Gram Rojgar Sevak दरमहा ₹८,००० मानधन मिळेल; राज्य शासनाचा नवा GR पहा.

ग्राम रोजगार सहायकांना दरमहा ₹८,००० मानधन मिळेल; राज्य शासनाचा नवा GR पहा.

Tech News

राज्यात सध्या महाराष्ट्र रोजगार हमी (विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) योजना), २०२६ (VB G RAMG) या योजनेच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची पंचायतराज संस्थेमार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. Gram Rojgar Sevak यांना दरमहा ₹८,००० मानधन मिळेल; राज्य शासनाचा नवा GR जाहीर झालेला आहे.

सदर योजनेंतर्गत क्षेत्रीय पातळीवर म्हणजेच ग्रामपंचायत स्तरावर रोहयोची कामे करण्यात येतात. या कामांचे अभिलेख व नोंदवह्या ठेवण्याची जबाबदारी ही संबंधित सरपंच व ग्रामसेवकांची आहे. ग्रामपंचायतींना या कामात मदत करण्याची व प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी ही ग्राम रोजगार सहायकांची (Gram Rojgar Sevak) असून त्यानुषंगाने, स्थानिक पातळीवर रोहयोच्या कामांमध्ये मदत करण्यासाठी ग्राम रोजगार सहायकांची उपलब्धता संबंधित ग्रामसभेमार्फत करून घेण्यात आलेली आहे. 

Gram Rojgar Sevak Mandhan GR

ग्राम रोजगार सहायकांना मानधन देणे अपेक्षित आहे. यास्तव, शासनाने ग्राम रोजगार सहायकांना दरमहा रुपये ८,०००/- इतके मानधन व इतर भत्ते देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय शासन निर्णय, नियोजन (रोहयो) विभाग, क्रमांक मग्रारो-२०२४/प्र.क्र.६३/रोहयो-१०अ, दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४ अन्वये घेतलेला आहे. 

Gram Rojgar Sevak Mandhan GR

सदर शासन निर्णयानुसार, ग्रामरोजगार सहायकांना (Gram Rojgar Sevak) प्रतिमाह रु.८०००/- मानधन देतांना प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर महाराष्ट्र रोजगार हमी (विकसित भारत रोजगार व आजिविका हमी अभियान ग्रामीण योजना) (VB-G RAMG) अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये ग्रामीण भागात रोजगाराची हमी देवून कुशल-अकुशल मनुष्यदिन निर्मिती प्रमाण राखण्यासाठी ग्राम रोजगार सहायकांकडून जास्तीत जास्त मनुष्यदिन निर्मिती होण्याच्या अनुषंगाने, ग्रामरोजगार सहायकांना मानधन उपलब्धतेसाठी निर्माण करावयाच्या मनुष्यदिननिर्मिती बाबतचे सुयोग्य निकष ठरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

हे देखील वाचा:

Rojgar Hami Yojana E-KYC कशी करावी?

Unique Shalarth ID e-KYC कशी करावी?

शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र रोजगार हमी (विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) योजना), २०२६ अंतर्गंत कार्यरत ग्राम रोजगार सहायकांच्या मानधनाबाबत व सेवाशर्तींबाबत सुधारित नियम निश्चित करण्यात आले आहेत. त्याचा मुख्य सारांश खालीलप्रमाणे आहे:

Gram Rojgar Sevak प्रमुख मुद्दे व सेवाशर्ती:

 नियुक्ती आणि नियंत्रण:

   ◆ एका ग्रामपंचायतीसाठी एक पूर्णवेळ ग्राम रोजगार सहायक अनुज्ञेय राहील.

   ◆ ग्राम रोजगार सहायकांची मानधन तत्त्वावर नियुक्ती करणे किंवा काम समाधानकारक नसल्यास सेवा समाप्त करणे याचे पूर्ण अधिकार ग्रामसभेला असतील.

   ◆ एकापेक्षा जास्त ग्राम रोजगार सहायक नेमायचे असल्यास नागपूरच्या आयुक्तांची पूर्वमंजुरी अनिवार्य राहील.

   कालावधी व निवड प्रक्रिया:

   ◆ दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत १ सप्टेंबर ते ३१ जुलै या कालावधीसाठी निवड केली जाईल.

   ◆ कामगिरी, कामाची गुणवत्ता आणि नोंदींच्या अद्ययावतीकरणाच्या आधारेच मुदतवाढ दिली जाईल.

कामगिरीचे उद्दिष्ट (Gram Rojgar Sevak मनुष्यदिवस निर्मिती):

   ◆प्रत्येक ग्राम रोजगार सहायकाने एका वर्षात किमान ६,००० मनुष्यदिवस निर्मिती करणे आवश्यक आहे (पहिल्या ६ महिन्यांत किमान ३,०००).

   ◆ उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्यांची सेवा समाप्त केली जाऊ शकते.

   ◆ एका वर्षात १०,००० पेक्षा जास्त मनुष्यदिवस निर्माण केल्यास २% प्रोत्साहनपर (Incentive) रक्कम, प्रवासभत्ता आणि डेटा पॅक दिला जाईल.

मानधन व ‘पॉज कालावधी’ (Gram Rojgar Sevak Pause Period):

   ◆ नियमित मानधन ३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार दिले जाईल.

   ◆ वर्षातील २ महिने रोहयोची कामे बंद असणाऱ्या ‘पॉज कालावधी’ (Pause Period) दरम्यान कार्यालयीन कामे, E-KYC, जॉब कार्ड पडताळणी इत्यादी कामांसाठी दरमहा ₹२,५००/- मानधन अनुज्ञेय राहील.

  मजूर E-KYC आणि इतर जबाबदाऱ्या:

   ◆ नोंदणीकृत सर्व मजुरांचे E-KYC पूर्ण करणे ग्राम रोजगार सहायकाची जबाबदारी असेल, ज्यासाठी ग्रामपंचायत आवश्यक सुविधा पुरवेल.

   ◆ काम टाळल्यास किंवा तक्रार असल्यास आयुक्तांच्या मंजुरीने नियुक्ती तत्काळ रद्द केली जाईल.

टीप: Gram Rojgar Sevak हे निकष ३० जून २०२७ पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर लागू राहतील.

Gram Rojgar Sevak Mandhan GR
Gram Rojgar Sevak Mandhan GR
Instragram वर माहिती साठी.Link वर क्लिक करा.
Facebook वर माहिती साठी.Link वर क्लिक करा.
Telegram वर माहिती साठीLink वर क्लिक करा.
Personal Information about Instragrampawara_shailesh

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत