Maharashtra Van Rang आदिवासी संस्कृती उत्सव – ‘वनरंग २०२६’ दिवस दुसरा | आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरेचा भव्य उत्सव..
आदिवासी समाजाच्या समृद्ध कला, संस्कृती, लोकपरंपरा आणि जीवनशैलीचा मनोहारी आविष्कार घडवून आणणाऱ्या ‘वनरंग २०२६’ या भव्य उत्सवाच्या दुसऱ्या दिवसाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Maharashtra Van Rang
या कार्यक्रमाला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी सौ. प्रतिभाताई पवार, पद्मश्री भिकल्या धिंडा, युगेंद्र पवार, हर्षालीताई थविल – महापौर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, माजी आमदार सुनील भुसारा, भावना ताई घाणेकर – नगराध्यक्ष, उरण नगरपरिषद, बिग बॉस फेम शिव ठाकरे, प्रवीण गायकवाड, अभिनेत्री मेधा धांडे आणि सविता मालपेकर यांचीही उपस्थिती लाभली.

आदिवासी संस्कृती उत्सव – ‘वनरंग २०२६ Maharashtra Van Rang
‘वनरंग २०२६’च्या माध्यमातून आदिवासी समाजाची पारंपरिक कला, लोकनृत्य, संगीत, हस्तकला, वेशभूषा, खाद्यसंस्कृती आणि समृद्ध लोकपरंपरा यांचे दर्शन घडत आहे. कलावंतांच्या सादरीकरणांनी, पारंपरिक लोककलेच्या विविध रंगांनी आणि उत्साही वातावरणाने ‘वनरंग २०२६’चा दुसरा दिवस अविस्मरणीय ठरला.
#वनरंग२०२६ #आदिवासीसंस्कृती #आदिवासीकलामहोत्सव #आदिवासीपरंपरा #लोककला
