ग्रामसभेत कोणकोणते प्रश्न विचारावे?, Gramsabhet Konkonte Prashna Vicharave?

ग्रामसभेत कोणकोणते प्रश्न विचारावे?, Gramsabhet Konkonte Prashna Vicharave?

Home

Gramsabhet Konkonte Prashna Vicharave? : नमस्कार वाचक मित्रांनो आज मी तुम्हाला ग्रामपंचायत ची कुठलीही ग्रामसभा असो त्या ग्रामसभेत कोणकोणते प्रश्न विचारू शकतो. जेणेकरून ग्रामपंचायत मध्ये जमा झालेला विकास निधी, नवीन कामे, जुने कामे असो किंवा राज्य आणि केंद्र सरकारने दिलेला निधी असो. त्याचा कसा वापर केला गेला. इतर काही महत्वाचे प्रश्न असो त्याचावर आम्ही या लेखात, “Gramsabhet Konkonte Prashna Vicharave?” याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

ग्रामसभेत प्रश्न का विचारावे? (Gramsabhet Konkonte Prashna Vicharave?)

ग्रामसभा ही केवळ एक शासकीय औपचारिकता नाही; ती एक ‘ग्रामसभा’ आहे, जी गावाच्या विकासाची दिशा ठरवते. एका सुजाण नागरिकासाठी, केवळ ग्रामसभेत उपस्थित राहणे पुरेसे नाही; गावाच्या प्रशासनाबद्दल आणि विकासाबद्दल खरे प्रश्न विचारणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

गावात मिळालेला पैसा कुठे आणि कसा खर्च केला गेला? खऱ्या गरजू लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे का? आणि गावातील प्रलंबित कामे कधी पूर्ण होणार? असे थेट प्रश्न विचारल्याने ग्रामपंचायतीच्या प्रशासनात पारदर्शकता येते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो. ग्रामसभेत नेमके काय बोलावे आणि कोणते प्रश्न विचारावेत याबद्दल बहुतेक गावकरी संभ्रमात असतात. म्हणूनच, एक सक्षम आणि पारदर्शक ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी. हे प्रश्न नक्की विचारा आणि आपल्या गावाच्या विकासात एक सक्रिय भागीदार बना!

गावातील युवकांसाठी काही प्रश्न ?

गावातील युवकांनो आता समाज सेवक बनायचं नाही तर आपलं गाव बदलायचं आहे. समस्या मोजण्यात आपले आयुष्य घालवू नका. गप्प बसून बदल होत नाही आवाज उठवल्याने बदल होतो. आज तुम्ही एक पाउल टाकाल तर उद्या संपूर्ण गाव तुमच्यासोबत चालेल. युवक जागा झाला तर गाव बदलायला वेल लागणार नाही. येत्या ग्रामसभेत आम्ही दिलेले प्रश्न नक्की विचारा.

दिल्लीतल्या नेत्यांवर टीका टिप्पणी करणे सोपं आहे. पण स्वतः च्या ग्रामसभेत उठून एक प्रश्न विचारण्याची हिम्मत आहे काय? आज शांत राहाल टर उद्या तुमच्या मुलांना हीच समस्या वारसा म्हणून मिळतील. गाव बदलायचं असेल टर सोसिअल मिडिया नाही तर ग्रामसभेत आवाज उठवा. गावाचा पैसा गावाच्या विकासासाठी मग हिशोब म्हणे हा तुमचा हक्क नाही का!

Gramsabhet Konkonte Prashna Vicharave?

ग्रामसभेत आम्ही खालील दिलेले प्रश्न विचारा. (Gramsabhet Konkonte Prashna Vicharave?)

प्रश्न क्रमांक १) आपल्या गावाला मागीलवर्षी किती निधी आला?

हा प्रश्न (जितक्या वर्षी चा निधी बद्दल प्रश्न विचारायचा आहे ते मांडा) मागील वर्ष असो किंवा दोन तीन असो ग्रामपंचायत ला कोणकोणत्या योज्नामधून किती निधी प्राप्त झाला. त्याची माहिती मिळते. ग्राम निधीचा स्रोत समजतो, गावात किती पैसा आला हे कळते. विकासकामांची पारदर्शकता वाढते.

प्रश्न क्रमांक २) मागील वर्षी राहिलेल्या निधीचा खर्च कुठे झाला?

हा प्रश्न का विचारावा? तर प्राप्त निधीतून कोणती कामे मंजूर झाली आणि त्यावर किती खर्च झाला? प्राप्त निधीची संपूर्ण माहिती मिळते. अपूर्ण रखडलेले कामे समोर येतात. अनावश्यक खर्चावर प्रश्न विचारता येतो.

प्रश्न क्रमांक ३) अपूर्ण कामची सध्याची स्तिथी काय आहे, आणि का आहे?

हा प्रश्न का विचारावा? तर मागील ग्रामसभेत मंजूर झालेल्या कामांपैकी किती पूर्ण झाली आणि किती प्रलंबित आहेत? कामांचा आढावा मिळतो. विलंबांची कारणे समजतात. जबाबदारी निश्चिथत होते.

प्रश्न क्रमांक ४) शासकीय योजनामध्ये लाभार्थी यांची निवड कशी झाली?

हा प्रश्न का विचारावा? तर राज्य असो किंवा केंद्रच्या शासकीय योजनांसाठी लाभार्थी कोणत्या निकषांवर निवडले?, पात्र व्यक्तींना संधी मिळाली का किंवा त्याच त्याच व्यक्तीला योजना लाभ मिळाल्या हे तपासता येते. सदर लाभार्थी पात्र होता का हे समजते.अधिक पारदर्शकता देखील वाढते.

प्रश्न क्रमांक ५) पुढील वर्षाची विकास योजना काय?

हा प्रश्न का विचारावा? तर पुढील वर्षात ग्रामपंचायतीची प्राधान्य विकासकामे कोणती आहेत आणि ती कधी पूर्ण होणार? गावाच्या विकासाचा रोडमॅप समजतो. लोकांच्या गरजां मायम नियेजन होते. योजनांची बेठेक अंमलबजावणी होते.

ग्रामसभेत अजून 13 महत्वाचे प्रश्न विचारू शकता.

ग्रामसभेत 13 प्रकारचे विविध प्रश्न विचारू शकता ते आम्ही खाली दिलेले आहे. (Gramsabhet Konkonte Prashna Vicharave?)

  1. ग्रामपंचायतीचा वार्षिक अर्थसंकल्प ग्रामसभेसमोर सादर झाला का?
  2. कर वसुली किती झाली?
  3. 15 वो वित्त आयोग निधी कसा वापरला?
  4. ग्रामपंचायतीची थकबाकी किती आहे?
  5. सामाजिक लेखापरीक्षण कधी झाले?
  6. गावाला मिळालेला निधी आणि योजनेचा पैसा कुठे गेला?
  7. ​मागील वर्षातील अपूर्ण कामे का रखडली?
  8. शासकीय योजनांचे लाभार्थी कसे निवडले गेले?
  9. गावातील रस्ते, पाणी, आणि लाईटच्या समस्यांवर काय उपाय केला?
  10. ग्रामपंचायतीचा आगामी वर्षाचा विकास आराखडा काय आहे?
  11. 15 व्या वित्त आयोगाचा निधी कोणत्या कामांवर खर्च झाला?
  12. ग्रामपंचायतीच्या वार्षिक ऑडिट रिपोर्टमध्ये काय आढळले?
  13. तोंडी आश्वासने नको; उत्तरे ग्रामसभेच्या इतिवृत्तात (Proceeding Book) नोंदवून घ्या!

ग्रामसभेत प्रश्न विचारणे हे तुमचे कायदेशीर अधिकार आहेत !

  • ग्रामसमेत सहभागी होणे हा तुमचा हक्क आहे.
  • प्रश्न विचारणे आणि माहिती मिळवणे हा तुमचा अधिकार आहे.
  • गावाच्या विकासात कामांत सहभाग घेणे ही आपली जबाबदारी आहे.
ग्रामसभेत कोणकोणते प्रश्न विचारावे?

ग्रामसभा व ग्रामपंचायत कायदेशीर संदर्भ

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 (कलम 27, 29, 32, 33, 97 ह.) ग्रामसभा व ग्रामपंचायत कार्यपद्धती नियम ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन नुसार Gramsabhet Konkonte Prashna Vicharave? तर हे आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 कलम 54C (2)

” ग्रामसभेची तारीख, वेळ आणि ठिकाणाची माहिती किमान १५ पूर्ण दिवस आधी ग्रामसभा सदस्यांना व संबंधित अधिकान्यांना कळविणे आवश्यक आहे.”  ग्रामसभा ही ग्रामस्थांचा घटनात्मक अधिकार आहे! ग्रामसभा कितीहि तारखेची असेल, तर १५ पूर्ण दिवस आधी नोटीस देणे बंधनकारक आहे.

ग्रामसभेची नोटीस वेळेत न मिळाल्यास ग्रामस्थांनी काय तपासावे ?

  • ग्रामसभेची नोटीस नेमकी कोणत्या तारखेला काढली?
  • नोटीस ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर कधी लावली?
  • ग्रामस्थांना माहिती देण्यासाठी कोणती पद्धत वापरली?
  • तारीख, वेळ आणि ठिकाण स्पष्टपणे नमूद केले आहे का?
  • नोटीस प्रसिद्ध केल्याची नोंद /पुरावा उपलब्ध आहे का?

हे देखील वाचा : Gramsabhet Konkonte Prashna Vicharave? PDF

ग्रामसभेची नोटीस वेळेत न मिळाल्यास ग्रामस्थांनी काय करावे?

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 नुसार नियमांचे पालन झाले नसल्यास ग्रामस्थांनी खालील माहिती दिलेल्या प्रमाणे काम करावे?

  • 1 ग्रामपंचायतीकडे लेखी हरकत द्या.
  • 2. संबंधित नोंदी व पुरावे मागवा.
  • 3 गटविकास अधिकारी (BDO), पंचायत समितीकडे तक्रार करा.
  • 4. संबंधित कागदपत्रे RTI अंतर्गत मागवता येतात.

ग्रामसभेत घेतले जाणारे विषय कोणते?

  • ग्रामपंचायतीचा वार्षिक विकास आराखडा मंजूर करणे
  • ग्रामपंचायतीचा वार्षिक अर्थसंकल्प मंजूर करणे
  • मागील वर्षाच्या उत्पन्न खर्चाचा हिशोब (लेखा) सादर करणे
  • सर्वस्थितीत सुरु असलेली व पूर्ण झालेली कामे यांचा आढावा
  • नवीन कामांची प्राधान्यक्रमानुसार निवड
  • पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, गटारी, आरोग्य, शिक्षण यावर चर्चा
  • पात्र लाभार्थ्यांची यादी व योजनांची माहिती
  • पर्यावरण, वृक्षलागवड, कचरा व्यवस्थापन व इतर महत्वाचे विषय

Gramsabhet Konkonte Prashna Vicharave?, प्रश्न विचारणे म्हणजे विरोध नाही; प्रश्न विचारणे म्हणजे लोकशाही मजबूत करणे !

Grampanchayat Mahiti Adhikar PDF

Faq

ग्रामसभेत कोण बोलू शकतो ?

ग्रामपंचायत हद्वीतील प्रत्येक प्रौढ नागरिक (18 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाचे स्त्री, फुष्ष, तृतीयपंथी सवींना समान अधिकार, गावात राहणारा कोणताही नागरिक, गावाचा मतदार म्हणून नोंद असलेली व्यक्ती ग्रामसभेत बोलू शकतो.

ग्रामसभेत बोलणे का महत्त्वाचे आहे?

गावातील समस्या मांडण्यासाठी, शासकीय योजना आणि निधींच्या वापरावर आपले मत नोंदवण्यासाठी, गावाच्या विकास आराखडयात आपल्या गरजा समाविष्ट करण्यासाठी, स्वच्छ, सुंदर, समूद्ध आणि एकजूट गाव घडवण्यासाठी ग्रामसभेत बोलणे महत्त्वाचे आहे.

निष्कर्ष

ग्रामीण तरुणांसाठी (Gramsabhet Konkonte Prashna Vicharave?), ग्रामसभेत प्रश्न विचारणे हे आंदोलन किंवा संघर्षाचे स्वरूप नाही; तर ते गाव विकास, लोकशाही आणि सर्वांगीण गाव विकासाला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ग्रामीण भागातील गावकरी जोपर्यंत आपल्या हक्कांसाठी आणि जबाबदारीसाठी आवाज उठवत नाहीत, तोपर्यंत खरा विकास अशक्य आहे.

लक्षात ठेवा, (Gramsabhet Konkonte Prashna Vicharave?) प्रशासनाकडून मिळणाऱ्या केवळ तोंडी आश्वासनांवर अवलंबून राहू नका; तुमच्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे ग्रामसभेच्या कार्यवृत्त पुस्तकात नोंदवून घेणे हा तुमचा कायदेशीर हक्क आहे. उत्तरे मिळण्यास विलंब झाल्यास, माहितीचा अधिकार (RTI) हे शस्त्र म्हणून तुमच्याकडे आहे.

म्हणून, (Gramsabhet Konkonte Prashna Vicharave?,) ‘आमचे गाव, आमची जबाबदारी’ या ब्रीदवाक्यासह आगामी ग्रामसभेत सहभागी होऊया. केवळ प्रश्न विचारू नका, तर गावाच्या विकासात योगदानही द्या. एक सुजाण नागरिक बना आणि एक सक्षम ग्रामपंचायत घडवा!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत