World Tribal Day Sample Application, प्रतिमा ai द्वारे निर्मित

पेसा ग्रामपंचायतमध्ये जागतिक आदिवासी दिवस साजरा करणे संबंधी अर्ज नमुने / World Tribal Day Sample Application

Adivasi News

भारत देशात राहणाऱ्या आदिवासी म्हणजे सर्व अनुसूचित जमाती नागरिकांना ९ ऑगस्ट रोजी होणारा जागतिक आदिवासी दिन माहिती असते. जर तुम्हालाही आपल्या पेस ग्रामपंचायत मध्ये ९ ऑगस्ट रोजी होणारा जागतिक आदिवासी दिन साजरी करायचे असल्यास आपल्या ग्रामपंचायत ला विनंती (World Tribal Day Sample Application) अर्ज करू शकता.

त्या साठी आम्ही खाली पेसा ग्रामपंचायतमध्ये जागतिक आदिवासी दिवस साजरा करणे संबंधी २ अर्ज नमुने / World Tribal Day Sample Application दिलेले देखील आहे. एक आपल्या पेसा ग्रामपंचायत मधील अर्ज आहे. आणि दुसरे आपल्या पंचायत समितीला आदिवासी दिवस साजरा करणे संबंधी अर्ज देऊन साजरी करण्यासाठी विनंती अर्ज आहे.

ग्रामपंचायतीसाठी जागतिक आदिवासी दिवस साजरा करणे संबंधी अर्ज (नमुना): World Tribal Day Sample Application

  • प्रति,
  • श्री. सरपंच / ग्राम विकास अधिकारी / ग्रामसेवक,
  • ग्रामपंचायत, न्यू बोराडी,
  • तालुका: शिरपूर, जिल्हा: धुळे.
  • विषय: ९ ऑगस्ट रोजी ‘जागतिक आदिवासी दिन’ साजरा करण्यासंदर्भात.

महोदय/महोदया,

प्रेमपूर्वक, जय सेवा / जय ज़हर.

वरील विषयाच्या अनुषंगाने, मी ग्रामपंचायतीला विनंती करतो की, देशभरात आणि जगभरात ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा करावा. आपली न्यू बोराडी ग्रामपंचायत ‘पेसा’ (PESA) क्षेत्रात येत असल्यामुळे, आदिवासी संस्कृती, परंपरा, भाषा आणि पेसा कायद्यांतर्गत मिळालेले हक्क यांचे जतन करणे आणि त्याबद्दल शिक्षण देणे हे ग्रामपंचायतीतील आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

तथापि, ९ ऑगस्ट रोजी होणारा जागतिक आदिवासी दिन हा ग्रामपंचायतीने आयोजित केला पाहिजे. या दिवशी ग्रामसभेचे आयोजन करावे आणि आदिवासी संस्कृतीचा उत्सव साजरा करणे, पेसा कायद्याबद्दल जनजागृती करणे, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे यांसारखे उपक्रम राबवावेत. शिवाय, या कार्यक्रमासाठी लागणारा आवश्यक खर्च पेसा निधीतून मंजूर करावा.

ही एक विनम्र विनंती आहे.

  • आपला नम्र,
  • [शैलेश पवारा]

पंचायत समितीसाठी जागतिक आदिवासी दिवस साजरा करणे संबंधी अर्ज (नमुना): World Tribal Day Sample Application

  • प्रति,
  • ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी
  • सर्व पेसा ग्रामपंचायत
  • पंचायत समिती शिरपूर,
  • विषय- पेसा ग्रामपंचायती मध्ये “9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस” साजरा करणे संबंधी पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायत पातळीवर अंमलबजावणी करणे बाबत.
  • संदर्भ- १)  (शिरपूर) जा.क्र. / दि.06/08/2026 चे पत्र

महोदय,
वरील विषयान्वये आपणास सूचित करण्यात येते कि, 9 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगभरात “जागतिक आदिवासी दिवस” म्हणून साजरा केला जातो. जगभरात आदिवासींचे मुलभूत, नैसर्गिक हक्क, व पेसा क्षेत्रातील स्वशासन अधिकारासंबंधी साजरा करण्यात येतो. शिरपूर तालुका हा अनुसूचित क्षेत्रातील पंचायतीसंबंधीचे उपबंध अधिनियम १९९६ (पेसा) घोषित असल्याने आदिवासींची संस्कृती, रूढी-परंपरा जतन करण्यासंबंधी पेसा कायदयात विशेष तरतुदी आहेत.

आपल्या गावातील ग्रामपंचायत स्तरावर 9 ऑगस्ट “जागतिक आदिवासी दिवस” साजरा करण्यात यावा. सदर ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी दिनाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच सदर कार्यक्रमाचे इतिवृत्तात पेसा ग्रामपंचायत स्तरारावर ठेवावेत.

नोंद- बिरसा मुंडा, खाज्या नाईक (फोटो) पूजन व झेंडा असावा. कार्यक्रमास पेसा/वनहक्क व संस्कृती विषयक स्थानिक कार्यकर्ते यांचे व्याख्यान आयोजन करण्यात यावे.

हे देखील वाचा : जागतिक आदिवासी दिवस ची संपूर्ण माहिती PDF सह उपलब्ध 

कृपया तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये मांडा.

मला आशा आहे की तुम्हाला, 9 ऑगस्ट “जागतिक आदिवासी दिवस” साजरा करण्या बाबत वरील लेख आवडला असेल आणि World Tribal Day Sample Application बद्दल तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकर देऊन सहकार्य करू.

9 ऑगस्ट “जागतिक आदिवासी दिवस” साठी World Tribal Day Sample Application PDF अर्ज करण्याबद्दल तुम्हाला अजूनही काही प्रश्न असल्यास, कृपया खाली कमेंट करा. मी शक्य तितक्या लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन.

जर ‘9 ऑगस्ट “जागतिक आदिवासी दिवस‘ हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला उपयुक्त ठरू शकत असेल, तर कृपया “जागतिक आदिवासी दिवस‘ हा लेख तो त्यांच्यासोबत फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर शेअर करा. धन्यवाद!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत