जळगाव, दि. 28 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पावन येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता CHB (घड्याळी तासिका तत्त्व) तसेच PPP (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) अंतर्गत विविध व्यवसायांच्या शिल्प निदेशक (Craft Instructor) पदांवर मानधन तत्त्वावर पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
Audyogik Prashikshan Sanstha : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
या पदांमध्ये फिटर (CHB) – १ पद, इलेक्ट्रिशियन (PPP) – २ पदे, मेकॅनिक मोटार व्हेईकल (PPP) – १ पद, वायरमन (PPP) – १ पद, एम्प्लॉयबिलिटी स्किल इन्स्ट्रक्टर – १ पद आणि मॅथ्स/ड्रॉईंग इन्स्ट्रक्टर – १ पद यांचा समावेश आहे.
Audyogik Prashikshan Sanstha मध्ये विविध पदासाठी भरती
संबंधित पदांसाठी BE/B.Tech/Diploma, संबंधित शाखेतील ITI (NCVT), अध्यापनाचा अनुभव, तसेच एम्प्लॉयबिलिटी स्किल इन्स्ट्रक्टर पदासाठी MBA/BBA/Diploma/कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी व मूलभूत संगणक ज्ञान प्रमाणपत्र, तर मॅथ्स/ड्रॉईंग इन्स्ट्रक्टर पदासाठी अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका व अध्यापनाचा अनुभव आवश्यक आहे.
पात्र उमेदवारांनी आवश्यक साक्षांकित प्रमाणपत्रांच्या प्रतींसह प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यावल यांच्या नावे अर्ज दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Police complaint Format in Marathi, तक्रार अर्ज पोलीस स्टेशन