E pik nondanisathi sahayakanna sahkarya kara

E pik Nondani: पीक नोंदणीसाठी सहायकांना सहकार्य करा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले.

Breaking News

(E pik nondanisathi sahayakanna sahkarya kara) ई-पीक पाहणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची नाळेश्वर व लिंबगाव मंडळातील शिवारात भेट, पीक नोंदणीसाठी सहायकांना सहकार्य करा- असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

E pik Nondani: पीक नोंदणीसाठी सहायकांना सहकार्य करा

नांदेड, दि. १२ ऑगस्ट : ई-पीक पाहणी (DCS) हा शासनाचा महत्त्वपूर्ण व प्राधान्यक्रमाचा प्रकल्प असून त्याची १०० टक्के प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा त्रास कमी करून सातबारावरील पिकांची ऑनलाइन नोंद अचूकपणे होण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक नोंदणीसाठी नियुक्त सहायकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

E pik nondani: ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे माहिती

खरीप हंगाम २०२६-२७ पासून डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्यात येत आहे. ११ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर 2026 या कालावधीत ही कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. गट व सर्वे क्रमांकनिहाय प्रत्यक्ष पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून पीक नोंदणी अद्ययावत करण्यात येत आहे. या माहितीचा उपयोग विविध कृषी योजना, पीकविमा, आपत्ती मदत, कृषी सांख्यिकी तसेच ॲग्रीस्टॅकसाठी करण्यात येणार आहे.

E pik nondani डिजिटल क्रॉप सर्व्हे

E pik nondani जनजागृती

ई-पीक नोंदणीचे महत्त्व व आवश्यकतेबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज नाळेश्वर मंडळातील सोमेश्वर आणि लिंबगाव मंडळातील वरखेड शिवाराला भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करून शेतकऱ्यांना या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

E pik nondani जनजागृती

E pik nondani कुठे करावी?

जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ६३९ सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाचे कर्मचारी, CSC चालक तसेच ग्रामस्तरावर मानधन तत्त्वावर कार्यरत अन्य विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

यावेळी तहसीलदार विपीन पाटील, मंडळ अधिकारी शिवानंद स्वामी, मधुकर फुलवळे, ग्राम महसूल अधिकारी गजानन वळगे, महेश जोशी, मारोती कदम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

E pik nondani कुठे करावी?

क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना

ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या लॉगिनमधून गावांचे काम वाटप अर्थात टास्क अलोकेशन तातडीने पूर्ण करावे. टास्क अलोकेशन करताना गावाच्या नकाशानुसार प्रत्यक्ष पाहणी करून सहायकास सोयीचे होईल, याची खात्री करूनच गटांचे वाटप करावे.

हे द्खील वाचा : Kharif Crop Competition : खरीप पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सहायकांनी स्थळभेटीपूर्वी मोबाईल ॲप रेंज असलेल्या ठिकाणी रिफ्रेश अथवा अपडेट करून त्यानंतरच प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

हे देखील वाचा : Farmer ID Registration Maharashtra : पोर्टलद्वारे नोंदणी कशी करावी?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत