्या जातीचा आहे हे पडताळणी करते. हे महाराष्ट्र सरकारद्वारे जारी केले जाते आणि प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याद्वारे देऊ केलेल्या विविध शासकीय कामे, शासकीय अनुदाने आणि विविध फायदे, जसे की शिष्यवृत्ती कार्यक्रम, आरक्षण लाभ आणि बरेच काही मिळविण्यासाठी वापरले जाते.

ST, SC, OBC आणि NT कास्ट मधून येणारे मुलं मुली साठी जातीचा दाखला डॉक्यूमेंट लिस्ट मराठी | ST, SC, OBC And NT Jaticha Dakhla Document Marathi

ओळखीचा पुरावा (कोणताही -१)

  • १) पॅन कार्ड
  • २) पासपोर्ट
  • ३) आरएसबीवाय कार्ड
  • ४) मनरेगा जॉब कार्ड
  • ५) ड्रायव्हिंग लायसन्स
  • ६) अर्जदाराचा फोटो
  • ७) सरकारी किंवा निमसरकारी संस्थांनी दिलेले ओळखपत्र

पत्त्याचा पुरावा (कोणताही -१)

  • १) पासपोर्ट
  • २) पाणी बिल
  • ३) रेशन कार्ड
  • ४) आधार कार्ड
  • ५) मतदार ओळखपत्र
  • ६) टेलिफोन बिल
  • ७) ड्रायव्हिंग लायसन्स
  • ८) वीज बिल
  • ९) मालमत्ता कर पावती
  • १०) ७/१२ आणि ८ अ/भाडे पावतीचे उतारे

इतर कागदपत्रे (कोणतेही -१)

  • १) इतर
  • २) प्रतिज्ञापत्र
  • ३) ८ अ उतारा
  • ४) ७/१२ उतारा
  • ५) जात वैधता
  • ६) खसराची प्रत
  • ७) ठेव पावती
  • ८) हक्कांची नोंद
  • ९) मतदार यादीची प्रत
  • १०) लाभार्थ्याचा फोटो
  • ११) सेवापुस्तिकेची प्रत
  • १२) मंडळ चौकशी अहवाल
  • १३) अर्जदाराचा फोटो आयडी
  • १४) लाभार्थ्याचा फोटो आयडी
  • १५) तलाठी पुस्तकाचा उतारा
  • १६) राजपत्र अधिसूचना प्रत
  • १७) शाळा सोडल्याचा दाखला
  • १८) मृत्यू प्रमाणपत्राची प्रत
  • १९) काकाच्या कोतवाल पुस्तकाची प्रत
  • २०) वडिलांच्या कोतवाल पुस्तकाची प्रत
  • २१) पगार प्रमाणपत्र किंवा फॉर्म १६
  • २२) दिनांकित फॉर्म ब मधील अर्ज
  • २३) वडिलांचा जात प्रमाणपत्र
  • २४) नातेवाईकाचा जात प्रमाणपत्र
  • २५) ग्रामपंचायतीचा रहिवासी पुरावा
  • २६) भावाचा जात वैधता पुरावा
  • २७) नगर परिषदेचा रहिवासी पुरावा
  • २८) आजोबांच्या कोतवाल पुस्तकाची प्रत
  • २९) टीसी बोनाफाईड प्रमाणपत्र (टीसी क्रमांक
  • ३०) आजीच्या कोतवाल पुस्तकाची प्रत
  • ३१) मालकाचा 3 वर्षांचा फॉर्म 16
  • ३२) नातेसंबंध प्रमाणपत्र (स्वतःचा नातेसंबंध )
  • ३३) आजोबांनी दत्तक घेतलेल्या मृत्युपत्राची प्रत
  • ३४) जातीच्या प्रमाणपत्राची प्रत
  • ३५) अर्जदाराने सादर केलेले प्रतिज्ञापत्र
  • ३६) विशेष कार्यकारी अधिकारी प्रमाणपत्र
  • ३७) तलाठीकडून 3 वर्षांचा उत्पन्नाचा दाखला
  • ३८) नोंद दर्शविणारा रजिस्टरचा उतारा
  • ३९) आजोबांच्या मृत्युपत्राची प्रत
  • ४०) अर्जदाराने सादर केलेला अर्ज
  • ४१) रेशनकार्ड आणि मतदार छायाचित्र ओळखपत्राची प्रत
  • ४२) महानगरपालिकेचा रहिवासी पुरावा
  • ४३) उत्पन्नाचा दाखला – 3 वर्षांचा पगाराचा दाखला
  • ४४) वडिलांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत
  • ४५) आजोबांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत
  • ४६) लाभार्थीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत
  • ४७) तलाठी / सरपंच / पोलिस पाटील यांचा चौकशी अहवाल
  • ४८) ग्रामपंचायत रजिस्टरमध्ये जन्म / मृत्युपत्राचा उतारा
  • ४९) राजपत्रामध्ये जाहिर केलेल्या नावातील बदलाबाबतचा पुरावा
  • ५०) स्थानिक सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जात प्रमाणपत्र
  • ५१) तहसीलदारांनी दिलेला गेल्या ३ वर्षांचा उत्पन्नाचा दाखला
  • ५२) नगरपालिका नगरसेवक/महानगरपालिकेच्या सदस्याचे प्रमाणपत्र

अनिवार्य कागदपत्रे (सर्व अनिवार्य)

  • १) ST, SC, OBC आणि NT जातीचा असल्यास संबंधित कागदपत्रे
  • २) जातीच्या प्रमाणपत्राच्या समर्थनार्थ पुरावे
  • ३) अर्जदाराच्या मूळ गाव/शहराचा पुरावा
  • ४) प्रतिज्ञापत्र जात प्रमाणपत्र (फॉर्म-२) आणि (फॉर्म-३)
  • ५) महसूल नोंदी किंवा ग्रामपंचायत नोंदीची प्रत
  • ६) जातीची अधिसूचना जारी होण्यापूर्वी जाती आणि सामान्य निवासस्थानाबाबत कागदपत्रे
  • ७) अर्जदार/वडील/किंवा नातेवाईकांच्या जन्म नोंदणीचा ​​उतारा
  • ८) अर्जदार किंवा त्याच्या वडिलांचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला
  • ९) वडील किंवा नातेवाईक असल्यास वैधता प्रमाणपत्र जे छाननी समितीने जारी केले आहे.
  • १०) अर्जदार, त्याचे वडील किंवा आजोबा यांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदणीचा ​​उतारा
  • ११) अर्जदार वडील किंवा नातेवाईक यांच्या जात/समुदाय श्रेणीचा उल्लेख असलेला सरकारी सेवा नोंदीचा उतारा

जातीचा दाखला कुठे मिळतो?

जातीचा दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम online अर्ज करावा लागतो. तेव्हाच जातीचा दाखला मिळतो. आपल्या जवळील आपले सरकार ऑनलाईन सेवा केद्र चे दुकान असेल किंवा ग्रामपंचायत मधील computer Operator असेल तेथे देखील अर्ज करू शकता. तेव्हा तेथे जाऊन विचारणा करावे आणि online करावा आणि तेथेच जातीचा दाखला मिळतो.

जातीचा दाखला कसे काढावे?

मित्रांनो जातीचा दाखला हे दोन प्रकारे लोकांना काढता येते सर्वप्रथम जर शिक्षण चालू आहे. शासकीय कार्यालय मधून काढता येतो. दुसरा आहे. शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तरी देखील ऑनलाईन माध्यमातून दाखला काढता येतो. (Jaticha Dakhla Document Marathi)

जातीचा दाखला काढण्यासाठी फॉर्म कुठे मिळेल

मित्रांनो तुम्हाला जातीचा दाखला काढायचा आहे. तर तुम्हाला आपल्या जवळील ऑनलाईन सेतू केंद्र ला भेट घ्यावी लागेल आणि जातीचा दाखला चा फॉर्म झेरॉक्स करून मिळेल. किंवा ग्रामपंचायत कॉम्प्युटर ऑपरेटर असेल त्यांच्या कडून देखील मिळेल. जातीचा दाखला फॉर्म दोन ठिकाणी मिळेल एक तर तुम्ही जर ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर तुम्हाला जातीचा दाखला अर्ज हा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मिळेल. (Jaticha Dakhla Document Marathi)

जातीचा दाखला काढण्यासाठी पात्रता काय आहे

मित्रांनो जर तुमचे शिक्षण घेत असाल तर जातीचा दाखला काढणे आवश्यक झाले आहे. वा तुम्ही एक नवीन वधू आणि वर असाल आणि तुम्हाला जर जातीचा दाखला काढायचे असेल तर तुम्ही खालील बाबींमध्ये पात्र असायला हवेत.(Jaticha Dakhla Document Marathi)

  • सर्वप्रथम तुम्हचे वय 5 वर्ष असेल तर तेव्हा काढू शकता.
  • यानंतर महाराष्ट्रातील किंवा भारतातील रहिवासी असायला हवेत.
  • यानंतर आजी आजोबा, आई वडील यांचे वरील कागदपत्रे असायला हवीत
  • यानंतर जातीचा दाखला काढण्यासाठी तिच्याजवळ तीन कमीत कमी साक्षीदार पाहिजेत

जातीचा दाखला ऑनलाइन कुठे मिळेल?

मित्रांनो जर तुम्हाला जातीचा दाखला काढण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने जर काढायचे झाले तर तुम्हाला राज्य सरकारच्या या (aaplesarkar.maha.online.gov.in) संकेतस्थळावरती जाऊन वरील कागदपत्रे अपलोड करून जातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने काढता येईल. (Jaticha Dakhla Document Marathi)

महाराष्ट्रात जात प्रमाणपत्र ऑनलाइन कसे डाउनलोड करायचे?

जात प्रमाणपत्र वेळ मर्यादा नियुक्त अधिकारी First Appellate Officer Second Appellate Officer (Jaticha Dakhla Document Marathi)

  • 1 जात प्रमाणपत्र (Jaticha Dakhla Document Marathi) 45 उपविभागीय अधिकारी/ उप. जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी जी
  • 2 जातीचे प्रमाणपत्र (Jaticha Dakhla Document Marathi) ४५ उपविभाग अधिकारी/ उपविभागीय अधिकारी/ उप अप्पर चांदी

हेही वाचा : १८०० रुपये भरल्यास Postal Life Insurance, मिळेल.

FAQ Jaticha Dakhla Document Marathi

जातीचा दाखला म्हणजे काय?

मित्रांनो जातीचा दाखला शिकणारे मुला मुलींना तसेच शासकीय योजना चा लाभ घेण्याकरिता आहे. कायद्याने हा कुठल्या तरी जातीचा आहे. हे दाखवण्याचे काम जातीचा दाखला म्हणजेच जातीचा दाखला करते.

जातीचा दाखला कुठे मिळते?

मित्रांनो तुम्हाला जातीचा दाखला हे सरकारी कार्यालयांमध्ये मिळू शकते जसे की ग्रामपंचायत, मधून किंवा सेतू केंद्र, नागरिक सुविधा केंद्र अशा ठिकाणी तुम्हाला जातीचा दाखला काढून मिळू शकते.

जातीचा दाखला काढण्यासाठी किती खर्च येतो?

साधारणतः जातीचा दाखला अर्ज करण्याची ऑनलाईन फी ३५ रु. आहे. ऑनलाईन सेतू चालक ५० रुपये घेतात. शासन निर्णय देखील जाहीर आहे, कि जास्त पैसे घेऊ शकत नाही.

Leave a Comment