Ladki Bahin Vinanti Arj in Marathi : ज्या लाडकी बहिणीचे पैसे बंद झाले. त्यांनी आम्ही दिलेले अर्ज आपल्या हाताने लिहून, तालुका महिला व बालविकास कार्यालयात, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय मध्ये किंवा मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्य. यांना विनंती अर्ज सादर करू शकता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा करा विनंती अर्ज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू करण्याबाबत तालुका महिला व बालविकास कार्यालय यांना खालीलप्रमाणे विनंती अर्ज करा
तालुका महिला व बालविकास कार्यालय विनंती अर्ज
- प्रति,
- तालुका महिला व बालविकास अधिकारी साहेब, जिल्हा
- दिनांक : 19/05/2026
- विषय : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा रद्द झालेला डी.बी.टी. लाभ दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यात बाबत.
- अर्जदार : madhuri Subhedar Vadile
महोदय,
मी खाली सही करणारी अर्जदार, जमुना शैलेश पावरा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची लाभार्थी असून माझा या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबर २०२५ पासून बंद करण्यात आलेला आहे. अर्ज पात्र करण्यासाठी मी सर्व प्रकारचे प्रयत्न्न केले.
मी सत्य प्रतिज्ञेवर नमूद करते की, ऑनलाईन केवायसी (KYC) प्रक्रियेदरम्यान संबंधित आपले सरकार सेवा केंद्राच्या चुकीमुळे माझ्या ई-केवायसीमध्ये त्रुटी झाल्याने माझा लाभ थांबविण्यात आला आहे. माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत कार्यरत नाही.
माझ्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नाही तसेच आमचे वार्षिक उत्पन्न ₹ २,५०,०००/- पेक्षा कमी आहे. साधारणता : १७ हजार रु. वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न आहे. तसेच माझे वय हे २८ वर्ष झालेले आहे. त्यामुळे मी सदर योजनेसाठी पूर्णतः पात्र आहे.
तरी माझ्या आधार कार्डची पुन्हा तपासणी करून झालेली चूक दुरुस्त करण्यात यावी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मला पुन्हा सुरू करून द्यावा, आपण योग्य ती कार्यवाही करून मला न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
आपली विश्वासू,
- अर्जदार : madhuri Subhedar Vadile
- राहणार : Betawad ता.शिरपूर
- जिल्हा : धुळे.
- आधार क्रमांक :205485456241
- ठिकाण : Betawad
- दिनांक : 19/05/2026
- मोबाईल क्रमांक : 7784512056
- अर्जदाराची सही
सोबत कागदपत्रे :
- १) आधार कार्ड झेरॉक्स
- २) रेशन कार्ड झेरॉक्स
लाडकी बहिण योजना साठी जिल्हा महिला व बालविका यांना विनंती अर्ज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू करण्याबाबत जिल्हा महिला व बालविकास कार्यालय यांना खालीलप्रमाणे विनंती अर्ज करा
जिल्हा महिला व बालविकास कार्यालय विनंती अर्ज
- प्रती,
- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब
- विषय : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालु करणेबाबत.
- अर्जदार : madhuri Subhedar Vadile
- राहणार : betavad ता.शिरपूर जिल्हा : धुळे.
- आधार क्रमांक :205485456241
- ठिकाण : Betwad
- दिनांक : 19/05/2026
- मोबाईल क्रमांक : 7784512056
महोदय,
मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची लाभार्थी असुन माझा लाभपासुन बंद झाला आहे.
मी सत्य प्रतिज्ञेवर कळवती की, मी माझी ई केवायसी प्रक्रिया न झाल्याने माझा लाभबंद झाला आहे. तरी आपणांस विनंती की, परत एकदा आम्हाला ई केवायसी करण्यासाठी पोर्टलवर संधी उबलब्ध करुन देण्यात यावी. मला या १५००/- अत्यंत गरज व आवश्यक्ता आहे.
- ठिकाण : Betawad
- दिनांक : 19/05/2026
- मोबाईल नं. : 7378375620
- अर्जदाराची सही
सोबत : आधार कार्ड झेरॉक्स व पासबुक झेरॉक्स देत आहे.
लाडकी बहिण योजना साठी मुख्यमंत्री यांना विनंती अर्ज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री यांना खालीलप्रमाणे विनंती अर्ज करा
- प्रति,
- मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्य.
- विषय : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू करण्याबाबत विनंती.
- अर्जदार : madhuri Subhedar Vadile राहणार. Betavad
महोदय,
सविनय विनंती की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली त्या वेळी राज्यातील सर्व पात्र महिलांना नियमितपणे हप्ते मिळत होते. या योजनेमुळे अनेक गरीब व गरजू महिलांना मोठा आधार मिळाला होता.
परंतु सध्या दर महिन्याला काही ना काही महिलांना अपात्र ठरवून त्यांचे हप्ते बंद केले जात आहेत. विशेष म्हणजे ज्या महिलांना खरोखर या पैशांची गरज आहे, ज्या गरीब परिस्थितीत जीवन जगत आहेत, अशाच अनेक महिलांचे पैसे बंद करण्यात आले आहेत.
दुसरीकडे ज्यांच्याकडे स्वतःचे घर, चारचाकी गाड्या, चांगली योकरी किंवा सरकारी नोकरी आहे, अशा काही महिलांना अजूनही या योजनेचा लाभ मिळत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे खन्या गरजू महिलांमध्ये नाराजी निर्माण होत आहे.
तरी मा. मुख्यमंत्री साहेबांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती चौकशी करून खन्या पात्र व गरजू महिलांचे बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू करावेत, ही नम्र विनंती.
आपला विश्वासू,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा हप्ता जमा झाला नाही? लाडकी बहिणीचे पैसे बंद झाले. अशा महिलांनी सोमवारी किंवा मंगळवारी जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभाग जाऊ नये. कारण आत्ताच राज्य सरकारकडून सूचना झाल्यामुळे त्याची पूर्वतयारी करण्यासाठी वेळ लागेल म्हणून कृपया कोणीही गर्दी करू नये चार-पाच दिवसानंतर जावे.
- ई-KYC प्रक्रिया अपूर्ण राहिलेल्या
- चुकीची माहिती भरलेल्या
- कागदपत्रांमध्ये त्रुटी असलेल्याना.
महिलांना आता पुन्हा एकदा कागदपत्रे दुरुस्ती व जमा करण्याची संधी देण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण विभागामार्फत विशेष मुदत देण्यात आली असून, ज्यांची KYC बाकी राहिली होती किंवा चुकीची झाली होती त्यांनी आवश्यक कागदपत्रे तात्काळ जमा करावीत.
हे देखील वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता २ मिनिटांत चेक करा.
योजनेचा लाभ घेण्यासाठी ही शेवटची सुवर्णसंधी ठरु शकते!
सर्व अपात्र महिलांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करून लाभ निश्चित करुन घ्यावा. तसेच तुमची EKYC सह लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवा!











