Smart Mitar Vij Darvadhi Virodhat Arj : आज काल अनेक गावात शहरात वीज बाबत तक्रार येत आहे, पहिल्या महिन्यात २०० रु. लाईट बिल तर दुसऱ्या महिन्यात लगेचच १५०० रु लाईट बिल त्यामुळे अनेक लोकं वैतागले आहेत. अशातच Smart Mitar Vij Darvadhi Virodhat Arj कसा करावा हे त्यांना समजत नाही.
म्हणून आज आम्ही Smart Mitar Vij Darvadhi Virodhat Arj दिलेला आहे. तो तुम्ही आपल्या हाताने लिहून जवळच्या महावितरण कार्यलयात जाऊन जमा करावे नक्कीच याचे प्रश्न सुटेल.
स्मार्ट मीटर व वीज दरवाढी विरोधात निवेदन/अर्ज. Smart Mitar Vij Darvadhi Virodhat Arj
प्रति,
- १) प्रधानमंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली
- २) मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई
- मार्फत, सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत, प्रादेशिक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.
- ३) सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत, प्रादेशिक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.
- विषय : स्मार्ट मिटर लावण्याचा निर्णय रद्द करणे, एप्रिल २०२४ व त्यानंतरच्या सर्व वीजदरवाढ रद्द करणेबाबत
महोदय,
अर्जदार हा भारताचा नागरीक आहे, तुम्ही ‘अच्छे दिन’ चे आश्वासन निवडणुकी पूर्वी दिले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या वेळी स्मार्ट मिटर घरोघरी लावणार नाही असे जाहीर करुनही जबरदस्ती गुपचूप स्मार्ट मीटर लावले जात आहेत. खाजगी कंपन्या जास्तीत जास्त नफ्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेत नाहीत असेही दिसून आले आहे. टाटा कंपनीने वीज वितरणासाठीचा परवाना आमच्या जिल्ह्यासाठी मागितल्याची माहिती मिळत आहे. टाटा कंपनीने इंडियन एअरलाइन्सचे निकृष्ट बोईंग विमान वापरून अहमदाबाद मध्ये २४२ नागरिकांचे प्राण घेतल्याचीही माहीती मिळत आहे.
वीज, शिक्षण, आरोग्य, वाहतूक इ. पायाभूत सुविधांचे खाजगीकरण करण्यास माझा विरोध आहे. खाजगीकरण करून महागाई वाढवण्यासाठी आपणास निवडून दिलेले नाही. तेव्हा आपणास नम्र विनंती की, गुपचूप / जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावू नका व गुपचूप जबरदस्तीने माझी परवानगी नसताना लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या व एप्रिल २०२४ व त्यानंतर केलेली प्रचंड वीजदरवाढ रद्द करा. मला दिलासा द्या. महावितरणचा कारभार पारदर्शी, लोकाभिमुख करा.
आपला विश्वासू
- नाव :
- विज ग्राहक क्रमांक :
- पत्ता :
- मोबाईल नं. :
- महावितरण ची अधिकृत वेबसाईट : https://www.mahadiscom.in/
हेही वाचा : नुकसान भरपाई साठी महावितरण विरोधात तक्रार अर्ज कसा लिहावा
स्मार्ट मीटर व वीज दरवाढी विरोधात निवेदन/अर्ज.
श्री / श्रीमती . यांचा स्मार्ट मीटर व वीज दरवाढी विरोधातील निवेदन / अर्जाची प्रत मिळाली. ती प्रत संबंधित कार्यालयात पोहोचवण्यात येईल. परंतु केवळ अर्ज निवेदन केल्याने मागणी पूर्ण होईल, असे नाही, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी दहा वाजता अर्धा तास आपण किंवा आपल्या घरातील कोणीही एक व्यक्ती आपल्या कष्टाची कमाई वाचवण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक महावितरण जुबली पार्क कार्यालय येथे आला तरच सरकारवर आपल्या सर्वांच्या एकजुटीतून दबाव येऊन आपली मागणी मंजूर होऊ शकते, याची नोंद घ्यावी धन्यवाद.
आपला
- अॅड. अभय टाकसाळ,
- शहर सेक्रेटरी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष











