राज्य शासनाचा मोठा निर्णय! पशुपालकांसाठी 'Pasudhan Vima Yojana' लागू पहा शासन निर्णय.

राज्य शासनाचा मोठा निर्णय! पशुपालकांसाठी ‘Pasudhan Vima Yojana’ लागू पहा शासन निर्णय.

Scheme

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यात ‘Pasudhan Vima Yojana’ राबविण्यास सरकारने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. या योजनेमुळे पशुपालक शेतकऱ्यांना अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा रोगामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास आर्थिक संरक्षण मिळणार असल्याची माहिती पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

शासन निर्णय : Pasudhan Vima Yojana

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202608051907307145.pdf

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान NLM) राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ‘पशुधन विमा योजना’ (Livestock Insurance Scheme) राज्यात राबविण्यास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी प्रदान करणेबाबत…

  • संदर्भ:-
  • १. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे पत्र क्र. ९९०१४/१५/२०२३-एनएलएम/डीएडीएफ (ई-१९८६६) नवी दिल्ली, दि. २२.०३.२०२४
  • २. कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, शासन निर्णय क्र.एनएलएम-२०२१/प्र.क्र.१५७/पदुम-४, दि. २५ जुलै, २०२४
  • ३. केंद्र शासनाचे निधी वाटप पत्र क्र. २९९०१(११)/१/२०२०-NLM-DADF-Part(१) (E-२२१५४), दिनांक १९.०५.२०२६
  • ४. शासन निर्णय क्रमांक DAHD१४०११/५/२०२६-DAHD-AH४-(E-१७१४५६०) मुंबई दि.२९ जून, २०२६

प्रस्तावना :-

हवामानातील अनपेक्षित बदल, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, विषबाधा, सर्पदंश, दूषित पाणी, गंभीर अपघात तसेच विविध संसर्गजन्य व साथीच्या रोगांमुळे (उदा. लंपी स्किन डिसीज, घटसर्प इत्यादी) पशुधन दगावल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. अशा परिस्थितीत विमा संरक्षणाच्या माध्यमातून पशुपालकांना त्वरित आर्थिक नुकसानभरपाई उपलब्ध करून देणे, त्यांचे आर्थिक स्थैर्य कायम राखणे तसेच त्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचविणे या उद्देशाने राज्यात पशुधन विमा योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.

त्यानुसार केंद्र शासनाने वाचा क्र.

१ येथील पत्रान्वये राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Mission) या योजनेंतर्गत “नाविन्यपूर्ण संशोधन व विस्तार उपअभियान” या घटकांतर्गत पशुधन विमा योजनेचा समावेश केला आहे. त्यास अनुसरुन राज्यशासनाने शासन निर्णय क्र. एनएलएम-२०२१/प्र.क्र.१५७/पदुम-४, दि. २५ जुलै, २०२४ अन्वये पशुधन विमा योजना राबविण्यास प्रशासकिय मान्यता दिली आहे.

Pasudhan Vima Yojana GR
Pasudhan Vima Yojana GR

२ राज्य शासनाने राज्यात पशुधन विमा योजना राबविण्यासाठी दिलेली प्रशासकिय मान्यता विचारात घेऊन महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत पशुधन विमा राबविण्यासाठी विमाकर्त्याची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सदर निविदा प्रक्रियेदरम्यान Agriculture Insurance Company Of India Ltd. (AIC) या निविदाकाराने न्युनतम विमा हप्ता दर दिला आहे. सदर दरास तसेच पशुधन विमा योजना राबविण्यास वित्तीय मान्यता देण्याची शासनाच्या विचाराधीन होती.

हे देखील वाचा : महात्मा फुले जनआरोग्य योजना ₹५ लाख पर्यंत मोफत उपचार मिळेल

शुद्धीपत्रक 👇 Pasudhan Vima Yojana

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202608061635365945.pdf

वाचा क्र. १ येथील दि. ०५.०८.२०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात राष्ट्रीय पशुधन अभियांनातर्गत पशुधन विमा योजनेस मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परि. क्र. ४.३ (२) मधील “प्रत्येक कुंटुब कमाल पशुधन संख्या:- १० पशुधन व त्याखालील “(एखाद्या लाभार्थ्याकडे १० पेक्षा जास्त पशुधन असल्यास व सदर पशुधनासाठी विमाकवच घेण्यास पशुपालक इच्छुक असल्यास १० पेक्षा जास्त असलेल्या पशुधनासाठी विमा हप्त्याची पूर्ण रक्कम पशुपालकाने भरणे आवश्यक राहील.)”

Pasudhan Vima Yojana, या मजकुराऐवजी पुढील मजकुराचा समावेश करण्यात येत आहे. ३ (२) “प्रत्येक कुंटुब कमाल पशुधन संख्याः-१० पशुधन घटक

(एखाद्या लाभार्थ्याकडे १० पशुधन घटकापेक्षा जास्त पशुधन घटक असल्यास व सदर पशुधनासाठी विमाकवच घेण्यास पशुपालक इच्छुक असल्यास १० घटकापेक्षा जास्त असलेल्या पशुधनासाठी विमा हप्त्याची पूर्ण रक्कम पशुपालकाने भरणे आवश्यक राहील.)” तसेच ४.३ (११) मधील क्र. (१०) येथील “नुकसान भरपाईसाठी विमा प्रस्ताव सादर केल्यानंतर ५ दिवसाच्या आत प्रस्तावास मंजूरी देणे बंधनकारक राहील.”

हे देखील वाचा : राष्ट्रीय कृषि विकास योजना विविध घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

या मजकुराऐवजी पुढील मजकुर समाविष्ट करण्यात येत आहे. ४.३ (११) (१०) “नुकसान भरपाईसाठी (Pasudhan Vima Yojana) विमा प्रस्तावासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ५ दिवसाच्या आत प्रस्तावास मंजूरी देणे बंधनकारक राहील.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत