Navin Job Card Kasa Kadhava?

Navin Job Card Kasa Kadhava?, जॉब कार्ड अर्ज प्रक्रिया पहा?

Job

ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराची हमी देण्यासाठी ‘Viksit Bharat–Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin)’ (VB-G RAM G) राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘जॉब कार्ड’ (New Job Card) हे सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र आहे. त्यासाठी Navin Job Card Kasa Kadhava? हाच लोकांना जास्त प्रश्न पढतो.

टीप : नवीन जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आपल्याच ग्रामपंचायत मधून काढून मिळेल. फक्त आम्ही खाली एक PDF देऊ तो Download करायचा आहे आणि Xerox करून आपल्या हाताने भरून आपल्याच ग्राम रोजगार सेवक यांच्याकडे जमा करायचा आहे.

अनेकदा नागरिकांना प्रश्न पडतो की, नवीन जॉब कार्ड कसे बनवावे? यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कुठे करावा? या लेखात आपण नवीन जॉब कार्ड काढण्याची खरी व अचूक माहिती पाहणार आहोत.

(VB-G RAM G) जॉब कार्ड म्हणजे काय?

VB-G RAM G अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबाला एका आर्थिक वर्षात १२५ दिवसांच्या अकुशल मजुरीच्या (Unskilled Manual Work) कामाची कायदेशीर हमी दिली जाते. या योजनेत समाविष्ट असलेल्या कुटुंबाची व मजुरांची नोंद ज्या कार्डवर असते, त्याला ‘जॉब कार्ड’ म्हणतात.

VB-G RAM G नवीन जॉब कार्डसाठी पात्रता काय आहे?

VB-G RAM G जॉब कार्ड काढण्यापूर्वी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा आणि ग्रामीण भागात कायमचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे.
  • कुटुंबातील सदस्यांची अकुशल शारीरिक काम (Manual Work) करण्याची तयारी असावी.

आवश्यक कागदपत्रे (Documents Required)

VB-G RAM G New Job Card साठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते:

  1. आधार कार्ड (कुटुंबातील सर्व सज्ञान सदस्यांचे)
  2. रेशन कार्ड (Ration Card)
  3. बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक
  4. पासपोर्ट साईज फोटो (२ प्रति)
  5. रहिवासी दाखला / मतदान ओळखपत्र
  6. मोबाईल नंबर

नवीन VB-G RAM G जॉब कार्ड कसा काढावा? (अर्ज प्रक्रिया)

VB-G RAM G New Job Card बनवण्यासाठी ऑफलाईन हे (ग्रामपंचायत) मार्फत मिळते. आणि ऑनलाईन (CSC/MahaDBT/UMANG) अशा दोन्ही पद्धती उपलब्ध आहेत. परंतु महाराष्ट्र मध्ये अजून सुरु झालेले नाही. इतर राज्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी ऑनलाईन प्रक्रिया आहे.

१. ऑफलाईन अर्ज प्रक्रिया (ग्रामपंचायत द्वारे)

  • तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जा.
  • ग्रामसेवक किंवा ग्राम रोजगार सहायक (GRS) यांच्याकडून ‘जॉब कार्ड नोंदणी अर्ज’ घ्या.
  • अर्जात सर्व सदस्यांची नावे, वय, आधार कार्ड क्रमांक आणि बँक तपशील भरा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तो ग्रामपंचायतीत जमा करा.
  • पडताळणी: ग्रामपंचायतीकडून अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी १५ दिवसांच्या आत पूर्ण केली जाते.
  • पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मोफत जॉब कार्ड दिले जाते.

२. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (CSC / पोर्टल द्वारे)

  • तुम्ही जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर किंवा राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलवर (MahaDBT / UMANG App) जाऊन अर्ज करू शकता.
  • तेथे तुमची आधार पडताळणी (Aadhaar Verification) केली जाते.
  • डेटा NREGASoft / MIS सिस्टीमवर अपलोड केला जातो.
  • डिजिटल मंजुरीनंतर ग्रामपंचायतीमार्फत तुम्हाला प्रिंटेड जॉब कार्ड प्राप्त होते.

जॉब कार्ड मिळण्यासाठी किती वेळ लागतो?

नियमानुसार, ग्रामपंचायतीत अर्ज सादर केल्यापासून १५ दिवसांच्या आत पात्र कुटुंबाला जॉब कार्ड देणे बंधनकारक आहे. Viksit Bharat–Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin) जॉब कार्ड वितरीत करण्यासाठी कोणतेही शुल्क (फी) द्यावे लागत नाही; हे पूर्णपणे मोफत दिले जाते.

Navin Job Card Form PDF

जॉब कार्डचे मुख्य फायदे काय आहेत?

  • VB-G RAM G रोजगाराची हमी: वर्षातून ठराविक दिवस रोजगाराची कायदेशीर हमी मिळते.
  • थेट बँक खात्यात पैसे: कामाचा मोबदला थेट तुमच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होतो.
  • इतर सरकारी योजनांचा लाभ: अनेक घरकुल योजना आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी जॉब कार्ड अनिवार्य मानले जाते.

हे देखील वाचा : New Job Card Apply Online?

Navin Job Card Kasa Kadhava? (FAQ)

प्र. १) VB-G RAM G New Job Card काढण्यासाठी काही शुल्क (फी) द्यावे लागते का?

उत्तर: नाही, VB-G RAM G New Job Card पूर्णपणे मोफत दिले जाते. यासाठी कोणतेही सरकारी शुल्क आकारले जात नाही.

प्र. २) एकाच कुटुंबात दोन वेगळे VB-G RAM G New Job Card काढता येतात का?

उत्तर: नाही, एका रेशन कार्डवर किंवा एका विभक्त कुटुंबासाठी एकच VB-G RAM G New Job Card जारी केले जाते, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व १८ वर्षांवरील सदस्यांची नावे जोडली जाऊ शकतात.

प्र. ३) VB-G RAM G जॉब कार्डची वैधता (Validity) किती वर्षे असते?

उत्तर: VB-G RAM G जॉब कार्डची वैधता ५ वर्षे असते. ५ वर्षांनंतर त्याचे नूतनीकरण (Renew) करावे लागते.

Q2. जॉब कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करता येते का?

उत्तर: होय, तुम्ही अधिकृत शासकीय पोर्टल (nrega.nic.in) वर जाऊन तुमच्या ग्रामपंचायतीच्या यादीतून जॉब कार्ड स्टेटस पाहू शकता व माहिती डाउनलोड करू शकता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत