“Pink E-Rickshaw Yojana GR” : महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग.दिनांक:- ३१ जुलै, २०२६ चा शासन निर्णय क्रमांक राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी “पिंक (गुलाबी) ई-रिक्षा” उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्याबाबत..
संदर्भ :-
- १. महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. मवबा २०२४/प्र.क्र.२२/कार्या-२, दि.०८.०७.२०२४
- २. महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. मवबा २०२४/प्र.क्र.१७८/कार्या-२, दि.३१.०७.२०२४, दि.१३.०९.२०२४, दि.१६.०९.२०२४, दि.२५.०९.२०२४ व दि.०३.१०.२०२४.
प्रस्तावना :- Pink E-Rickshaw Yojana GR
राज्यातील गरजू महिला आणि मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना आत्मनिर्भर व सक्षम बनवणे, तसेच त्यांना सक्षम करणे, या उद्देशाने राज्यातील ८ जिल्ह्यांतील सर्व प्रमुख शहरांमध्ये महिला आणि मुलींना नोकरी व रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देणे आणि रिक्षा चालवण्यासाठी इतर सुविधा पुरवणे, या संदर्भात ‘पिंक ई-रिक्षा’ योजनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात शासकीय निर्णय घेतले जात आहेत. सदर योजनेत सुधारणा करण्याचा मुद्दा सरकारच्या विचाराधीन होता.
शासन निर्णय :- Pink E-Rickshaw Yojana GR
राज्यातील इच्छुक महिला व मुलींना रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी “पिंक (गुलाबी) ई-रिक्षा” या योजनेमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे:-
- १) सदर योजनेंतर्गत ई-रिक्षा किंमतीच्या २०% शासन अनुदाना ऐवजी आता ई-रिक्षा किंमतीच्या ४०% शासन अनुदान राज्य शासनामार्फत अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- २) सदर योजनेंतर्गत ई-रिक्षा किंमतीच्या ६०% आर्थिक भार लाभार्थी यांचा असणार असून त्यातील किमान १०% त्यांचे स्वभांडवल असेल व उर्वरित रक्कम पुरवठादार कंपनीकडून बिनव्याजी “Partial Deferred Payment Facility” व्दारे किंवा नागरी सहकारी बँका/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका/राष्ट्रीयकृत बँका/अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकाकडून कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- ३) सदर योजनेंतर्गत यापूर्वी “पिंक ई-रिक्षा” वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना देखील २०% शासन अनुदान ऐवजी ४०% शासन अनुदान वाटप करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- ४) “पिंक ई-रिक्षा” या योजनेंतर्गत राज्यातील ८ जिल्हयांतील प्रमुख शहरांसाठी १०,००० लाभार्थी संख्या ऐवजी ५,००० लाभार्थी संख्या निश्चित करण्यात येत आहे.
‘पिंक ई-रिक्षा’ योजन वाटप
सदर योजनेंतर्गत यापूर्वी “पिंक ई-रिक्षा” वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना उर्वरित २०% शासन अनुदान रिक्षा खरेदी करण्यासाठी उपलब्ध करुन घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अदा करण्यात यावे. सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे अनुदानाचे वाटप आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या कार्यालयामार्फत अदा करण्यात यावे.
‘पिंक ई-रिक्षा’ योजनेच्या अंमलबजावणी
सदर योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी आल्यास योजनेच्या कार्यपध्दतीमध्ये बदल करण्याचे अधिकार मा. मंत्री (महिला व बाल विकास) यांना राहतील.
‘पिंक ई-रिक्षा’ योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला अर्जदारांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे:
- महिला अर्जदाराचे आधार कार्ड
- रहिवासी दाखला आणि (महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र)
- वयाचा पुरावा (जन्म दाखला/शाळेच्या सोड्याचा दाखला / पॅन कार्ड, कोणतेही एक)
- उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकरणाने प्रस्तावित केलेला डिजिटल सही )
- पासपोर्ट आकाराचा २ फोटो
- बँक पासबुकच्या पहिल्या प्रतीची छायाप्रत (आधार कार्ड सोबत लिंक जोडलेले खाते)
- वाहनचालक परवाना (ड्रायव्हर लायसन्स) किंवा ‘वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी/परवाना मिळवण्यासाठीचे हमीपत्र’.
Pink E-Rickshaw Yojana अर्ज कुठे करावा?
महिला अर्जदारांनी आपल्या जिल्ह्यातील ‘जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी’ यांच्या कार्यालयात जाऊन योजनेसाठी छापील अर्ज घ्यावा. किंवा बाहेर स्रोत मधून जसे कि CSC सेंटर वरून ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर विचारलेले सर्व कागदपत्रे अपलोड करणे: ऑनलाइन अर्जामध्ये सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

Pink E-Rickshaw Yojana संपर्क तपशील
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग कार्यलय मध्ये योजनेसाठी संपर्क करावा. किंवा आपल्या जवळच्या ‘जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी’ यांच्या कार्यालयात जाऊन Pink E-Rickshaw Yojana GR बद्दल संपर्क करावा.

💡 महत्त्वाची सूचना: ही Pink E-Rickshaw Yojana प्रमुख जिल्ह्यांमधील ८ निवडक शहरांमध्ये लागू असल्यामुळे, Pink E-Rickshaw Yojana Online अर्ज करण्यापूर्वी, आपल्या भागातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधा आणि योजनेची अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असल्याची खात्री करून घ्या.
निष्कर्ष
महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील गरजू आणि महत्त्वाकांक्षी महिलांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. “Pink E-Rickshaw Yojana ४०% अनुदानामुळे, महिला अत्यंत कमी खर्चात आणि सुलभ कर्ज सुविधेसह स्वतःची ई-रिक्षा घेऊन सन्मानाने आणि आत्मविश्वासाने रोजगार मिळवू शकतील.
कृपया तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये मांडा.
मला आशा आहे की तुम्हाला, Maharashtra “Pink E-Rickshaw Yojana GR” वरील हा लेख आवडला असेल आणि “Pink E-Rickshaw Yojana GR” बाबत काही तक्रार असतील तर करा आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील.
Maharashtra “Pink E-Rickshaw Yojana GR” साठी अर्ज करण्याबद्दल तुम्हाला अजूनही काही प्रश्न असल्यास, कृपया खाली कमेंट करा. मी शक्य तितक्या लवकर Pink E-Rickshaw Yojana बद्दल तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन.
जर ‘Maharashtra Pink E-Rickshaw Yojana‘ हा लेख तुमच्या नातेवाईकाला उपयुक्त ठरू शकत असेल, तर कृपया तो त्यांच्यासोबत फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर Pink E-Rickshaw Yojana ची माहिती शेअर करा. धन्यवाद!