नुकसान भरपाई महावितरण तक्रार अर्ज कसा लिहावा : Mahavitaran Tkrar Arj in Marathi

On: January 4, 2026 5:27 PM
Follow Us:
नुकसान भरपाई महावितरण तक्रार अर्ज कसा लिहावा : Mahavitaran Tkrar Arj in Marathi

Mahavitaran Tkrar Arj in Marathi : नुकसान भरपाईसाठी महावितरण तक्रार अर्ज कसा लिहावा | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तक्रार अर्ज नमुना मराठी pdf | महावितरण तक्रार अर्ज नमुना | महावितरण विनंती अर्ज कसा लिहावा नमुना अर्ज वाचा आणि आपल्या पद्धतीने शेअर करा.

Mahavitaran Tkrar Arj in Marathi : तुमच्या घरात किंवा शेतात वाढीव लाईट बिल आल्यास, शेतात पोल डीपी असल्यास, वीजेची तार तुटल्यास, नुकसान भरपाई कसी मंगावी त्या बद्दल कायदेशीर अडचणीत येऊ नये, त्या करिता आपणास योग्य असा महावितरण तक्रार अर्ज नमुना देत आहे.  ( Mahavitaran Tkrar Arj in Marathi ) 

नुकसान भरपाई मिळण्याबाबत महावितरण तक्रार अर्ज : Mahavitaran Tkrar Arj in Marathi

  • प्रति
    महावितरण महाराष्ट्र शासन
    उप कार्यकारी अभियंता कार्यालय (तालुका जि, लिहा )
    यांच्या सेवेशी ता. (  )  जिल्हा (   ) .
    दिनांक
  • अर्जदार चे नाव पूर्ण पत्ता लिहा : (                                               )
    मो. (                                     ) 
  • विषय : नुकसान भरपाई मिळण्याबाबत.

महोदय ,

मी वरील विषयावर अर्ज सादर करितो कि मी सुशिक्षित तरुण व्यक्ती सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्ता ( गावाचे नाव लिहा )  गावाचा रहिवासी असून आपणास विनंती पूर्वक अर्ज करितो आमच्या शेतात विद्युत वितरण चे खांब उभे केले गेले आहेत. कुप. कं. नं . ११७ नामे ( शेत असलेल्या लाभार्थी चे नाव लिहा )  असे असून विद्युत खांब उभे करून आमच्या जमिनीची कायमस्वरूपी नुकसान होत आहे. वीज विद्युत मध्ये समाविष्ट तरतुदीनुसार कोणत्याही कंपनीला जमीन मालकाच्या पूर्वपरवानगीशिवाय विद्युत वाहिन्या उभारण्याचा कायदेशीर अधिकार नाही तरीही आमच्या शेतात एकूण ६ विद्युत खांब उभे करून जंगलात घेऊन गेले. असे असून माहिती अधिकार यांच्यात उत्तर दिले वन विभागाची पूर्व परवानगी देखील घेतले नाही. 

तसेच माझ्या वडिलांच्या संमती पत्र देखील घेतली नाही . ज्या वेळी आपले कर्मचारी यांनी आमच्या शेतात विद्युत खांब उभे केले तेव्हा त्या कर्मचारी यांना आम्ही वारंवार सांगून देखील एकूण ६ खांब टाकण्यात आले. आणि विद्युत वितरण खांब न टाकण्यास सांगत्यावेळी आपले सहकार्य कर्मचारी दमदाटी करत करत ते विद्युत खांब उभे केले. आमच्या जमिनीची कायमस्वरूपी नुकसान होत असल्याने आम्हास नुकसान भरपाई देण्यात यावी. हि नम्र विनंती.

टीप : माझ्या या विनंती अर्जाचा विचार करावा . माझा या अर्जाचा विचार विमाश न झाल्यास राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र, यांच्या कडे तक्रार करण्यात येईल.

असा लिहा महावितरणला  तक्रार अर्ज जेणेकरून  आपल्याला योग्य तो निवाडा मिळेल. जर का ह्या तक्रारी अर्ज ची निकाली न काढल्यास २१ दिवसात मंत्रालयाला यांच्या विरुद्या तक्रार लिहा. त्या ठिकाण आपल्याला नक्कीच काम होईल.

महावितरणकडे वीज मीटर्सचा दुष्काळ महावितरण : Mahavitaran Tkrar Arj in Marathi

  • प्रति 
    व्यवस्थापकीय संचालक , महावितरण
  • अर्जदार चे नाव पूर्ण पत्ता लिहा : (                                               )
    मो. (     
  • विषय : वीज मीटर्सचा दुष्काळ कधी संपणार ? 

महोदय , 
गेली जवळपास दहा वर्षे महावितरणकडे वीज मीटर्सचा दुष्काळ आहे. हा दुष्काळ फक्त थ्री फेज मीटर्सचाच नाही तर अगदी घरगुती सिंगल फेज मीटर्सही उपलब्ध नसतात. यावर प्रसारमाध्यमांनी आरडाओरडा केला की थोडा काळ मीटर्स उपलब्ध होतात , परत ये रे माझ्या मागल्या सुरु. नवीन कनेक्शन साठी सोडाच नादुरुस्त मीटर्स बदलण्यासाठी सुध्दा मीटर्स उपलब्ध नसतात हे दुर्दैव आहे , मग कायदा धाब्यावर बसवून महिनोन्महिने ग्राहकांना सरासरी बिलं दिली जातात हा अनुभव आहे. राज्यात महावितरण कंपनीला सर्वात जास्त महसूल मिळवून देणार्या पुणे परीमंडळातसुध्दा मीटर्सचं दुर्भिक्ष असेल तर उर्वरीत महाराष्ट्रातील ग्राहकांची काय हालत असेल? 

सोबत एका ग्राहकाचे बिल जोडत आहे , ज्याला जानेवारी २०२१ पासून मीटर रीडिंग न घेता सरासरी १०० युनिट्सचं बिल दिलं जातं आहे. सदरहू ग्राहकाने गेल्या महिन्यात माझ्याकडे ही तक्रार सांगितल्यावर मी संबंधित कार्यकारी अभियंता यांच्याकडे ही तक्रार पाठवली. त्यानंतर आपल्या लोकांनी जागेवर जाऊन परिस्थिती पाहिली आणि मीटर फाॅल्टी असून तो बदलावा लागेल असे सांगितले . परत या महिन्यात सदरहू ग्राहकाला रिडींग न घेता सरासरी बिल दिलं आहे. त्यावर चौकशी करता मीटर्सचा तुटवडा असल्याने मीटर बदलता आलेला नाही असे सांगितले गेले. 

आता इथे अनेक प्रश्न उभे राहतात . फाॅल्टी मीटर न बदलता महिनोन्महिने सरासरी वीजबिल दिल्याने महावितरणचे नुकसान झाले तर त्याला कोण जबाबदार ? नवीन कनेक्शन साठी वीज मीटर उपलब्ध नसतील तर ग्राहकांना पदरमोड करून स्वतःच्या खर्चाने मीटर्स आणावे लागतात वरून ते महावितरण कडून टेस्टींग करून घेण्यासाठी टेस्टींग फी सुध्दा भरावी लागते.

हा नाहक भुर्दंड ग्राहकांनी का सोसावा ? वीज मीटर्स खरेदी करणं हे महावितरणचं काम असूनही वर्षानुवर्षे पुरेसे मीटर्स खरेदी न करण्यामागची नक्की कारणं काय आणि याला जबाबदार कोण ? 

आपणांस विनंती आहे की आपण या विषयांत तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना करावी जेणेकरून भविष्यात परत संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही मीटर्सचा तुटवडा भासू नये. 

आपल्या सक्रीय सहकार्याच्या प्रतिक्षेत – विवेक वेलणकर ,अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

Mahavitaran Tkrar Arj in Marathi PDF

निष्कर्ष

आम्ही वरील Mahavitaran Tkrar Arj in Marathi दिलेला आहे. तो आपल्या जवळ अशी परिस्थिती आली तर आपण महावितरण कार्यालयात अर्ज करू शकता. तसेच आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

नुकसान भरपाई महावितरण तक्रार अर्ज कसा लिहावा : Mahavitaran Tkrar Arj in Marathi
नुकसान भरपाई महावितरण तक्रार अर्ज कसा लिहावा : Mahavitaran Tkrar Arj in Marathi

Leave a Comment