PM Poshan Shakti Nirman Yojana GR : महाराष्ट्रातील प्रत्येक पालक, नागरिक आणि ग्रामस्थांनी हे जाणून घ्या! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM Poshan Shakti Nirman Yojana,) योजना, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी मोठे निर्देश जारी.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजे काय?
जिल्हा परिषद नाशिकच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM Poshan Shakti Nirman Yojana) योजनेअंतर्गत शाळांमध्ये स्वच्छ, सुरक्षित, पौष्टिक व संतुलित आहार मिळावा यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
PM Poshan Shakti Nirman Yojana जबाबदाऱ्या काय आहे?
शालेय अन्न विनियम ३ मध्ये शाळा प्राधिकरणांच्या पुढील जबाबदाऱ्या विहित करण्यात आल्या आहेत. (PM Poshan Shakti Nirman Yojana )
१. शाळा प्राधिकरण स्वतः शालेय भोजनाची विक्री करीत असल्यास किंवा भोजनपुरवठा करीत असल्यास त्याची नोंदणी अथवा परवाना घेणे.
२. शाळेने कंत्राट दिलेला प्रत्येक अन्न व्यवसाय चालक विधिवत नोंदणीकृत अथवा परवाना धारक असणे आवश्यक आहे.
३. मध्यान्ह भोजन योजनेंसाठी नियुक्त केलेले सर्व अन्न व्यवसाय चालक नोंदणीकृत अथवा परवाना धारक असणे आवश्यक आहे. केंद्रिय स्वयंपाकगृह अंतर्गत नेमलेले संस्था/बचतगट यांचा परवाना नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
४. अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायांचे परवाना व नोंदणी) विनियम, २०११ मधील अनुसुची ४ अंतर्गत विहित स्वच्छता व आरोग्यविषयक आवश्यकतांचे पालन करणे तसेच अन्न सुरक्षा प्रदर्शन फलक आणि अन्न सुरक्षा पर्यवेक्षकाची व्यवस्था करणे.
५. संतृप्त चरबी, ट्रान्स फॅट अतिरीक्त साखर अथवा सोडियमचे प्रमाण अधिक असलेल्या अन्न पदार्थाची यापुढे ज्यांचा उल्लेख “HFSS” अन्न पदार्थ असा करण्यात येईल. शाळेच्या आवारात किंवा परिसरात मोफत वितरणासह कोणत्याही प्रकारे विक्री करण्यास मनाई करणे.
६. “शाळेच्या आवारात किंवा परिसरात संतृप्त चरबी किंवा ट्रान्स फॅट किंवा अतिरिक्त साखर किंवा जाहिरात करु नये” अशी चेतावणी देणारे फलक, इंग्रजी किंवा एका भारतीय भाषेत, शाळेच्या प्रवेशद्वारावर किंवा प्रवेशद्वाराजवळ ठळकपणे लावण्यात यावा.
७. शाळेतील संगणकावर “HFSS” अन्न पदार्थाच्या जाहिराती प्रदर्शित करण्यास प्रतिबंध करणे.
८. शालेय अन्न विनियमांच्या विनियम ४ नुसार शाळेच्या परिसरात व सभोवतालच्या क्षेत्रात सुरक्षित अन्न आणि संतुलित आहारास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
९. शालेय अन्न विनियमांच्या विनियम ५ (१) अन्वये कोणत्याही व्यक्तीस शाळेच्या परिसरात किंवा शाळेच्या प्रवेशद्वारापासून कोणत्याही दिशेला पन्नास मीटर अंतराच्या क्षेत्रास शालेय मुलांना HFSS (High in fat, salt, sugar) अन्नपदार्थाची जाहिरात, विपणन विक्री, विक्रिसाठी मांडणी किंवा मोफत वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे आणि त्यामुळे प्रत्येक शाळेभोवती सक्तीचे सुरक्षित अन्न क्षेत्र निर्माण करण्यात आले आहे.
१०. शालेय कॅन्टीन व वस्तीगृह स्वयंपाकगृहांनी फळे पालेभाज्या संपुर्ण धान्य, कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध पौष्टिक अन्न पदार्थाचा नियमित भोजन सुचित सक्रिय पणे समावेश करावा.
११. HFSS (High in fat, salt, sugar) अन्न पदार्थ शाळेच्या परिसरात विद्यार्थ्याना वाढले, विकले, प्रदर्शित किंवा अन्य कोणत्याही प्रकारे उपलब्ध करुन दिले जाणार नाहीत.
१२. विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणारे पिण्याचे पाणी सुरक्षित, पिण्यायोग्य आणि अधिनियमाअंतर्गत विहित मानंकानुसार गुणवत्तेसाठी तपासलेले असावे.
१३. शाळेच्या परिसरात कार्यरत असलेल्या प्रत्येक अन्न व्यवसाय चालकाकडे वैध व अद्यावत FSSAI परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र असून ते ठळकपणे प्रदर्शित केलेले आहेत की नाही याची खात्री करावी.
१४. अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायाचे परवाना व नोदंणी) मधील विनियम, २०११ मधील अनुसुचि ४ चे पुर्ण पालन सुनिश्चित करणे त्यामध्ये स्वच्छता व आरोग्य विषयक परिस्थीती, अन्न हाताळणाऱ्या व्यक्तीची वैयक्तीक स्वच्छता, अन्न साठवणूक व तापमान नियंत्रण, किड नियंत्रण आणि कचरा व्यवस्थान याकडे विशेष लक्ष देणे.
१५. शाळेच्या प्रवेशद्वारापासून कोणत्याही दिशेला पन्नास मीटरच्या परिसरात कोणतीही व्यक्ती HFSS अन्नपदार्थांची विक्री किंवा जाहिरात करणार नाही याची खात्री करण्यासाठी सक्रिय पावले उचलणे, उल्लंघन आढळल्यास संबंधित अन्न सुरक्षा अधिकारी व स्थानिक प्राधिकरणाला त्याची माहिती देणे.
१६. आवश्यकतेनुसार अन्न सुरक्षा प्रदर्शन फलक आणि अन्न सुरक्षा पर्यवेक्षक उपलब्ध असल्याची खात्री करणे.
१७. गट शिक्षण अधिकारी आणि प्रशासन अधिकारी यांनी अनुपालनावर देखरेख ठेवण्याचे तसेच उल्लंघनाची माहिती संबंधित अन्न सुरक्षा अधिका-याला देणेत यावी.
१८. शाळा तपासणी, अधिस्वीकृती आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या आढाव्यामध्ये अन्न सुरक्षा व पोषणविषयक मानकांच्या अनुपालनाचा समावेश करणे.
१९. शिक्षक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि मध्यान्ह भोजन कर्मचा-यांच्या संयुक्त प्रशिक्षणासाठी अन्न व औषध प्रशासनाशी समन्वय साधणे.
२०. शाळा व्यवस्थापन समितीने मंजूर केलेले शालेय पोषण धोरण तयार करणे.
२१. संपूर्ण शालेय वेळेत विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध राहतील अशी सुरक्षित पिण्याच्या पाण्याची केंद्रे उभारणे.
२२. प्रत्येक शैक्षणिक वर्षात अन्न सुरक्षा व पोषणविषयक किमान चार जनजागृती सत्रे आयोजित करणे.
२३. FSSAI चे अन्न सुरक्षा व आरोग्यदायी आहारासंबंधी संदेश ठळकपणे प्रदर्शित करणे.
२४. शालेय कॅन्टीन अथवा मध्यान्ह भोजन व्यवस्था आरोग्यदायी आहाराचा आदर्श नमुना म्हणून चालविणे.
२५. विद्यार्थी व पालकांमध्ये अन्न सुरक्षा व पोषणबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे.

PM Poshan Shakti Nirman Yojana आदेश
वरील प्रमाणे सुचना आपले स्तरावरुन सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी (शिक्षण), सर्व केंद्रप्रमुख, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व ग्रामपंचायत यांना देण्यात याव्यात. तसेच मा. अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील आदेश जा.क्र. FDA/Food/ School/Food Safety/९६७-२०२६, दि. २८/०७/२०२६ मधील सर्व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणेचे निर्देश देण्यात यावेत.
हे देखील वाचा : राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी “Pink E-Rickshaw Yojana GR”
PM Poshan Shakti Nirman Yojana जनजागृती प्रसिध्दी
1. दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ च्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळांच्या पन्नास मीटर परिसरातील दुकानांमध्ये जंकफूडची विक्री केली जात नाही असा ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात यावा, याबाबत जनजागृती करुन प्रसिध्दी दयावी.
2. मा. अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांच्या दिनांक २८/०७/२०२६ रोजीच्या सुचना व निर्देशांची अंमलबजावणी १५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी व प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या आवाराच्या ५० मीटर हद्दीत जंकफूडचे स्टॉल नाही असे प्रमाणपत्र मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सरपंच/प्रशासक व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने गट विकास अधिकारी यांचे मार्फत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना सादर करावे. सर्व प्रमाणपत्र जमा करणेबाबत समन्वय गट शिक्षणाधिकारी यांनी करावा.
3. दिनांक १५/०८/२०२६ नंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी संपुर्ण जिल्हयात आकस्मिक भेटी देणार आहेत. भेटी दरम्यान मा. अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांच्या दिनांक २८/०७/२०२६ रोजीच्या आदेशाची तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ ची अंमलबजावणी झाली नसल्याचे आढळून आल्यास संबधित शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्यावर अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ नुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. तसेच संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) अधिनियम 1964 नुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल तसेच सरपंच/प्रशासक व पंचायत पदाधिकारी यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार कर्तव्यात कसुर केल्याने कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल यांची गांभिर्याने नोंद घ्यावी.
हे देखील वाचा : Farmer ID Registration Maharashtra : पोर्टलद्वारे नोंदणी कशी करावी?
PM Poshan Shakti Nirman Yojana नियमांचा थोडक्यात सारांश :
- 1️⃣ शाळेपासून ५० मीटर परिसरात HFSS म्हणजे जास्त चरबी, मीठ किंवा साखर असलेले पदार्थ विक्री/जाहिरात करण्यास प्रतिबंध.
- 2️⃣ शाळेच्या आवारात किंवा प्रवेशद्वाराजवळ जंक फूडची विक्री, जाहिरात किंवा मोफत वाटप करता येणार नाही.
- 3️⃣ शाळेतील कॅन्टीन/मध्यान्ह भोजन देणाऱ्या संस्थेकडे वैध FSSAI परवाना किंवा नोंदणी असणे आवश्यक.
- 4️⃣ विद्यार्थ्यांना दिले जाणारे पिण्याचे पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य असणे आवश्यक.
- 5️⃣ अन्न तयार करणाऱ्या व्यक्तींची वैयक्तिक स्वच्छता, अन्नसाठवणूक, तापमान नियंत्रण व कचरा व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक.
- 6️⃣ शाळांमध्ये सुरक्षित अन्न क्षेत्र निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- 7️⃣ शाळा परिसरात HFSS पदार्थांची विक्री, वितरण, प्रदर्शन व जाहिरात रोखण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर आहे.
- 8️⃣ शाळेच्या आवारात अन्न व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे वैध व अद्ययावत FSSAI नोंदणी/परवाना आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक.
- 9️⃣ प्रत्येक शैक्षणिक वर्षात अन्न सुरक्षा व पोषणाबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्याच्या सूचना आहेत.
- 🔟 शाळा व्यवस्थापन समितीने आपल्या शालेय पोषण धोरणात अन्न सुरक्षा व पोषण मानकांचा समावेश करणे अपेक्षित आहे.
ग्रामपंचायतींसाठीही महत्त्वाचे PM Poshan Shakti Nirman Yojana :
दिनांक १५ ऑगस्ट २०२६ च्या ग्रामसभेत ग्रामपंचायत हद्दीतील शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूडची विक्री केली जात नाही, याबाबत ठराव घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (PM Poshan Shakti Nirman Yojana)
📄 तसेच संबंधित शाळांकडून आवश्यक प्रमाणपत्रे घेऊन ती शिक्षण विभागाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- ⚠️ नियम कागदावर राहू नयेत! प्रत्येक पालकाने आपल्या मुलाच्या शाळेत:
- 👉 कॅन्टीन आहे का?
- 👉 कॅन्टीन चालकाकडे FSSAI परवाना आहे का?
- 👉 पिण्याचे पाणी सुरक्षित आहे का?
- 👉 शाळेच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकले जाते का?
- 👉 विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळतो का?

PM Poshan Shakti Nirman Yojana याची माहिती घेणे आवश्यक आहे. ही केवळ शाळेची जबाबदारी नाही; आपल्या मुलांच्या आरोग्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. माहिती वाचा, प्रश्न विचारा, नियमांची अंमलबजावणी होतेय का ते तपासा आणि आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी जागरूक नागरिक बना!
“सुरक्षित अन्न • निरोगी विद्यार्थी • जागरूक समाज” #PM Poshan Shakti Nirman Yojana