soil testing facility in the village itself : माती परीक्षणाची सोय गावातच; मिळणार ‘माती आरोग्य पत्रिका’ जिल्ह्यात ग्रामस्तरीय मृदा नमुना प्रयोगशाळा सुरू होणार; अनुदान आणि अर्जाची प्रक्रिया सुरू
Now get complete information about soil testing facility in the village itself : शेतकऱ्यांना शेतीसाठी माती परीक्षणाची सुविधा गावातच मिळावी यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यात ग्रामस्तरीय मृदा नमुना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे आता शेतकऱ्यांना माती तपासणीसाठी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. गावातच अत्याधुनिक पद्धतीने मातीचे परीक्षण होणार असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. ही योजना शेतकऱ्यांना अधिक वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. यामुळे रासायनिक खतांचा अतिवापर टाळून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवता येईल, असा शासनाचा उद्देश आहे.
माती परीक्षणातून जमिनीतील पोषक घटक जसे की, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सेंद्रिय कार्बन आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण तपासले जाते. या अहवालाच्या आधारावर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी कोणत्या प्रकारची खते आणि किती प्रमाणात वापरावीत याचे शास्त्रीय मार्गदर्शन मिळेल.
यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन पिकांची गुणवत्ता वाढेल. यावर्षी सर्व ग्रामस्तरीय प्रयोगशाळांमार्फत तब्बल दीड लाख माती नमुने तपासण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतासाठी ‘माती आरोग्य पत्रिका’ दिली जाणार असून, यात मातीतील पोषणतत्त्वांचे तपशील आणि खतांच्या शिफारशींचा समावेश असेल. यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे व खतांचे नियोजन करता येणार आहे.
Table of Contents
योजनेत असे असेल माती परीक्षण अहवालाचे स्वरूप : Now get complete information about soil testing facility in the village itself.
माती आरोग्य पत्रिका ही केवळ एक कागदी अहवाल नाही, तर ती शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा मार्गदर्शक दस्तऐवज आहे. यामध्ये माती नमुना क्रमांक आणि शेतकऱ्याची माहिती, शेतकऱ्याचे नाव, पत्ता आणि सर्व्हे क्रमांक, जमिनीतील पोषक घटकांचे प्रमाण नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमचे प्रमाण दर्शवले जाते. सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थिती लोह, जस्त, मैगनीज, बोरॉन, तांबे यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता तपासली जाते.
पीएच आणि सेंद्रिय कार्बनचे प्रमाण, जमिनीची आम्लता आणि सेंद्रिय पदार्थांची स्थिती दर्शवते. शेतकऱ्यांनी निवडलेल्या पिकासाठी कोणत्या प्रकारची खते आणि किती प्रमाणात वापरावीत, याची सविस्तर माहिती दिली जाते. यामुळे अनावश्यक खतांचा वापर टाळता येतो. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर कसा करावा, याची माहिती दिली जाते.
उत्पन्न वाढीस होईल मदत
या योजनेमुळे शेतीचे आरोग्य कळण्यास मदत होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य ते पीक व खत नियोजन करून उत्पन्न वाढीसाठी मदत होईल.
या योजनेसाठी कोण करू शकतो अर्ज ?
नोंदणीकृत शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी सहकारी संस्था आणि प्राथमिक कृषी पतसंस्था, ग्रामपंचायती आणि कृषी सेवा देणान्या संस्था, कृषी पदवीधर अर्ज करू शकतात.
योजनेचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम
या योजनेमुळे कवळ शेती उत्पादन वाढणार नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेतही सकारात्मक बदल घडतील. ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना आणि महिला बचतगटांना प्रयोगशाळा सुरू करून रोजगार मिळवण्याची संधी मिळेल. गावाच्या पातळीवरच आधुनिक कृषी सेवा उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांचा शहरांमधील प्रवास आणि खर्च वाचेल. तसेच, रासायनिक खतांवरचे अवलंबित्व कमी होऊन सेंद्रिय शेतीला चालना मिळेल, ज्यामुळे दीर्घकाळ जमिनीचे आरोग्य आणि पर्यावरणाचे संतुलन टिकून राहील.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात १५ मृद परीक्षण प्रयोगशाळांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करून स्वतःची प्रयोगशाळा तयार करावी. सुरज जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
अर्जासाठी आवश्यक निकष आणि मुदत
अर्जदाराकडे प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच, प्रयोगशाळा चालवणाऱ्या व्यक्तीला आवश्यक शैक्षणिक पात्रता किंवा तांत्रिक पार्श्वभूमी असणे गरजेचे आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्यांना माती नमुने गोळा करण्यापासून ते अहवाल तयार करण्यापर्यंतचे प्रशिक्षण दिले जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर, २०२५ निश्चित केली आहे. त्यामुळे पात्र अर्जदारांनी वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे आहे.

योजनेच्या लाभासाठी अनुदान आणि पात्रता
ग्रामस्तरावर माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी सरकारकडून दौड लाख रुपये अनुदान दिले जात आहे. या अनुदानाचा उपयोग प्रयोगशाळेसाठी आवश्यक उपकरणे, रसायने आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी केला जाईल. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र अर्जदारांकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागवण्यात आले आहेत.
निकष
वरील माती परीक्षणाची सोय गावातच असेल हि माहिती वाचलीच असेल, तरीही आपण आपल्या जवळील कृषी कार्यालय येथे भेट देऊन या माती परीक्षणाची माहिती समजून घ्या. अधिक माहिती साठी आपण MahaDBT वरील शासकीय माहिती सोबत PDF दिलेल्या माहिती देखील वाचा. (How to do soil testing, Soil testing center, Soil testing report, Benefits of soil testing, Soil testing lab, Soil testing center Pune, Soil testing cost, Soil testing report)









1 thought on “आता माती परीक्षणाची सोय गावातच जाणून घ्या संपूर्ण माहिती. Now get complete information about soil testing facility in the village itself.”