औपचारिक पत्रलेखन : Formal Letter Writing in Marathi

औपचारिक पत्रलेखन : Formal Letter Writing in Marathi

Home

Formal Letter Writing in Marathi: नमस्कार वाचक मित्रांनो आज मी तुम्हाला औपचारिक पत्रलेखन बद्दल सविस्तर माहिती देत आहे. प्रत्येक शिक्षण घेणारा विध्यार्थी ग्रंथालयामधून पुस्तकांच्या विविध मागणी करतात. अशातच त्यांना औपचारिक पत्र लिहावे लागते. मग औपचारिक पत्रलेखन कसा लिहावा? आणि त्यात मुद्दे सूद माहिती काय काय लिहावे जाणून घ्या.

औपचारिक पत्रलेखन म्हणजे काय?

जेव्हा आपण शाळेच्या मुख्याध्यापकांकडे एखाद्या विशिष्ट गोष्टीची मागणी करतो किंवा शाळेतील इतर कामासाठी विनंती पत्र पाठवतो, तेव्हा त्याला औपचारिक पत्र म्हणतात. औपचारिक पत्रलेखन हे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अधिकृत कामासाठी वापरले जाणारे एक लिखित संवाद माध्यम आहे.

Related Post: औपचारिक पत्रलेखन कसा लिहावा? Link

औपचारिक पत्रलेखन. Formal Letter Writing in Marathi

औपचारिक पत्रलेखन खालीलप्रमाणे आहे.

  • दिनांक – २४ ऑक्टोबर २०२६
  • प्रति,
  • माननीय व्यवस्थापक,
  • ज्ञानसागर पुस्तकालय,
  • १०४, प्रगतीनगर
  • नाशिक – ४२७०३२
  • ई-मेल – dnyansagar४@gmail.com
  • विषय – शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांच्या मागणीबाबत

मा. महोदय

मी ज्ञानदा विद्यालयातील विदयार्थी कु. भाग्येश शिंदे, विद्यार्थी प्रतिनिधी असून मुख्याध्यापकांच्या संमतीने पत्र लिहीत आहे. आम्हाला आमच्या शाळेतील वाचनालयासाठी काही पुस्तकांची आवश्यकता होती. त्याच दरमान्य आम्हाला आपल्या ‘ज्ञानसागर पुस्तकालयाची वर्धापनाची जाहिरात वर्तमानपत्रात वाचनात आलीः आमच्या शाळेतील विद्याथ्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचा बौध्दिक व व्यक्तिमत्त्व विकास व्हावा तसेच अभ्यासपूरक अवांतर वाचनाला प्रोत्साहन मिळावे या उद्‌देशाने ग्रंथालयाकरिता नवीन पुस्तकांची तातडीने गरज आहे. आपण जाहीर केलेल्या सवलतीचा फायदा घेऊन शाळेसाठी दर्जेदार पुस्तकांचा संग्रह उपलब्ध करून देण्याचा आम्ध विदयार्थ्यांचा एक छोटासा प्रयत्न आहे. तरी खालील तक्त्यामध्ये दिलेल्या यादीतील सर्व पुस्तके आम्हास हवी आहेत.

हव्या असलेल्या पुस्तकांची यादी

अ.क्र.पुस्तकाचे नाव व लेखकप्रत
1.श्यामची आई – साने गुरुजी5
2.छावा – शिवाजी सावंत3
3.ययाति – वि.स. खांडेकर2
4.अग्निपंख – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम4
5.मराठी शब्दकोश – डॉ. व्ही. एन. पंडित1

ही सर्व पुस्तके आपण शाळेच्या पत्त्यावर पोहोचवावीत ही नम्र विनंती. पुस्तकांसह एकूण रकमेचे बिल पाठवून दयावे जेणेकरुन धनादेशाव्दारे त्वरीत ती रक्कम आपणास देता येईल.

कळावे,

  • आपला विश्वासू
  • भाग्येश शिंदे
  • विद्यार्थी प्रतिनिधी,
  • ज्ञानदा विद्यालय
  • रामनगर
  • नाशिक – ४२७०३६
  • इ-मेल dnyanadavidhylay22@gmail.com.

Related Post: PMAYG Awas Plus 2024 Hamipatra, घरकुल हमीपत्र बंधनकारक.

Formal Letter Writing in Marathi : औपचारिक पत्रलेखन कसा लिहावा?

औपचारिक पत्रलेखन लिहिताना प्रथम दिनांक लिहा नंतर प्रति, माननीय व्यवस्थापक, पुस्तकालय धारकाचे नाव , पत्ता, ई-मेल – विषय – पुस्तकांच्या मागणीबाबत चा असे लिहावे. परंतु तुम्हाला कोणकोणते पुस्तक पाहिजे आहे, ते नौद करणे गरजेचे आहे.

Formal Letter Writing in Marathi : औपचारिक पत्रलेखन कसा लिहावा?
Formal Letter Writing in Marathi : औपचारिक पत्रलेखन कसा लिहावा?
Formal Letter Writing in Marathi Photo : औपचारिक पत्रलेखन कसा लिहावा?
Formal Letter Writing in Marathi Photo : औपचारिक पत्रलेखन कसा लिहावा?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत