✔️Children of construction workers to receive educational supplies! Government Resolution (GR) issued. बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी! बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना मिळणार 22 प्रकारच्या शैक्षणिक वस्तू. मिळणार आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांच्या इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या पहिल्या दोन पाल्यांना “मुलभूत वस्तू संच सहाय्य योजना” या योजनेस प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. शासन निर्णय आला आहे.
construction workers GR प्रस्तावना :-
1. केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशात दिनांक २१.११.२०२५ पासून २९ कामगार कायदे निरसित करुन त्याबाबत आता चार नवीन कामगार संहितांची (Labour Codes) अंमलबजावणी सुरु केली. त्यानुसार आता इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणाशी संबंधित बाबींचा समावेश “सामाजिक सुरक्षा संहिता-२०२० मध्ये करण्यात आला आहे.
२ सदर संहितेच्या कलम (७) (६) मध्ये बांधकाम कामगारांना कोणत्या बाबींकरीता विविध कल्याणकारी योजना राबविणे आवश्यक आहे, याबाबतच्या तरतूदी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. यानुसार कलम (७) (६) (d) मध्ये “frame educational schemes for the benefit of children of the beneficiaries as may be prescribed by the appropriate Government” अशी तरतूद नमूद केली आहे.
३. या तरतुदीस अनुसरुन संदर्भाधीन क्र. ३ अन्वये मंडळाने केलेला ठराव आणि त्यास अनुसरुन मंडळामार्फत शासनास प्राप्त संदर्भिय क्र. ४ येथील प्रस्तावाच्या अनुषंगाने संदर्भिय क्र.५ अन्वये मंडळांतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना “शैक्षणिक सहाय्य योजना लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. सदर शासन निर्णयातील “प्रपत्र-अ” मधील अनुक्रमांक ७ मध्ये मुलभूत वस्तू संच सहाय्य योजनेचे पात्रता निकष, वित्तीय सहाय्य व आवश्यक कागदपत्रे नमूद केली आहेत. त्यास अनुसरुन मंडळाअंतर्गत नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांच्या पाल्यांकरीता मुलभूत संच (Basic Item Kit) योजनेअंतर्गत वितरीत करावयाच्या मुलभूत संचात कोणकोणत्या उपयुक्त वस्तूंचा समावेश असावा, याबाबत मंडळामार्फत संदर्भिय क्र. ६ येथील प्राप्त पत्रास अनुसरुन संदर्भिय क्र.७ येथील पत्रान्वये सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या वस्तु निवड समिती गठीत करण्यात आली होती.
Related Post: Naisargik mrutyu बांधकाम कामगार कुटुंबाला ₹3,50,000 मदत
४. सदर वस्तु निवड समितीच्या संदर्भिय क्र. ८ येथील नमूद दोन्ही इतिवृत्तानुसार निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या ३४ वस्तू संचाचा व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २३ वस्तूंचा अभ्यास करून अंतिम २२ वस्तूंचा संच निश्चित करुन त्यास मंडळाने संदर्भिय क्र.९ येथील ठराव क्र.६६ (७)/२०२६ अन्वये मान्यता देऊन सदरहू प्रस्ताव मंडळाने शासन मान्यतेस्तव संदर्भिय क्र.१० येथील पत्रान्वये सादर केला.
“मुलभूत वस्तू संच सहाय्य योजना” (construction workers GR)
त्यानुषंगाने, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित जिवीत (सक्रिय) बांधकाम कामगारांच्या पाल्यांकरीता लागू केलेल्या सुधारित “शैक्षणिक सहाय्य योजना अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना “मुलभूत वस्तू संच सहाय्य योजना” या योजनेस प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय (construction workers GR) :-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांच्या इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या पहिल्या दोन पाल्यांना “मुलभूत वस्तू संच सहाय्य योजना” या योजनेस प्रशासकीय व वित्तीय मान्यता या शासन निर्णयान्वये देण्यात येत आहे.

🟢(construction workers GR) ✅ Children of construction workers to receive educational supplies! Government Resolution (GR) issued सविस्तर माहिती पहा!👇
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202610301709491354.pdf
construction workers GR Date
याकरीता गठीत वस्तु निवड समितीचा अहवाल व त्यावर मंडळाने दिनांक ११.०८.२०२६ रोजी बैठकीत केलेल्या ठरावामधील शिफारशीनुसार “मुलभूत वस्तू संच सहाय्य योजना” या योजनेअंतर्गत मंडळामार्फत वितरीत करावयाच्या मुलभूत वस्तु संचामध्ये खालील २२ वस्तूंचा समावेश करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे:-
दिलेल्या मुलभूत वस्तू संच सहाय्य योजना तक्ता खालीलप्रमाणे आहे:
मुलभूत संचातील वस्तूंची यादी
| अ.क्र. | वस्तू / तपशील | नग / संख्या |
| १ | पाण्याची बाटली | ०१ |
| २ | थंड/गरम पाण्याचे थर्मास | ०१ |
| ३ | टिफीन बॉक्स | ०१ |
| ४ | छत्री | ०१ |
| ५ | रेनकोट | ०१ |
| ६ | परीक्षासाठीचे पंड | ०१ |
| ७ | लॉग बुक | १८ |
| ८ | ड्रॉईंग बुक | ०८ |
| ९ | बॉल पेन बॉक्स | ०१ |
| १० | पेन्सील बॉक्स | ०२ |
| ११ | भूमितीचा कंपास | ०१ |
| १२ | ऑईल पेस्टल्स | ०२ |
| १३ | पोस्टर कलर | ०१ |
| १४ | ब्रश संच | ०१ |
| १५ | प्लॅस्टीक पट्टी | ०२ |
| १६ | सोलर लॅम्प | ०१ |
| १७ | कॅलक्युलेटर | ०१ |
| १८ | फोल्डींग अभ्यास टेबल | ०१ |
| १९ | व्हाईट बोर्ड (२ मार्कर सहीत) | ०१ |
| २० | गजराचे घडयाळ | ०१ |
| २१ | शाळेची बंग | ०१ |
| २२ | किट बंग | ०१ |
| एकूण नग | ४९ |
टीप: उक्त मुलभूत वस्तू संच सहाय्य योजनेसाठी येणारा खर्च मंडळाकडील जमा उपकर निधीमधून भागविण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. construction workers GR
