Rojgar Hami Yojana E-KYC : आता तुम्ही घरबसल्या रोजगार हमी योजना ई-केवायसी पूर्ण करू शकता, सविस्तर वाचा!
भारत सरकारने आता रोजगार हमी योजना ई-केवायसी ॲप सुरू केले आहे. ग्रामीण भागातील या रोजगार योजनेचे लाभार्थी पंचायतीला न जाता, फक्त काही मिनिटांत स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबातील जॉब कार्ड धारकांसाठी सर्व ई-केवायसी पूर्ण करू शकतील.
काय आहे Rojgar Hami Yojana E-KYC?
भारत सरकारने, रोजगार हमी योजना ॲपच्या सहकार्याने, लाभार्थ्यांच्या सोयीसाठी रोजगार हमी योजना ई-केवायसी ॲप सुरू केले आहे. आता, लाभार्थी पंचायतीला न जाता, घरबसल्या आरामात रोजगार हमी योजना ई-केवायसी पूर्ण करू शकतात.
प्रमुख वैशिष्ट्ये:
- १) घरबसल्या आरामात रोजगार हमी योजना ई-केवायसी सहजपणे पूर्ण करा.
- २) चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा वापर करून त्वरित पडताळणी.
- ३) जॉब कार्ड असलेला कोणताही लाभार्थी रोजगार हमी योजना ई-केवायसी पूर्ण करू शकतो. –
- ४) मोबाईल नंबरशी आधार क्रमांक जोडलेला असणे आवश्यक आहे.
- हे देखील वाचा : Kaushal Rojgar Nigam Registration
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण Rojgar Hami योजना,ऑनलाइन अर्जाची संपूर्ण माहिती.
- Mukhyamantri Yuva karya Prashikashan Rojgar Hami Yojana
Rojgar Hami Yojana E-KYC Apps
तुमचे रोजगार हमी योजना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी, हे दोन ॲप्स डाउनलोड करा:
१. खालील लिंकवरून रोजगार हमी योजना ई-केवायसी मोबाईल ॲप डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd

https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth
२. खालील लिंकवरून आधार फेस आयडी ॲप डाउनलोड करा.
३. तुमचे रोजगार हमी योजना ई-केवायसी ऑनलाइन पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा.
अत्यंत महत्त्वाच्या सूचना:
- ही सेवा केवळ महाराष्ट्रातील जॉब कार्ड धारक लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.
- रोजगार हमी योजना ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख: ३१ मार्च २०२७
- जे कोणी आपले ई-केवायसी पूर्ण करू शकत नाहीत, त्यांनी त्यांच्या जवळच्या सेतू केंद्राला किंवा सीएससी सेवा केंद्राला भेट द्यावी. त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.