Dhule Collector: दुष्काळाच्या छायेत शेतकरी एकटा पडू नये; प्रत्येक यंत्रणेने संवेदनशीलतेने काम करावे.

Dhule Collector: दुष्काळाच्या छायेत शेतकरी एकटा पडू नये; प्रत्येक यंत्रणेने संवेदनशीलतेने काम करावे.

Breaking News

सेवा संकल्प अभियानातून गावपातळीवर समुपदेशन सत्रे आयोजित करण्याचे जिल्हाधिकारी (Dhule Collector) भाग्यश्री विसपुते यांचे निर्देश. शेतकरी आत्महत्या निर्मूलन सहाय्यता समितीत 7 प्रकरणांना मंजुरी

Dhule Collector Office , दि. 7 ऑक्टोबर 2026 : पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणींबरोबरच मानसिक तणावाचाही सामना करीत आहे. अशा काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ प्रशासकीय प्रकरण म्हणून न पाहता त्यांना वेळेत मदत, आधार आणि योग्य मार्गदर्शन मिळेल यासाठी प्रत्येक यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले.

Dhule Collector समितीची बैठक

जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी आत्महत्या निर्मूलन सहाय्यता समितीची बैठक झाली. बैठकीत समितीसमोरील आवश्यक बाबींची छाननी करून 7 प्रकरणे पात्र ठरवत मंजूर करण्यात आली.

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर, कुटुंबाच्या आर्थिक नियोजनावर आणि मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे श्रीमती विसपुते यांनी सांगितले. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतीचीच नव्हे, तर संवाद आणि मानसिक आधाराचीही गरज असते. त्यामुळे सेवा संकल्प अभियानांतर्गत गावपातळीवर शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन करावे, आरोग्य, कृषी आणि संबंधित यंत्रणांनी अशा कुटुंबांपर्यंत सक्रियपणे पोहोचावे आणि गरजेनुसार मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

Related Post: #DhuleNews

शेतकरी कुटुंब संकटात सापडल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी उपलब्ध शासकीय योजना, आर्थिक सहाय्य, आरोग्य सेवा आणि इतर आवश्यक सुविधांची माहिती त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचविण्यावर भर द्यावा. पात्र प्रकरणांमध्ये आवश्यक प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करून संबंधित कुटुंबाला दिलासा देण्याची भूमिका प्रत्येक विभागाने घ्यावी, असेही Dhule Collector श्रीमती विसपुते यांनी स्पष्ट केले.

Dhule Collector Office
Dhule Collector

Related Post: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत (PMAY) ऑनलाइन नोंदणी कशी करावी?,

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, पशुसंवर्धन विभागाचे गिरीश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मधुर ढोले, धुळेचे उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर, शिरपूरचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Dhule Collector Office Contact

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत