हिंगोली Free training in fashion designing , दि. २७ : जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने औंढा नागनाथ तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील युवक व युवतींसाठी फॅशन डिझाईनिंगचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
Free training in fashion designing Apply
या प्रशिक्षणासाठी अर्जदार किमान ८ वी उत्तीर्ण असावा तसेच त्याचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे. इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) आणि बँक पासबुकची प्रत या आवश्यक कागदपत्रांसह नाव नोंदणी करावी.
Free training in fashion designing Contact Office
प्रशिक्षणासाठी नाव नोंदणीची अंतिम मुदत ३० जुलै २०२६ असून इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक किसन धाबे (मो. ९३७०६३१४६९) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), हिंगोली व जिल्हा उद्योग केंद्र, एस-१२, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हिंगोली येथेही संपर्क साधता येईल.
हे देखील वाचा : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
औंढा नागनाथ तालुक्यातील युवक-युवतींसाठी फॅशन डिझाईनिंगचे मोफत प्रशिक्षण ३० जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
या प्रशिक्षणाचा लाभ पात्र युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ए. एस. कदम तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.