प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी ई – केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
PM Kisan Samman Nidhi e-KYC Update; विशेष मोहीम
PM Kisan Samman Nidhi Yojana योजनेतील पारदर्शकता वाढविणे, संभाव्य गळती रोखणे आणि केवळ पात्र व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच थेट लाभ पोहोचविणे हा या विशेष मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार २० मे २०२६ पासून जिल्ह्यात ई-केवायसी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
PM Kisan Samman Nidhi Yojana
जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे एकूण ३ लाख ४ हजार ६0 सक्रिय लाभार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत 1 लाख ९ हजार 574 लाभार्थ्यांनी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केले असून, 1 लाख 94 हजार 486 लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई-केवायसी उर्वरित लाभार्थ्यांनी विलंब न करता ही प्रक्रिया पूर्ण करावी.
यांच्यासाठी कर्मचारी येणार घरी
लाभार्थ्यांना PM Kisan Samman Nidhi Yojana ई-केवायसीसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण तसेच फेस ऑथेंटिकेशन चेहरा ओळख या दोन सोप्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वृद्ध, आजारी किंवा हालचालींमध्ये अडचण असलेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, ग्रामस्तरीय नोडल अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून देत आहेत.
फार्मर आयडी काढणे आवश्यक
पीएम-किसान योजनेतील फार्मर आयडी नसलेल्या २२,६७० लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्याने संबंधित लाभार्थ्यांनी तातडीने जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन फार्मर आयडी काढून घ्यावा व आवश्यक PM Kisan Samman Nidhi Yojana ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.फार्मर आयडी हा पीएम-किसानसह विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी फार्मर आयडी प्रक्रिया पूर्ण करून आपली माहिती अद्ययावत ठेवावी. फार्मर आयडी उपलब्ध नसल्यास पीएम-किसान तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
हे देखील वाचा : Agristack Registration Maharashtra : पोर्टल वर नोंदणी करा.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी PM Kisan Samman Nidhi Yojana ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण व फार्मर आयडी संबंधित प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ अखंडितपणे पात्र शेतकरी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून पीएम किसान योजनेचा आगामी हप्ता अखंडितपणे मिळवावा, असे आवाहन केले आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
- Taluka PM Kisan Samman Nidhi Yojana List
(तालुका, सक्रिय लाभार्थी संख्या, ई-केवायसी पूर्ण, ई-केवायसी प्रलंबित) आर्णी : 20,020 लाभार्थी, 7,195 ई-केवायसी पूर्ण, 12,825 प्रलंबित, 1069 फार्मर आयडी नसलेले लाभार्थी. बाभूळगाव : 13,437 लाभार्थी, 4,333 पूर्ण, 9,104 प्रलंबित, 1089 फार्मर आयडी नसलेले लाभार्थी. दारव्हा : 25,061 लाभार्थी, 8,127 पूर्ण, 16,934 प्रलंबित, 2248 फार्मर आयडी नसलेले लाभार्थी. दिग्रस : 16,258 लाभार्थी, 4,082 पूर्ण, 12,176 प्रलंबित, 1468 फार्मर आयडी नसलेले लाभार्थी. घाटंजी : 19,199 लाभार्थी, 7,994 पूर्ण, 11,205 प्रलंबित, 1434 फार्मर आयडी नसलेले लाभार्थी. कळंब : 13,652 लाभार्थी, 4,566 पूर्ण, 9,086 प्रलंबित, 1062 फार्मर आयडी नसलेले लाभार्थी. केळापूर : 16,204 लाभार्थी, 6,378 पूर्ण, 9,826 प्रलंबित, 1664 फार्मर आयडी नसलेले लाभार्थी.
- 2) Taluka PM Kisan Samman Nidhi Yojana List
महागाव : 25,155 लाभार्थी, 10,825 पूर्ण, 14,330 प्रलंबित, 1523 फार्मर आयडी नसलेले लाभार्थी.मारेगाव : 13,165 लाभार्थी, 4,116 पूर्ण, 9,049 प्रलंबित, 1228 फार्मर आयडी नसलेले लाभार्थी. नेर : 18,761 लाभार्थी, 7,088 पूर्ण, 11,673 प्रलंबित, 1179 फार्मर आयडी नसलेले लाभार्थी. पुसद : 32,356 लाभार्थी, 10,243 पूर्ण, 22,113 प्रलंबित, 2827 फार्मर आयडी नसलेले लाभार्थी. राळेगाव : 16,447 लाभार्थी, 5,164 पूर्ण, 11,283 प्रलंबित, 1108 फार्मर आयडी नसलेले लाभार्थी. उमरखेड : 27,159 लाभार्थी, 12,910 पूर्ण, 14,249 प्रलंबित, 1363 फार्मर आयडी नसलेले लाभार्थी. वणी : 18,631 लाभार्थी, 6,317 पूर्ण, 12,317 प्रलंबित, 1082 फार्मर आयडी नसलेले लाभार्थी. यवतमाळ : 16,148 लाभार्थी, 5,465 पूर्ण, 10,683 प्रलंबित, 1344 फार्मर आयडी नसलेले लाभार्थी. झरी-जामणी : 12,407 लाभार्थी, 4,184 पूर्ण, 8,223 प्रलंबित,. 982 फार्मर आयडी नसलेले लाभार्थी.
