नमस्कार मित्रांनो ‘Viksit Bharat G RAM G Yojana’ योजने अंतर्गत आता गावातच मिळेल हाताला काम; नोंदणी केली का? नसेल केली तर आजच आपल्या ग्रामपंचायत च्या रोजगार सेवक यांच्याशी संपर्क करा. आणि रोजगार उपलब्ध करून संधी घ्या.
SHAILESH PAWARA ग्रामीण बातम्या : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना होती परंतु आताची विकसित भारत – जी राम जी योजना असून, या योजनेंतर्गत काम मागणाऱ्या लाभाध्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो, यामध्ये १२५ दिवसांपर्यंत रोजगाराची हमी केंद्र सरकारची आहे व त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देते.
घरकुल, रस्ते, गोठा, फळबागा यांच्यासह विविध कामांच्या पूर्ततेसाठीविकसित भारत – जी राम जी योजनेच्या माध्यमातून कामकाज फेले जाते. यासाठी गाय पातळीवर जॉब कार्डधारक मजुरांना प्राधान्याने बोलविले जाते, परंतु राज्यातील सर्व तालुक्यात झालेले शहरीकरण, तसेच रोजगाराच्या उपलब्ध संधी, यामुळे जॉब कार्ड काढण्याकडे व जॉब कार्डधारक असलेले मजूर या कामांकडे पाठ फिरवितानाचे चित्र सध्या दिसत आहे.
Table of Contents
काय आहे विकसित भारत – जी राम जी योजना? What is Viksit Bharat – G Ram G Yojana?
सध्या शेतातील कामे आटोपली आहेत. त्यामुळे मजुरांना काम मिळावे, यासाठी विकसित भारत – जी राम जी योजना विभागाकडून ठिकठिकाणी कामे सुरू करण्यात आली आहेत. तालुक्यात ज्या ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू नाहीत, तेथील मजुरांना कामाचा शोध घ्यावा लागत आहे. अशा मजुरांना Viksit Bharat G RAM G Yojana अंतर्गत गावातच काम उपलब्ध केले जाते. यासाठी मजुरांना कामाच्या मागणीचा अर्ज करणे आवश्यक ठरते.
कामासाठी नोंदणी कोठे, कशी कराल?
विकसित भारत – जी राम जी योजना जॉब कार्डधारक मजुराने कामासाठी नोंदणी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक किवा ग्रामरोजगार सेवक यांच्याकडे करावी, यासाठी विकसित भारत – जी राम जी योजना जाँब कार्डची माहिती व काम मागणीचा अर्ज नमुना ४ भरून द्यायचा असून, काम मागणी केल्यानंतर १५ दिवसांत काम दिले जाते,
काम न दिल्यास मिळतो बेरोजगार भत्ता.
जर १५ दिवसांत विकसित भारत – जी राम जी योजनेत काम दिले गेले नाही, तर बेरोजगार भत्ता देण्यात येते, तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींत कामे असतात. तालुक्यातील ग्रामपंचायतींपैकी अनेक ग्रामपंचायतीमध्ये विकसित भारत – जी राम जी योजनेंतर्गत कामे सुरू असून, अनेक ग्रामपंचायतीमध्ये एकही काम सुरू नाही, या कामांमध्ये शोषखड्डे, विहीर, तसेच फळबाग योजनेचा समावेश आहे. गावपातळीवरील जाँच कार्डधारक मजुरांना बोलविले जाते.
मागेल त्याला मिळेल काम
विकसित भारत – जी राम जी योजनेचे ‘मागेल त्याला काम सोबतच गुणवत्तापूर्ण टिकाऊ उत्पादक मत्ता निर्माण करणे, गरिबाच्या उपजीविकेचे साधनांचा आधार मजबूत करणे हा महत्वाचा उद्देश आहे. यामध्ये उपलब्ध असलेल्या वैयक्तिक योजना उदा. विहीर, विहीर पुनर्भरण, गाय गोता, रेशीम शेती, बांबू लागवड, फळबाग, कुक्कुटपालन या योजनांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनीनी घ्यावा.
ग्रामपंचायतीकडे करा विकसित भारत – जी राम जी योजनेत अर्ज
विकसित भारत – जी राम जी योजनेंतर्गत मजुरांनी कामाची मागणी करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागतो, संबंधित यंत्रणेला पुढील पंधरा दिवसांत काम उपलब्ध करून देणे बंधनकारक असते. या कालावधीत मजुरांना काम न मिळाल्यास त्यांना नियमानुसार विकसित भारत – जी राम जी योजनेत रोजगार भत्ता अदा केला जातो. दरम्यान, विकसित भारत – जी राम जी योजनेंतर्गत कामाची संख्या वाढल्याने मजुरांना गावातच काम मिळेल. विकसित भारत – जी राम जी योजनेंतर्गत मजुरांना गावातच काम मिळावे, त्यांचे स्थलांतर थांबावे, सोबतच विविध विकासात्मक कामे मार्गी लागावी, या हेतूने योजना राबविली जाते.
ग्रामपंचायतीकडे करा अर्ज, १२५ दिवस कामाची हमी.
मजुरांना विकसित भारत – जी राम जी उपलब्ध करून देण्यासाठी गावातील अकुशल काम करण्यास इच्छुक व्यक्तींनी ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक/ ग्राम-रोजगार सेवक यांच्याकडून काम मागणी अर्जाचा नमुना घेऊन वैयक्तिक किंवा सामूहिक अर्ज करावा, नमुना क्र. ४ मध्ये जॉबकार्ड क्रमांक कामाचा कालावधी नमूद करून स्वाक्षरी करावी, सोबत आधार कार्ड व आधार क्रमांक लिंक करण्यात आलेल्या पासबुकची छायांकित प्रत अर्जासोबत द्यावी. त्यातून संबंधितास १२५ दिवस काम उपलब्ध होईल.
FAQ
Viksit Bharat G RAM G Yojana kab shuru hui
ग्रामीण विकास के लिए मनरेगा की जगह G ram g yojana 2025 लाई गई एक नई योजना है।
Viksit Bharat G RAM G Yojana in Hindi
विकसित भारत-जी राम जी (VB-G RAM G) योजना अब 125 दिनों का सुनिश्चित रोजगार प्रदान करती है। इसका लक्ष्य ग्रामीण क्षेत्र को सशक्त बनाना और समावेशी विकास सुनिश्चित करना है।
Viksit Bharat G RAM G Yojana Registration
G Ram G Yojana Registration जवळच्या ग्रामपंचायत मध्ये होणार.
Viksit Bharat G RAM G Yojana Full Form
Viksit Bharat G RAM G Yojana Full Form ( Viksit Bharat‑Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin) Act, 2025) Any Link
निष्कर्ष
विकसित भारत – जी राम जी योजनेत, मागेल त्याला कामच्या माध्यमातून दिले जाते. Viksit Bharat G RAM G Yojana मध्ये काम हवे असल्यास ग्रामपंचायतकडे मजुरांनी कामाची मागणी करावी. अशाच माहिती साठी आजच इतरांना शेअर करा.