31 ऑक्टोबरपर्यंत Phadpik Vima Yojana चा शेतकऱ्यांनी लाभ घ्या.

31 ऑक्टोबरपर्यंत Phadpik Vima Yojana चा शेतकऱ्यांनी लाभ घ्या.

Scheme

Phadpik Vima Yojana : दि. 07 : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2026-27 अंतर्गत संत्रा, मोसंबी, आंबा, केळी व पपई या फळपिकांसाठी विविध हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिसूचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

Phadpik Vima Yojana

ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिकांची लागवड करणारे तसेच कुळाने किंवा भाडेतत्त्वावर शेती करणारे शेतकरी योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे.

Phadpik Vima Yojana, विमा संरक्षण लागू

या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रति शेतकरी किमान 20 गुंठे (0.20 हेक्टर) उत्पादनक्षम क्षेत्राची मर्यादा आहे. सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून कमाल 4 हेक्टर क्षेत्रापर्यंत विमा संरक्षण घेता येईल. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण लागू राहणार आहे. निर्धारित वयापेक्षा कमी वयाच्या फळबागांची विमा संरक्षणासाठी नोंद झाल्याचे पडताळणीत आढळल्यास विमा संरक्षण संपुष्टात येऊ शकते.

फळपिकनिहाय विमा संरक्षण व शेतकरी हप्ता

  • मोसंबीसाठी नियमित हवामान धोक्यांत प्रति हेक्टर 1 लाख रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांचा विमा हप्ता 5 हजार रुपये आहे. गारपिटीसाठी 33 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून हप्ता 1 हजार 650 रुपये आहे.
  • केळी व आंब्यासाठी नियमित हवामान धोक्यांत प्रति हेक्टर 1 लाख 70 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकरी हप्ता 8 हजार 500 रुपये आहे. गारपिटीसाठी 57 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून हप्ता 2 हजार 850 रुपये आहे.
  • पपईसाठी नियमित हवामान धोक्यांत प्रति हेक्टर 40 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकरी हप्ता 2 हजार रुपये आहे. गारपिटीसाठी 13 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून हप्ता 650 रुपये आहे.
  • संत्र्यासाठी नियमित हवामान धोक्यांत प्रति हेक्टर 1 लाख रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकरी हप्ता 5 हजार रुपये आहे. गारपिटीसाठी 33 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून हप्ता 1 हजार 650 रुपये आहे.

Phadpik Vima Yojana, प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत

नांदेड जिल्ह्यात अधिसूचित करण्यात आलेल्या फळपिकांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026 आहे. मोसंबी, केळी, आंबा, पपई आणि संत्रा या फळपिकांसाठी अधिसूचित तालुके व महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत सहभाग नोंदवावा.

Phadpik Vima Yojana Contact

नांदेड जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सजेंज टॉवर्स, विसावा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट मुंबई-400023 टोल फ्री क्रमांक 18004195004, दूरध्वनी क्रमांक 022-61710912, ई-मेल : pikvima@aicofindia.com ही विमा कंपनी काम करीत आहे. 

Related Post: Ayushman Bharat Yojana e-KYC campaign should be accelerated

Related Post: Bandhkam Kamgar Nivruttivetan Yojana

योजनेत सहभागासाठी आवश्यक कागदपत्रे

योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक नोंदणी, आधारकार्ड, बँक खाते तपशील, सातबारा उतारा, जिओ-टॅग फोटो तसेच ई-पीक पाहणी/डीसीएस नोंद असणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी/डीसीएस 100 टक्के असणे बंधनकारक आहे. ही पूर्तता न झाल्यास विमा प्रस्ताव रद्द होऊ शकतो.

कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबतचे घोषणापत्र विमा योजनेच्या अंतिम मुदतीच्या किमान सात दिवस आधी संबंधित बँकेला सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित शेतकरी योजनेत सहभागी असल्याचे गृहित धरून विहित पद्धतीने विमा हप्ता कर्ज खात्यातून वजा केला जाऊ शकतो.

शेतकऱ्यांनी आपल्या फळपिकासाठी लागू असलेले हवामान धोके, विमा संरक्षित रक्कम, संरक्षण कालावधी आणि विमा हप्ता यांची माहिती घेऊन जवळच्या ई-सेवा केंद्र, बँक किंवा वित्तीय संस्थेशी संपर्क साधून विहित मुदतीत योजनेत सहभाग नोंदवावा.

Phadpik Vima Yojana GR. शासन निर्णय

आंबिया बहार सन 2026-27 संदर्भातील सविस्तर माहिती दि. 27 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयात उपलब्ध आहे. ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in तसेच कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

Related Post: Gramin Gharkul List To Your Mobile / घरबसल्या मोबाईलवर ग्रामीण घरकुल यादी पहा.

Related Post: Gharkul Yadit Nav Nahi? PMAY-G अंतर्गत अर्ज कसा करावा? ते सोप्या भाषेत समजून घ्या

Related Post: PM Awas Gramin Gharkul Yojana Arj (कसा करावा?)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत