सेवा सेतू कॅम्प, ‘सोलार’ साठी करा अर्ज, लगेच बँकेचेही मिळणार कर्ज १७ ऑक्टोबरपर्यंत शिबिर : PM Solar Ghar Yojana व ‘स्मार्ट’ योजनेची एकाच ठिकाणी अद्यावत माहिती
ग्रामीण बातम्या : घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारून शासकीय योजनेचा लाभघेणे आता आणखी सोपे होणार आहे. महावितरणकडून तालुका पातळीवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, राज्यात १७ ऑक्टोबरपर्यंत ‘सेवा सेतू कॅम्प’ आयोजित केले जात आहेत. या कॅम्पमध्ये ‘PM Solar Ghar Yojana मोफत वीज योजना’ तसेच ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट)’ योजनेची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे.
सौरऊर्जा प्रकल्पासाठी इच्छुक प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात नागरिकांना योजनांची माहिती, अर्ज येणार आहे. PM Solar Ghar Yojana Online अर्ज कसा करायचा, याचे प्रात्यक्षिकही कॅम्पमध्ये करून दाखविले जाणार आहे. त्यामुळे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची इच्छा असलेल्या नागरिकांना अर्ज प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी थेट मदत मिळणार आहें. सदर योजनेची अंमलबजावणी प्रशासनाच्या वतीने केली जात आहे.
PM Solar Ghar Yojana Shibir
या योजनेतून नागरिकांची वीजबिलातून सुटका होणार आहे. या शिबिरांमध्ये ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ आणि ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट)’ योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. विशेष म्हणजे, अर्ज करण्यापासून ते बँक कजार्ची माहिती व सुविधा मिळविण्यापर्यंतची प्रक्रिया – नागरिकांना या शिबिरात समजावून सांगितली जाणार आहे.
शिरपूर तालुक्यात ४ हजार ५७६ घरांत सौरऊर्जेचा उजेड
शिरपूर तालुक्यात आतापर्यंत ४ हजार ५७६ घरांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आल्याने या माध्यमातून घरगुती वीज वापराला पर्यायी स्रोत उपलब्ध झाला आहे. उर्वरित पात्र नागरिकांनीही सौरऊर्जेचा लाभघ्यावा, यासाठी ‘सेवा सेतू कॅम्पच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. लाभासाठी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन आहे.
PM Solar Ghar Yojana Online Website Click Here
नागरिकांनो, कसा घ्याल योजनांचा लाभ ?
इच्छुक नागरिकांनी सेवा सेतू कॅम्पमध्ये जाऊन योजनेची माहिती घ्यावी. आवश्यक कागदपत्रे व पात्रतेची माहिती घेऊन आनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. कॅम्पमध्ये महावितरणचे अधिकारी व संबंधित प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत.
सर्व तालुका पातळीवर विशेष ‘किओस्क’
प्रत्येक तालुका पातळीवर विशेष किओस्कच्या माध्यमातून नागरिकांना सौरऊर्जा योजनांची माहिती व अर्ज प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. शहरासह ग्रामीण भागातही सौरऊर्जा योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न महावितरणच्यावतीने केला जात आहे.
PM Solar Ghar Yojana, मोफत वीज योजना
घराच्या छतावर रूफटॉप सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधांची माहिती. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय २ रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजना: राज्यातील घरगुती ग्राहकांना छतावरील सौरऊर्जा प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती.
या सौरऊर्जा योजनांची माहिती मिळणार
‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ आणि ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट)’ या दोन्ही योजनांची माहिती नागरिकांना कॅम्पमध्ये उपलब्ध होणार आहे.
जिल्हाभरात ‘सेवा सेतू कॅम्प’
महावितरणकडून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ‘PM Solar Ghar Yojana सेवा सेतू कॅम्प’चे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सौरऊर्जा प्रकल्पासाठी आर्थिक अडचण भासू नये यासाठी कॅम्पमध्ये बँक प्रतिनिधींचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पात्र नागरिकांना कर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळणार असल्याने अर्जासोबतच वित्तीय पयार्याची माहितीही मिळणार आहे.
ऑनलाइन अर्जाचे प्रात्यक्षिक दाखवणार
सौरऊर्जा PM Solar Ghar Yojana, https://pmsuryaghar.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वरून योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा करायचा, आवश्यक माहिती कशी भरायची आणि अर्जाची पुढील प्रक्रिया काय आहे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक नागरिकांना दाखविले जाणार आहे. कोणाला काही अडचणी असल्यास त्याचे निरसनही महावितरणचे अधिकारी करणार आहे.
| Instragram वर माहिती साठी. | Link वर क्लिक करा. |
| Facebook वर माहिती साठी. | Link वर क्लिक करा. |
| Telegram वर माहिती साठी | Link वर क्लिक करा. |
| Personal Information about Instragram | pawara_shailesh |