Police complaint Format in Marathi : पोलीस तक्रार अर्ज नमुना मराठी

On: November 8, 2025 10:12 AM
Follow Us:
Police complaint Format in Marathi | पोलीस तक्रार अर्ज नमुना मराठी : Police Takrar Arj Namuna

Police complaint Format in Marathi : नमस्कार वाचक मित्रांनो, Police complaint Format in Marathi मध्ये आपले स्वागत आहे. आम्ही तीन प्रकारचे पोलीस तक्रार अर्ज नमुना मराठीत देत आहोत, तेही लेखी आणि PDF सह, चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Police complaint Format in Marathi | पोलीस तक्रार अर्ज नमुना मराठी pdf :पोलीस तक्रार विनंती अर्ज कसा लिहावा नमुना ग्रामपंचायत तक्रार अर्ज नमुना.

  • मा. सो.पोलिस- पोलीस अधीक्षक / पोलीस आयुक्त यांच्या सेवेशी.
  • ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रातील नाव लिहा तालुका / जिल्हा.
  • दिनांक.
  • अर्जदार =  आपले नाव लिहा.
  • ( पत्ता लिहा पूर्ण – मोबाईल नं लिहा )

विषय ग्रामपंचायत ( गावाचे नाव लिहा )आणि त्यांचे  कडून माहिती अधिकार अर्जदारास जीवे ठार मारण्याची धमकी चौकशी होणे बाबत.

महोदय,  

मी वरील विषयावर अर्ज सादर करितो कि मी सुशिक्षित तरुण व्यक्ती( गावाचे नाव लिहा ) गावाचा रहिवासी असून ग्रामपंचायत चा विकास कामासाठी शासकीय निधी चा मोठया प्रमाणात अफरा तफर झाल्याचे निर्दनास आलेले होते.

ग्रामसेवक यांना वेळोवेळी चर्चा करून ही उडवे उडवि ची उत्तरे दिली तर मी त्या विरुद्ध माहिती अधिकार द्वारे माहिती न मिळाल्याने अपील करून अपील अधिकारी मुळे चौकशी ला सुरवात झाल्यावर ( ज्याने धमकी दिली असेल त्याचे नाव लिहा )आणि ( अजून कोण असेल त्याचे नाव )यांनी मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली तरी महोदयांनी आपल्या स्तरावरून माझ्या जीवनास काही झाल्यास सर्वस्व जबाबदारी आपली राहील आणि मला सौरक्षण मिळावे.

मी स्वतः माहिती अधिकार खाली शासनाच्या निर्धानास आणत आहे व मोठया प्रमाणात ग्रामपंचायत भ्रष्टाचार उघडकिस आणत आहे  आणि त्यांचे सहकार्य मला जीवे ठार मारण्याची धमकी देत आहे.

 मी अति दुर्गम भागात राहत असून रात्री, बेरात्री, माझ्या सायबर सेवा केंद्र दुकान असून मला केव्हाही मारण्याची धमकी देत आहे.मला काही झाल्यास संबंधित व्यक्ती जबाबदार असतील.

ही नम्र विनंती.

माहिती अधिकार अर्ज केल्यानंतर कोणी धमकी, जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ, केल्यास सेम असा अर्ज लिहून आपले नाव आणि तुमच्या वर हमला केला असेल त्याचे नाव लिहा.

घरात चोरी झाल्यास पोलीस तक्रार अर्ज कसा लिहावा | Gharat Chori Zalyas Police complaint Format In Marathi

घरात चोरी झाल्यास पोलीस तक्रार अर्ज कसा लिहावा | पोलीस तक्रार अर्ज नमुना मराठी pdf |पोलीस तक्रार अर्ज नमुना | विनंती अर्ज कसा लिहावा नमुना अर्ज वाचा आणि आपल्या पद्धतीने शेअर करा.

Gharat Chori Zalyas Police complaint Format In Marathi :Police Takrar Arj Namuna

घरात चोरी झाल्यास पोलिस तक्रारीचा नमुना. : तुमच्या घरात चोरी झाल्यास तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ नये, म्हणून मी पोलीस तक्रारीचा नमुना तयार करून देत आहे.हे केवळ तुमच्या काळजीपोटी देत आहे राजकारणाचा आणि याचा काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी.

  • प्रति,
  • मा. सो. पोलीस निरीक्षक,- पोलीस अधीक्षक
  •  / पोलीस आयुक्त यांच्या सेवेशी.
  • (ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रातील ) नाव लिहा तालुका / जिल्हा.
  • दिनांक.
  • अर्जदार = आपले नाव लिहा.
  • ( पत्ता लिहा पूर्ण – मोबाईल नं लिहा )

विषय : माझ्या घरातील काही वस्तू माझ्या परवानगीशिवाय कोणीतरी नेल्याबद्दल.

महोदय,

मी गावाला गेलो होतो.घराला कुलूप होते. मी दिनांक ( … ) सकाळी ( ..) वाजता घरी आल्यावर बघितले तर घराचे कुलूप तोडून दार उघडे होते. किल्ली माझ्याकडे असल्याने नाईलाजाने संबंधित व्यक्तीने दार अशा रीतीने उघडले असावे हे ही मी समजू शकतो. पण त्यानंतर घरात बघितले तर कपाटातील रोख ( …) रुपये, ( …. ) तोळे सोने,( ….) वस्तू आढळल्या नाहीत. त्यामुळे कुलूप उघडणारी व्यक्ती व त्या वस्तू नेणारी व्यक्ती एकच असावी असा माझा भाबडा तर्क आहे.या तर्काची आपल्याला अगदी सहज शक्य असेल शहानिशा करावी.

अर्थात मी त्या व्यक्तीवर चोरीचा आरोप करणार नाही कारण जोपर्यंत ती व्यक्ती या मौल्यवान वस्तू का नेल्या ? हे आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्याला चोरी म्हणणे बेकायदेशीर व संबंधित व्यक्तीची बदनामी आहे.त्यामुळे त्याच्या मानवी हककाची पायमल्ली मी करणार नाही. फक्त त्याने या वस्तू का नेल्या व केव्हा परत करणार याबाबत आपण विचारणा करावी ही विनंती.

मी व्यक्ती म्हणताना ती व्यक्ती पुरुष आहे की स्त्री याबाबत काहीही म्हणत नाहीये याची नोंद घ्यावी कारण तसा अर्थ ध्वनित झाल्यास जगातील पुरुष इंवा महिला या समूहाच्या काही कोटी व्यक्तींची बदनामी होऊ शकते. ही व्यक्ती भारतीय असेल असाही माझा संशय नाही कारण त्यातून कोट्यवधी भारतीय बांधव व भगिनी यांची बदनामी होऊ शकते याची मला नम्र जाणीव आहे. इतर देशातील असेल असेही मी म्हणत नाही कारण त्या देशांची बदनामी होऊ शकते व त्यातून परराष्ट्रीय तणाव निर्माण होऊन देश आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचणीत येऊ शकतो..याचे गांभीर्य मला माहित आहे.

मी संशयित म्हणून कोणाचेही नाव घेत नाही कारण त्यातून त्यातून त्या व्यक्तीचे आडनाव,जात,धर्म,गाव,व्यवसाय यांच्याविषयी बदनामी होऊ शकते याची मला नम्र जाणीव आहे..

हे सर्व विचारात घेवून आपण या घटनेचा शोध घ्यावा ही विनंती

हा माझा पहिला व शेवटचाच अर्ज आहे. यानंतर मी पाठपुरावा करणार नाही कारण मी सतत आलो तर शासकीय कामात अडथळा हा गुन्हा आपण माझ्यावर दाखल करू शकता किंवा चोरी गेलेल्या वस्तू मी कोठून आणल्या याची चौकशी लाऊ शकता याची भीती मनात आहेच.

आपला नम्र.

In case of theft in the house Sample Police complaint Format In Marathi : माझ्या घरातील चोरीबाबत पोलीस तक्रार अर्ज :

घरात चोरी पोलीस तक्रार अर्ज : आदरणीय सर, मी आणि माझी पत्नी दोघेही शासकीय कर्मचारी आहोत. कामाच्या दिवसात सकाळी 8:00 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत वेळेत आमचे घर कुलूपबंद असते. मध्येच मोलकरीण एक तास साफसफाईसाठी यायची. माझ्या फ्लॅटमधून 3.5 लाख किमतीचे दागिने आणि रु.6300/- रोख चोरीला गेले आहेत.

In case of theft in the house Sample Police complaint Format In Marathi : माझ्या घरातील चोरीबाबत पोलीस तक्रार अर्ज : Police Takrar Arj Namuna

 In case of theft in the house Police complaint Format In Marathi : आम्ही पोलीस ठाण्यात जाऊन सदर झालेली घटनेची माहिती दिली. त्यांनी विचारलेले प्रश्नांचे उत्तर आम्ही दिले, की घरात कोण राहतो. त्यांना सांगितले मी आणि माझी पत्नी म्हणालो.

मग त्यांनी विचारले मला परत विचारले की चाब्या कोणाकडे आहेत, मग मी म्हणालो एक माझ्याकडे आहे, एक माझ्या पत्नीकडे आहे आणि दुसरी मोलकरीण आहे. त्यानंतर पोलिसांनी माझ्या घरी येऊन सर्व काही तपासले, चौकशी केले आणि मोलकरणीवर संशय घेतला आणि तिचे घरही तपासले.

मग त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात यायला सांगितले आणि आम्हीही तसेच केले.( In case of theft in the house Police complaint Format In Marathi)  त्यांनी संशयित म्हणून मोलकरणीवर कलम 381 अंतर्गत एफआयआर दाखल केला. दुसऱ्या दिवशी ते तिची आणि आजूबाजूच्या सोसायटीतील लोकांची चौकशी करतात. सुरुवातीला पोलीस सांगत राहतात की तिने घेतले नाही.आणि मला विचारले काय करू..

मग मी सांगितले की माझ्या मेहनतीच्या पैशात माझ्या पत्नीचे मंगळसूत्र देखील आहे आणि त्यांना त्यांच्या प्रक्रियेनुसार पुढे जाण्यास सांगा. आणि आम्ही असेही सांगितले की आमच्याकडे मोलकरणीने दागिने चोरल्याचा कोणताही पुरावा नाही. तिच्याकडे चाव्या असल्याने आम्ही तिच्यावर संशय घेत आहोत. पोलिसांसह अनेकांनाही तिच्यावर संशय होता.

पोलिसांची चौकशी चालू आहे मध्येच ते माझ्या घरी आले आणि पुन्हा एकदा तपासले. १३ व्या दिवशी पोलिसांनी मला बोलावून सांगितले की आम्ही तिची सर्व प्रकारे चौकशी केली आणि काहीही सापडले नाही. पण आम्ही आमच्या प्रक्रियेनुसार तिला अटक करून न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले पाहिजे. आणि आम्ही तिला अटक केली असली तरी आम्ही तिची सर्व चौकशी पूर्ण केल्याने तिच्याकडून सोने परत मिळणार नाही असे सांगितले. आणि म्हणाली की ती गरीब आहे आणि तिला मुले आहेत आणि तिचे आयुष्य खराब होईल.

मग मी विचारले काय करावे: मग त्यांनी मला दोन पर्याय सांगितले: 

  • 1. तिला अटक करा आणि न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करा, पण ते सोने परत मिळवण्यास मदत करणार नाही. 
  • 2. केस काढा. तुमच्या घरात सोने सापडले आहे हे स्वीकारून. सुरुवातीला मी थक्क झालो आणि गोंधळलो.

पोलीस तक्रार अर्ज नोंद : Police complaint Format In Marathi

एखाद्याचा सल्ला घेण्यासाठी मी किमान 3 दिवसांचा वेळ मागितला. पण त्यांनी सांगितले की तुमच्याकडे 1५ मिनिटेही नाहीत कारण आधीच खूप उशीर झाला आहे. मी तक्रार नोंदवल्या दिवसापासून माझ्यावर खूप तणाव आणि दबाव आहे आणि माझे कार्यालयीन जीवन आणि कर्मचारी जीवन देखील प्रभावित होत आहे.

  • त्यामुळे मी केस मिटवण्याच्या निष्कर्षाप्रत आलो. पण सुरुवातीला माझ्याकडे दागिने नसल्यामुळे मी 
  • पर्याय १ साठी सहमती देण्यास टाळाटाळ केली.
  •  पर्याय २ विचारला. मग ते म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवा हा सर्वोत्तम पर्याय आहे.
  •  मला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे घेऊन गेले बहुधा सी.आय.

वरिष्ठ अधिकाऱ्यानेही मला तेच सांगितले की हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि त्यांनी SI ला तसे करण्यास सांगितले. मग त्यांनी माझ्याकडून पत्र घेतले की दागिने स्वयंपाकघरातील स्टीलच्या बॉक्समध्ये सापडले होते आणि ते चुकून घडले होते. आणि त्यांनी मोलकरणीचे पत्र देखील घेतले की तिला माझ्यावर कोणताही राग नाही आणि ती या प्रकरणात यापुढे तक्रार करणार नाही. .

सर माझ्या आयुष्यातील गेल्या 10 दिवसात असेच घडले आहे. मी माझे काम, माझी तब्येत यासह कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि घडलेल्या घटनाक्रमाने मी खूप निराश आणि निराश झालो आहे.

५६-५७ वर्षांच्या जवळ असलेले माझे आई-वडील देखील घडलेल्या घटनाक्रमाने दडपण अनुभवत आहेत. सर मी निश्चितपणे या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहे की माझी फसवणूक झाली आहे.

माझे दागिने चोरीला गेले आणि वर तेच माझ्या घरात सापडल्याचे त्यांनी मला मान्य केले. अरेरे..किती मूर्ख आहे मी आता हे इतर कोणाला सांगण्याच्या स्थितीत नाही. आदरणीय महोदय, कृपया पुढील प्रक्रिया काय आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत ते सांगाल का?

या सगळ्यातून बाहेर पडून नव्याने सुरुवात करायची आहे. कारण मी माझ्या वाहकाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. ( In case of theft in the house Police complaint Format In Marathi) मी एक इलेक्ट्रॉनिक सर्किट (VLSI) डिझाईन अभियंता आहे. प्रथमच मी या संदर्भात खुलासा केला आणि माझ्या सर्व भावना तुमच्याशी शेअर केल्या.. सर, कृपया मला मार्गदर्शन करावे आणि सल्ला द्यावा ही विनंती.

वृक्षांना खिळे पोलिसांत तक्रार अर्ज : Zadana Khile Police complaint Format In Marathi : Police Takrar Arj Namuna

 कोरोना काळात ऑक्सिजनाचे महत्त्व सर्वांनाच कळले असताना अजूनही ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांना जाहिरात फलक आणि तत्सम बाबीसाठी खिळे ठोकले जात आहे त्यामुळे वृक्षांना किडे लागण्याचे हे प्रकार घडतात ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते वैभव देशमुख यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यात संबंधितांवर तक्रारी दिल्या आहेत.

वृक्षांना खिळे पोलिसांत तक्रार अर्ज : Zadana Khile Police complaint Format In Marathi : Police Takrar Arj Namuna

जाहिरातीचे पैसे वाचवण्यासाठी अनेक व्यवसायिक आणि शैक्षणिक संस्था वृक्षांना किडे मारून तसेच तारेने बांधून त्याची जाहिरात फलक लावतात त्यामुळे वृक्षांना इजा होतो याशिवाय शहर विद्रुपीकरण नही होते प्रामुख्याने जत्रा, हॉटेल,राम बिहारी स्कूल अमृतधाम तसेच इतर महामार्गाला लागून असलेल्या छोट्या, मोठ्या वृक्षांना अशा प्रकारचे किडे ठोकण्यात आले आहेत उद्यान विभागात तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य नागरी क्षेत्र झाडांचे जतन महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 वैभव राजाराम देशमुख कर्तव्यशील सामाजिक संस्था.

कोरोना काळात ऑक्सिजन अभावी अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे तरी वृक्षांचे महत्वा काढणे गरजेचे होते या संदर्भात वृक्ष प्राधिकरण समितीही दखल घेत नाही. भिडे ठोकल्यामुळे या झाडांना होणाऱ्या वेदनेची जाणीव आयुक्त उद्यान आयुक्त तसेच झोपी गेलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीला कधी होणार खिळे बाजांवर तात्काळ गुन्हे नोंदवून दंड वसुली करावा.

Police complaint Format in Marathi PDF

निष्कर्ष 

मित्रांनो  मला असे व्हाटते कि सदर लेख आपणास आवडला असेल आणि ह्यात आपल्या पद्धतीने  काही  शब्द बदलू शकता घरात चोरी झाल्यास पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज आम्ही दिलेला लेख नक्कीच आवडला असेल, अशाच काही जनहितार्थ नमुना लेखन. तक्रारी अर्ज नमुना आम्ही सादर करीत असतो . आमच्या Page ला Follow करण्यासाठी Contact page मध्ये जाऊन जॉईन व्हा. पोलीस तक्रार अर्ज नमुना मराठीत.

Leave a Comment