Mukhyamantri Drone Yojana Maharashtra : मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन उपलब्ध करुन देणे बाबत माहिती:
Mukhyamantri Drone Yojana Maharashtra : कृषि क्षेत्रात ड्रोनच्या वापरास पुरेशा संधी असून सद्यस्थितीत त्याचा विविध पिकांच्या वाढीच्या अवस्थेत कीटक नाशके, सूक्ष्म मूलद्रव्ये, विद्राव्य खते फवारणी या बाबी व्यतिरिक्त कृषि क्षेत्राशी निगडीत इतर कामांसाठी देखील वापर करता येतो.
Table of Contents
Mukhyamantri Drone Yojana Maharashtra GR
ड्रोन वापरामुळे शेतीतील कामांसाठी लागणाऱ्या मजुरांचा तुटवडा, शेतीतील कामांना लागणारा वेळ, अकार्यक्षम फवारणी, पाण्याची बचत, शारिरीक त्रास, औषध मारण्याने शेतक-यांस होणारे वेगवेगळे आजार, उंच पिकांवर फवारणी करणे व अकिफायतशीर खर्च इत्यादी समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते, याखेरीज शेतकऱ्यांकरिता रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतात. या सर्व बाबी विचारात घेऊन “मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन” या नावाने राज्यात एकूण ५००० ड्रोन उपलब्ध करुन देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना उद्देश :- Mukhyamantri Drone Yojana Maharashtra Objective
- १. शाश्वत ग्रामीण रोजगार निर्माण होईल आणि उत्पादकता सुधारेल.
- २. दरमहा सरासरी रू. १.०० लाख कमाईची क्षमता असल्याने रोजगार निर्मिती चांगली होईल.
- ३. कमी किमतीत शेतक-यांना ड्रोन फवारणी सुविधा निर्माण केली जाईल. या उपक्रमामुळे उत्पादन खर्च कमी होऊन पीक उत्पादन वाढेल.
- ४. पर्यावरण संवर्धन चांगले होईल.
- ५. अधिक कार्यक्षम शेती पध्दती विकसित होण्यास मदत होईल.
मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना स्वरूप:- Mukhyamantri Drone Yojana Maharashtra Details
महाराष्ट्र राज्यात सध्यस्थितीत डीजीसीए परवानाधारक ड्रोन “कृषि यांत्रिकीकरण उपअभियान” व “राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण” या योजनांतून कृषि पदवीधर यांना खरेदी किंमतीच्या ५० % किंवा रू. ५.०० लाख यापैकी जे कमी असेल व इतर लाभार्थ्यांना खरेदी किंमतीच्या ४०% किंवा रू. ४.०० लाख यापैकी जे कमी असेल ते अशा प्रकारे ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळते.
- > शेतीतील ड्रोनचे महत्त्व लक्षात घेता, केंद्र शासनाने “नमो ड्रोन दीदी” योजनेंतर्गत NRLM अंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना ड्रोनसाठी खरेदी किंमत्तीच्या ८०% किंवा ८,०० लाख यापैकी जे कमी असेल ते, अशाप्रकारे अनुदान देणे मंजुर केलेले आहे. त्याच धर्तीवर “मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन” या नावाने शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करुन देण्यात येतील.
- > ड्रोनचे वाटप शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, आत्मा अंतर्गत शेतकरी गट ग्रामीण युवा मदत गट इत्यादींना करण्यात येईल.
- > यात एकूण ५००० ड्रोन शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, आत्मा अंतर्गत शेतकरी गट, ग्रामीण युवा मदत गट इत्यादींना ८०% च्या मर्यादेत अनुदानावर देण्यात येतील. सदर योजनेतील लाभार्थ्यांना ड्रोन, कृषि यांत्रिकीकरण उपअभियान योजनेतील मार्गदर्शक सूचनेनुसार खरेदी करावे लागतील. तसेच, उपरोक्त गटांमध्ये/संस्थामध्ये कृषि पदवीधर असणे बंधनकारक राहील.
मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना अनुदानाचे/निधीचे स्वरुप/उपलब्धता :- Mukhyamantri Drone Yojana Maharashtra Nature/Availability of grants/funding
- > शासकीय अनुदान: खरेदी किमतीच्या ८०% किंवा रु.८.०० लक्ष यापैकी जे कमी असेल ते, अनुदान देण्यात येईल.
- > अशाप्रकारे, ५००० ड्रोन उपलब्ध करुन देण्यासाठी अधिकतम रु.४०० कोटी इतके अनुदान देय राहील.
- > लाभार्थी सहभाग: उर्वरित २०% इतकी रक्कम लाभार्थी उभी करेल.
मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना लक्षांक आवश्यक निधी
- १. प्रस्तावित घटक सन २०२५-२६ ते २०२७-२८ या ३ वर्षासाठी उपलब्ध करुन देणे प्रस्तावित असून, बाबनिहाय प्रगतीनुसार निधी खर्च करण्यात यावा.
- २. अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्यातील ७/१२ धारक असणे आवश्यक आहे.
- ३. शेतकऱ्याकडे अॅग्रीस्टॅक फार्मर नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे.
- ४. लाभार्थी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज केल्यावर, प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर लाभार्थी निवड करण्यात येईल.
- ५. निवड झालेल्या लाभार्थ्यांना DBT तत्त्वावर आधार संलग्न बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येईल.
- ६. सर्व घटकांमधील लाभार्थी निवड प्रक्रिया झाल्यानंतर कृषि समृद्धी योजने अंतर्गत निधी उपलब्धतेनुसार, प्रत्येक घटकास उपलब्ध करुन द्यावयाच्या निधीच्या प्रमाणाबाबत निर्णय शासनस्तरावर घेण्यात येईल.
Mukhyamantri Drone Yojana Maharashtra PDF
मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना ऑनलाइन
मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. आणि कृषि समृद्धी योजने अंतर्गत मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना होणारा खर्च, कृषि समृद्धी योजनेच्या मंजूर तरतूदीतून बँकेतून लोन देखील मिळेल. त्यासाठी CSC केंद्रावरून जाऊन देखील मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना साठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजनाची अंमलबजावणी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका, २०२५ चा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, कृषि समृध्दी योजनेंतर्गत अंतर्भूत वरील घटकांची अंमलबजावणी करताना आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात यावे, असे सर्व संबंधित अंमलबजावणी यंत्रणांना सूचित करण्यात येत आहे.