How To Register Complaint In Mahavitaran : महावितरण तक्रारी अर्ज

On: January 12, 2026 1:31 PM
Follow Us:
How To Register Complaint In Mahavitaran : महावितरण तक्रारी अर्ज

How To Register Complaint In Mahavitaran : शेतातील वीजपुरवठा अनियमित असल्यामुळे होणारा त्रास आणि त्वरित कार्यवाहीबाबत तक्रार अर्ज दिलेला आहे.

How To Register Complaint In Mahavitaran : महावितरण तक्रार अर्ज

  • प्रति,
  • माननीय कार्यकारी अभियंता अधिकारी बोराडी
  • (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL – महावितरण) यांच्या सेवेशी 
  • दिनांक : 
    • तक्रार दार : नाव: शैलेश लालसिंग पावरा
  • सामाजिक कार्यकर्ता तथा RTI कार्यकर्ता
  • पत्ता: न्यू ता. शिरपूर जिल्हा धुळे. नंदुरबार
  • मोबाईल क्रमांक: 70664878888
    • विषय: शेतातील वीजपुरवठा अनियमित असल्यामुळे होणारा त्रास आणि त्वरित कार्यवाहीबाबत.

माननीय महोदय/महोदया,

मी, उच्च शिक्षित तरुण व्यक्ती, आदिवासी सामाजिक कार्यकर्ता तथा RTI कार्यकर्ता, राहणार न्यू बोराडी, माझे शेत कढाईपाणी रस्त्या ला लागून आहे. न्यू बोराडी येथील कायमस्वरूपी रहिवासी असून, माझा वडिलांच्या नावे, विज मीटर आहे. माझा शेतीच्या परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून वीजपुरवठा अत्यंत अनियमित झाला आहे.

माझा कडे गुरे-ढोरांना, शेतात पीक पिकवण्यासाठी, लाईट नसल्याने त्यांना पाणी देता येत नाही. यामुळे मला आणि माझ्या शेतीला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या अनियमित वीजपुरवठ्यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान होत आहे आणि शेतीचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले आहे. वारंवार तक्रार करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.

इतकेच नव्हे, तर तुमच्या येथील काही कर्मचाऱ्यांना पैसे (लाच) देऊन कामे करावी लागतात, अशी गंभीर बाब निदर्शनास येत आहे. तसेच असेल तर मी देखील पैसे द्यायला तयार आहे. परंतु नियमित वीज पुरवठा द्या. 

तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की, कृपया आपण याची गांभीर्याने दखल घ्यावी.

माझी मागणी आहे की, 24 तासात माझ्या शेतातील वीजपुरवठा नियमित (Regular) करण्यात यावा. अन्यथा, महावितरणकडून नियमित लाईट न देण्याची कारणे लेखी स्वरूपात जबाबदारीसह मला देण्यात यावीत. आणि वीज वितरण कायद्यानुसार प्रति तासाचे 50 रु. प्रमाणे. मागील दोन महिन्याचे पैसे देण्यात यावे. 

तसेच, पैसे घेणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांचे आणि माझ्या गावातील कामे न करू देणाऱ्या व्यक्तीचे/व्यक्तींची नावे देखील मला देण्यात यावीत.

आपण त्वरित योग्य ती कार्यवाही कराल, अशी अपेक्षा आहे.

आपला नम्र,

  • नाव: शैलेश लालसिंग पावरा
  • सामाजिक कार्यकर्ता तथा RTI कार्यकर्ता
  • पत्ता: न्यू बोराडी ता. शिरपूर जिल्हा धुळे. Nandurbar
  • मोबाईल क्रमांक: 70664878888

Related Post : How To Register Complaint In Mahavitaranat in Marathi : तक्रार अर्ज नमुना मराठी

निष्कर्ष

आम्ही वर How To Register Complaint In Mahavitaran : तक्रार अर्ज दिलेला आहे. तो तुम्ही आपल्या आवश्कता नुसार बदलून अर्ज करू शकता. हि माहिती आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. Mahavitaran Tkrar Arj In Marathi

How To Register Complaint In Mahavitaran : महावितरण तक्रार अर्ज

FAQ

वीज विभागात तक्रार कशी दाखल करावी?

मुख्य वीज अधिकारी यांना थेट लेखी पत्र तक्रारी (पत्र किंवा ईमेल) पाठवून दाखल करता येतात.

महाराष्ट्र राज्य वीज मंडळाशी कसा संपर्क साधू शकता?

महाराष्ट्र राज्य वीज मंडळाशी मुख्यपृष्ठ – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड
१८००-२३३-३४३५ या हेल्प लाईन वर करू शकता किंवा अधिक माहिती / प्रश्नांसाठी, ग्राहक १९१२ / १९१२० / १८००-२१२-३४३५ या कोणत्याही अधिकृत टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात.

वीज विभागात Online तक्रार कशी करावी?

वीज विभागात Online तक्रार हि आपले सरकार च्या पोर्टल किंवा ईमेल वर किंवा पत्रा द्वारे करू शकता.

वीज विभागात Offline तक्रार कशी करावी?

वीज विभागात Offline तक्रार हि आपल्या जवळच्या महावितरण कार्यालायात जाऊन लेखी तक्रारी करू शकता.

महावितरणच्या नोंदणीकृत टोल फ्री नंबर कोणता आहे.

महावितरणच्या नोंदणीकृत टोल फ्री नंबर ०२२ – ५०८९७१०० असा आहे.

Leave a Comment